सारण-
२ मक्याच्या कणसाचे दाणे
३ वाट्या बारीक किसलेले पनीर
(जेवढे पनीर तेवढेच मक्याचे दाणे)
मिरची बारीक चिरुन चवीनुसार
एक मध्यम कांदा बारीक चिरुन
जिरे, मोहरी, तेल, मीठ
पारी-
कणिक ४ वाट्या
अर्धी वाटी कोथिंबीर चिरुन
अर्धा चमचा ओवा
मिठ
अर्धा चमचा जवसाची पुड (माझ्या कणकेत घातलेलीच असते)
कणकेत, कोथिंबीर, ओवा, जवसाची पुड, मीठ घालुन मळुन घ्यावी.
कणसं पाण्यात उकडुन, त्याचे दाणे सुरीने काढुन घ्यावे. पनीर किसुन घ्यावे.
पॅनमधे तेल तापवावे, त्यात मोहरी, जिरे तडतडले की कांदा आणि मिरची चांगली परतुन घ्यावी. कांदा ब्राऊन झाला पाहिजे. मग त्यावर पनीर आणि मका, मीठ घालुन गॅस लगेच बंद करावा. मिश्रण चांगले एकत्र करावे.
गार झाल्यावर सारण भरुन बटर लाऊन पराठा खरपुस भाजुन, गरमा गरम वाढावा.
पाहिजे असल्यास फोडणीत धने ठेचुन घालावे.
दही, शेंगदाण्याची चटणी किंवा लोणच्या सोबत मस्त लागतात.
ताज्या मकाचे दाणे फारच मस्त वाटतात.
मका बारीक न केल्याने खाताना मस्त वाटतं.
सगळे जिन्नस सहज पणे उपलब्ध होणारे आहेत
सारण एक सारखे पसरण्यासाठी पराठ्यात सारण असे भरुन मग मोदकासारखा भाग वर ठेऊन लाटावा.
व्वा! सोपा आणि
व्वा! सोपा आणि छान!
प्रीती..........साहित्यात ते "२ मक्याचे दाणे" ऐवजी २ मक्याच्या कणसांचे दाणे असं करशील का? :स्मितः
वॉव!!! आजच संध्याकाळी करण्यात
वॉव!!! आजच संध्याकाळी करण्यात येतील! काहीच खटपट नाहीये या पाकृमध्ये!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फक्त पनीर न मिळाल्यास त्याऐवजी कोणते चीज वापरता येइल? पटकन सांगा कोणीतरी! बाहेर जाते आहे थोड्या वेळात.
अरे वा मस्त. वत्सला मला फेटा
अरे वा मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वत्सला मला फेटा चीज आवडत.
भारी आहे.
भारी आहे.
छान सोपी आहे पाकृ
छान सोपी आहे पाकृ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दाणे आख्खेच घातलेत का?
दाणे आख्खेच घातलेत का? लाट्ताना बाहेर येत नाहीत का?
यमी .....
यमी .....:)
छान आहे !
छान आहे !
पराठे मस्त दिसतायत. मेन गोष्ट
पराठे मस्त दिसतायत. मेन गोष्ट म्हणजे आता मका आणलाच पाहीजे, मिळतोय. प्रीती पराठे मक्याच्या दाण्यांमुळे लाटतांना फुटत नाहीत का?
चै, मी हेच विचारणार होते
चै, मी हेच विचारणार होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसलं टेस्टी लागेल हे
अरे वा ! लहानांना मस्त आहे.
अरे वा !
लहानांना मस्त आहे. पिझ्झा विसरतील.
धन्यवाद सगळ्यांना! Chaitrali,
धन्यवाद सगळ्यांना!
Chaitrali, रिया. हे पराठे बिलकुल फुटले नाही. मका उकडुन घेतल्याने दाणे मऊ होतात आणि लाटले जातात. छान सॉफ्ट आणि क्रिस्पी झाले.
वॉव सही आहे! एवढा मस्त लाटला
वॉव सही आहे! एवढा मस्त लाटला गेला तर खरचं मजा येईल खायला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान कलरफुल दिसतायत.
छान कलरफुल दिसतायत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे पाककृती.
छान आहे पाककृती.
जवसाची पूड कणिकेत असते!!
जवसाची पूड कणिकेत असते!! आवडल!! किती काळजीने स्वयपाक करता तुम्ही. पाककृती छान आहे.
व्वा! मस्त दिसतोय पराठा
व्वा! मस्त दिसतोय पराठा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच
बेस्ट आहे हा पराठा. करायला
बेस्ट आहे हा पराठा. करायला एकदम सोप्पा आणि खायला सगळ्यांनाच नक्की आवडेल असा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पौष्टिक, आकर्षक, वेळ वाचवणारा, पोटभरीचा शिवाय अगदी ऐन वेळेलाही करता येईल. नुसतं सारणसुद्धा चविष्ट लागत असणार हे. डब्यात साध्या पोळीशी पण चट्टामट्टा होईल. पारीसाठीचं कणकेचं मिश्रण हाही एक अॅडिशनल प्रकार होईल पराठ्याचा. गरमागरम खाणारा १००% 'आने दो' म्हणत राहील
प्रीती, आवडला पराठा. खुपच धन्यवाद. टॉप रेसिपी आहे!
जवसाचीपुड जवस भाजुन करयची का?
जवसाचीपुड जवस भाजुन करयची का?
प्रीति, कृपया ह्या
प्रीति,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पूर्णब्रह्म' असं लिहा.
एकदम सोपी पाकृ आहे. पराठे
एकदम सोपी पाकृ आहे. पराठे एकदम चविष्ट होतात.
कणसांच्याऐवजी मक्याचे फ्रोजन दाणे वाफवुन घेतले आणि मिक्सरमधुन फिरवले. अगदी एकदाच किंचीत फिरवण्याऐवजी चुकुन दोनदा फिरवले! तसेच पनीर आणि मका टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करायला सांगितला आहे. पण अस्मादिकांनी १ मिनीटानंतर गॅस बंद केला. या दोन चुकांमुळे सारण सैल झाले. पण त्यात थोडे मक्याचे पीठ घालून घट्टसर केले. तरीही पराठे सुंदर झाले. मुलींनीही आवडीने खाल्ले.
धन्यवाद प्रिती!
माझ्याकडून चुक झालीच.
करून बघता येईल असं वाटतयं (
करून बघता येईल असं वाटतयं ( नाहीतर तयारी करून पोळीवाल्या बाईंना करायला सांगणार
)
प्रीति, मस्त आहेत पराठे!
प्रीति, मस्त आहेत पराठे!
मस्त!
मस्त!
मक्याचा सत्यानाश..... मक्याची
मक्याचा सत्यानाश.....
मक्याची कणसे कोळशावर भाजायलाच निसर्गाने दिलेली असतात.
त्यातून जी काही उरतील ती फक्त पीठ करायलाच.
इतर कुठल्याही प्रकारे मक्याचा वापर करणे हे जातीवंत खवय्या मान्य करणार नाही....
जयंतराव, हल्ली 'सर्वातमका'
जयंतराव, हल्ली 'सर्वातमका' असतो. त्यामुळे हे पराठे करुन बघा.
माधवी, स्वाती, अल्पना, चनस,
माधवी, स्वाती, अल्पना, चनस, निवा, सई, मंजूडी, प्राजक्ता_शिरीन, चिन्नु खुप धन्यवाद!![Blush](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/blush.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो आणि, फ्रोजन दाणे अजिबात नको. ताजे दाणे उकडुन घेतल्याने ते मऊ आणि खाण्यास कारच मस्त लागतात.
सिमन्तिनी,
Saee, अगदी अगदी!
वत्सला, करुनही पाहिलास
dmugdha, जवस भाजयचे नाही.
सुंदर,सोपी
सुंदर,सोपी पाकृ.
करणार...
वत्सला - तुला पण थ्यन्क्यु, फ्रोजनचे गणित लिहिल्याबद्दल...
छान दिसत आहे .. लाटायला
छान दिसत आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाटायला त्रास नाही का होत अख्खे मक्याचे दाणे घेतल्याने ..
Pages