मुख्य पदार्थ :--
चीज- ३ लहान क्युब्ज .
पनीर--साधारण चीज इतके
स्वीट कॉर्न -१ १/२कप.
[२ नग स्वीट कॉर्न चे दाणे घेतले आहेंत.]
उप पदार्थ :-
गाजर--१ नग.
सिमला मिरची--१ नग,
आले--१ इंचाचा तुकडा,
हिरवी मिरची--३ नग.बारीक चिरलेली
मटार दाणे--३ टेबलस्पून,
पुदिना पाने --१० ते १२ पाने,
कोथिंबीर चिरलेली-१ टेबलस्पून,
अर्धे लिंबू,
मिरेपुड -१ टी स्पून,
चाट मसाला -१ टी स्पून ,
मीठ.
फोडणी साठी -१ टेबलस्पून तेल,
तिखट किंवा खारी बुंदी-२ टेबलस्पून.
बॉल्स च्या बाहेरचे आवरण करण्यासाठी--
ब्रेड स्लाईस.
[या ब्रेड स्लाईसच्या बाहेरच्या चारी बाजुंच्या कडा सुरीने कापुन काढाव्या.]
बॉल्स घोळविण्यासाठी :--
कॉर्न फ्लोअर-१ टेबलस्पून ,
ब्रेड क्रम्स--साधारण एक वाटी.
बॉल्स तळण्यासाठी तेल --१ १/२ वाटी.
सजावटी साठी :--
क्रिस्पी बॉल्स बनविण्या साठी वापरलेल्या गाजर ,सिमला मिरची ,स्वीट कॉर्न चे दाणे वापरले आहेंत.
त्यासाठी गाजराच्या पातळ चकत्यांची फुले, सिमला मिरचीची पाने केली आहेंत .तसेच टुथपिक ला स्वीट कॉर्न चे दाणे, गाजराचे फूल,सिमला मिरचीचा चौकोनी तुकडा अडकवुन तळलेल्या बॉल्स वर खोचले आहे.
१] स्वीट कॉर्न मायक्रोवेव्ह मधे १ मिनिट फुल पॉवर वर ,बाऊलवर झाकण ठेवुन वाफवुन घ्यावे.
त्यानंतर मिक्सरमधे फक्त एकदाच फिरवुन खडबडीत /जाडसर वाटुन घ्यावे.तसेच मटार दाणे ३० सेकंद वाफवुन घ्यावे.
२] चीज व पनीर किसुन घ्यावे.
३] गाजर , सिमलामिरची --त्यातील पांढर्या बिया ,आतील पांढरा भाग काढुन --बारीक चिराव्या.
४] गॅसवर मध्यम आचेवर एका पॅन मध्ये १ टेबलस्पून तेल गरम करायला ठेवावे.तेल तापले कि त्यात चिरलेले गाजर,सिमला मिरची,मटार दाणे व स्वीट कॉर्न ,चिरलेली हिरवी मिरची घालुन ढवळावे.
आता गॅस मंद करुन पॅन मध्ये किसलेले चीज व पनीर ,मिरेपुड,चाट मसाला,लिंबाचा रस एक टी स्पून, कोथिंबीर व पुदिना पाने हाताने तोडुन घालावी.चवीनुसार मीठ घालावे.सर्व मिश्रण हलक्या हाताने ढवळावे आता गॅस बंद करावा.मिश्रणात २ टेबलस्पून ब्रेड क्रम्स व बुंदी मिसळावी. ब्रेड क्रम्स मुळे मिश्रणाला घट्ट पणा येतो व बाईंडिंग मिळते.मिश्रण दुसर्या बाऊल मध्ये काढुन घ्यावे.
थंड झालेल्या मिश्रणाचे गोल बॉल्स बनवावे.
हे आहे मिश्रण व त्यापासुन केलेले गोल बॉल्स:--
५]एका लहान खोलगट प्लेट मध्ये थोडेसे पाणी घ्यावे.त्यात ब्रेड स्लाईस अगदी हलक्या हाताने भिजवुन लगेच बाहेर काढावे व दोन्ही हाताच्या तळहातात हळुवार दाबुन त्याचा मूळ आकार तसाच ठेवुन त्यातले पाणी काढुन टाकावे.
या भिजलेल्या ब्रेड मध्ये मिश्रणाचा गोळा भरुन गोल गोळा करावा.[पुरणपोळीच्या गोळ्यासारखा.]
एका लहान प्लेट मधे कॉर्न फ्लोअर व उरलेले ब्रेड क्रम्स एकत्र करुन घ्या.त्यात हा गोळा घोळवुन घ्या.
असे सर्व बॉल्स घोळवुन तयार करावे.
६]गॅसवर मध्यम आचेवर एका कढईत तेल तापायला ठेवा.तेल तापले कि गॅस मंद करुन तेलात हे बॉल्स सोनेरी रंगावर तळुन घ्या व पेपर नॅपकिन वर काढुन घ्या.
७]सर्विंग प्लेट मध्ये ठेवुन त्यावर तयार टुथपिक खोचा.गाजर चकतीची फुले व सिमला मिरचीची पाने यांनी सजवलेल्या ट्रे मध्ये सर्विंग प्लेट ठेवुन सर्व करा.
८]सर्व बच्चेकंपनी ,तरुण व मोठ्यांनाही ही आवडतील असे चटकमटक "क्रिस्पी चीज कॉर्न बॉल्स "आस्वाद घेण्यासाठी तयार आहेंत.
१]बुंदी सगळ्यात शेवट मिसळावी.त्याची चव आणि कुरकुरीत पणा बॉल्स तळल्यावर खाताना जाणवतो.
२]स्वीट कॉर्न ऐवजी साध्या कणसाचे दाणे वापरले तर चवीसाठी थोडी साखर घालावी.
इतर सर्व तयारी आधी करुन ठेवल्यास १५ ते २० मिनिटात बॉल्स तयार होतील.
३]ब्रेडच्या कापलेल्या कडा मायक्रोवेव्ह / ओव्हन किंवा कढई मधे कुरकुरीत करुन त्याचे ब्रेडक्रम्स बनविता येतील.
४]मिरेपूड,हिरवी मिरची व किसलेले आले यांचे प्रमाण ,तसेच चीज व पनीर यांचे प्रमाण चवीनुसार कमी /जास्त हवे असेल तसे बदलावे.पुदिना पाने हाताने तोडुन घातल्याने त्याची चव वेगळी जाणवते.
त्यामुळे वेगळ्या चटणीची गरज भासत नाही.
वॉव!!! मस्तच दिसताहेत.
वॉव!!! मस्तच दिसताहेत.
मस्त!
मस्त!
अरे वा .. झकास एकदम!
अरे वा .. झकास एकदम!
मस्त. साहित्याचीही नीट मांडणी
मस्त.
साहित्याचीही नीट मांडणी करून त्याचे, मग मधल्या पायर्यांचे, आणि फायनल प्रॉडक्टला आणखी फिनिशिंग टचेस देण्यासाठी आणि क्रमवार पाककृती लिहिण्यासाठी किती पेशन्स लागला असेल!>>> +१
अरे वा, भाज्या आहेत. छान
अरे वा, भाज्या आहेत. छान लागेल.
साहित्याचीही नीट मांडणी करून
साहित्याचीही नीट मांडणी करून त्याचे, मग मधल्या पायर्यांचे, आणि फायनल प्रॉडक्टला आणखी फिनिशिंग टचेस देण्यासाठी आणि क्रमवार पाककृती लिहिण्यासाठी किती पेशन्स लागला असेल!>>> +१
एकदमच टेम्प्टींग फोटो आहेत.
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383
मला आयता कोणी खायला देइल तर
मला आयता कोणी खायला देइल तर मजा येइल.
तुम्हालाच बक्षिस बरं का.
(No subject)
अभिनंदन सुलेखा!!
अभिनंदन सुलेखा!!
अभिनंदन, सुलेखा. पदार्थ
अभिनंदन, सुलेखा.
पदार्थ पुन्हा करून माझ्या घरी पाठवण्याचे करावे.
सुलेखाताई, हार्दिक अभिनंदन!
सुलेखाताई, हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन, अभिनंदन ......
अभिनंदन, अभिनंदन ......
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
वा वा,,, सुलेखा, मनापासून
वा वा,,, सुलेखा, मनापासून अभिनंदन
अभिनंदन सुलेखा.
अभिनंदन सुलेखा.
अभिनंदन सुलेखाताई.
अभिनंदन सुलेखाताई.
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
पाकृ तर भारीच आहे..पण फोटो लई
पाकृ तर भारीच आहे..पण फोटो लई भारी आहेत..ती फुलं तर जाम भाव खातायत..
सुंदर रेसिपी. बक्षीसाबद्दल
सुंदर रेसिपी. बक्षीसाबद्दल अभिनंदन.
Pages