भजनः सगुण स्वरूप (योग)

Submitted by संयोजक on 16 September, 2013 - 10:12
भजनः सगुण स्वरूप



मायबोली आयडी- कविन (कविता नवरे) यांनी २०१२ मध्ये रचलेल्या गणेश कवन्/गीत याचे श्री गणरायाच्या कृपेने संगीतब्ध्द भजन रचले आहे. खरे तर घरगुती दुखःद घटना व परिस्थितीमूळे या खेपेस गणेशोत्सवसाठी काही करायचे जमले नव्हते. परंतु, श्री गणेशाच्या चरणी सेवा कायम व्हावी अशी त्याची ईच्छा असावी व त्याच्याच प्रेरणेने जे काही सुचले त्याचे यथाशक्ती गीत बनवले आहे. यातील सर्व गुण दोषासकट मायबोलीकर गोड मानून घेतील अशी आशा आहे.

ऐनवेळी केलेल्या विनंतीचा आदर राखून हे गीत मायबोली २०१३ गणेशोत्सवात समाविष्ट केल्याबद्दल संयोजक व अ‍ॅडमिन यांचे अनेक आभार.
शिवाय, कविन यांची मूळ रचना वापरायला व त्यात थोडा बदल करायला अगदी मनापासून व आनंदाने परवानगी दिल्याबद्दल कविन यांचेची आभार. वास्तविक आधी धून सुचली होती व त्यात अहिर भैरव चा रंग असल्याने त्यातील आर्तता, आर्जव, व कारूण्य यासाठी कवीन यांच्या मूळ गीताचे शब्द फारच योग्य वाटले. आणि मायबोलीकर सई (saee) हिने गीत प्रकाशीत होण्यापूर्वी आवर्जून ऐकून, सुचवलेल्या अनेक मौल्यवान सुधारणांबद्दल तीचेही आभार.

मूळ रचना: कविन (मायबोली गणेशोत्सव २०१२) [http://www.maayboli.com/node/3795]
सगुण स्वरूप स्वामी गजानन ।
तुच माझा राम। तुच माझा शाम |
कैवल्याचे धाम ॥

चिंता क्लेष माझे । जाणसी तू सारे ।
रक्षण करावे । विघ्नहारा ॥

ठरेना वादळ । भरकटे तारु ।
सुखरुप न्यावे । पैलतिरा ॥

थकलो हारलो । मोडून पडलो ।
शरण मी आलो । सावरावे ॥

- योग
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुरेख उतरलंय गाणं. वरच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे सूर आणि शब्द एककेकांत चपखल बसताहेत आणि सुरेख वातावरण निर्मिती होत आहे. Happy

चैत्राली, रिया, सानी, अविकुमार, काका, जया, मामी, अन्जू, मृण्मयी, सर्वांचे आभार!
>>सुमधुर झालय. शब्द जिवंत करण्याची ताकद सुरांत असते त्याचा प्रत्यय येतोय
विशेष धन्यवाद!

चांगलं झालंय रे भजन. छान शांत वाटतंय ऐकल्यावर. खुप मनापासून गायला आहेस ते जाणवतंय. कविनचे शब्दही आवडले मला, अगदी साधे सोपे, मनाला भावणारे.
जमत असेल तर पुन्हा वेळ मिळेल तेव्हा ध्रुपद आणि कडव्यांमध्ये अहिर भैरवातले वाद्यांचे तुकडे भरलेस तर आणखी सुंदर होईल गाणं.

अतिशय सुमधुर ....सुरेल....मस्त वाटतय ऐकुन ....

चैतन्य, सुहास्य, गजानन,
धन्यवाद!

>>जमत असेल तर पुन्हा वेळ मिळेल तेव्हा ध्रुपद आणि कडव्यांमध्ये अहिर भैरवातले वाद्यांचे तुकडे भरलेस तर आणखी सुंदर होईल गाणं.
सई,
हे गाणं म्हणून बनवलेलं नाही.. Happy त्यातला भाव तसाच प्रामाणिक रहावा या हेतूनेच मूळ रचना तशीच ठेवली आहे. मला याचं व्यावहारीक अर्थाने गाणं बनवावसं वाटत नाही.. कारण 'फोकस' बदलतो.