काव्यमय भांडण

Submitted by लतांकुर on 16 September, 2013 - 09:27

नुकतच लग्न झालेल , नवीन घर आणि जॉब , तारेवरच्या या कसरतीत माझ्याकडून जवळ पास एक आठवडा माझ्या लाडूबाई बहिणीशी एक आठवडा बोलणं होवूच शकल नाही....

मॅडम आमच्या वरती जाम चिडल्या , अन त्या रागतच एक दोन मेसेज आले , त्यातलाच हा एक.....

कधी कधी असे का होते ना,
व्यक्तीला expectation पेक्षा मोठे व्हावे लागते

परके तर आपले नसतातच ,
मग आपले का परके असल्यासारखे behave करू लागतात

काही प्रॉब्लेम असेल तर ते सांगणे पण टाळतात
आपली आठवण काढणारे जीवंत आहेत हे विसरून जातात
आपल्याच रक्ताच्या माणसांना ही नकळत विसरून जातात

आपलीच माणसे असे का वागतात ???

मग मी ही तिला असाच रीप्लाय दिला.हा माझा रीप्लाय....

कधी कधी काय होत न,
माणसे तीच असतात ,पण वेगळी असते ती परिस्थिति

प्रेमही आहे तसच असत, पण वेळेची चालू असते मारामारी
प्रॉब्लेम्स म्हटलं तर असतातही अन नसतातही

कॉल नसेलही होत नेहमी नेहमी
पण आठवणीच्या हिंदोळ्यावरती असतातच न बोलाचाली

काही नाती बनलेलीच नसतात , दूर होण्यासाठी
असे क्षण असतात , परीक्षा घेण्यासाठी

चुका तर मोठेही करून जातात......
आपल्यावरचे प्रेम अजमावण्यासाठी

आमची ही काव्यमय भांडणे शेअर करविसी वाटली , म्हणून हा खटाटोप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+१ Happy