झटपट मिक्स व्हेज
लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक पाव फ्लॉवर
एक छोटा बटाटा
अर्धा टोमटो
१ गाजर
१ वांगे
तेल (फोडणीसाठी) - २ चमचे
आले अर्धा इंच
लसुन ६-७ पाकलया
कोथिंबीर
1 हिरवी मिरची
मटन मसाला २ चमचे
तीखट २ चमचे
कसूरी मेथी १-२ चमचे
क्रमवार पाककृती:
बटाटा, फ्लॉवर , गाजर , वांगे याचे मोठे मोठे काप करावेत. टोमॅटो बारीक कापून घ्यावा .
आल , लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याची पेस्ट करून घ्यावी.
कढईत तेल तापवून घ्यावे.त्यात अल लसूण पेस्ट टाकून चांगलं परतून घ्या.
कसूरी मेथी , लाल तिखट, मटण मसाला , टोमॅटो टाकून तेल सुटे पर्यन्त परतून घ्या.
नंतर सर्व भाज्या , मीठ टाकून परतून घ्या .5 मिनिट पर्यन्त झाकण ठेवून वाफेवरती शिजू द्या.
गरजेपूर्ते पाणी टाकून थोडावेळ शिजू द्या .पाणी आटल्यावरती गॅस बंद करा.
वरुन थोडी कोथिंबीर पेरून डिश सर्व करा ...तुमची झटपट रेसिपी तयार........
हि भाजी खाताना, चिकन खाल्ल्याचा फील येतो.झणझणीतपणा हवा असेल तर मसाल्याचे प्रमाण वाढवू शकतो.
हि भाजी खाताना, चिकन
हि भाजी खाताना, चिकन खाल्ल्याचा फील येतो. >>>>
चिकन खाल्ल्याचा फील येतो.
चिकन खाल्ल्याचा फील येतो. >>>> यक्क्क्क्क्स... मग नकोच...
Mag, Direct Chicken ch ka
Mag, Direct Chicken ch ka nahi banvat lok ? Vegetarians lokanchi pratikriya tashi hi Bandu pramane ch asel....