आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा घरी आला, की त्याचा पाहूणचार यथायोग्य व्हावा, यासाठी आपण सगळेच झटत असतो.. त्याच्यासाठी नैवेद्य बनवतांना तर पाककृतींच्या सुवासाबरोबरच घरात उत्साह, आनंदाचे भावही दरवळत असतात.
विविधतेने नटलेल्या आपल्या देशातल्या प्रत्येक प्रातांची भाषा, वेशभूषा जशी वेगळी, तशीच बाप्पाच्या पाहूणचाराची पद्धतही वेगळीच असते. देशातच काय, आपल्या महाराष्ट्राच्या प्रांता-प्रांतात, गावागावात, घराघरात आपण पाळत असलेल्या वैविध्यपूर्ण चालीरितीनुसार आपण बाप्पाचा पाहूणचार करतो.
तर आपल्या ह्या आपुलकीने केलेल्या नैवेद्याचे ताट मायबोलीच्या परिवारालाही दाखवाल ना? आणि त्या सोबतच आपल्या रितीरिवाजांची ओळखही सर्वांना करुन देता आली, तर ते ही बघाल ना?
तुमच्या भरघोस प्रतिसादांची, फोटोंची, अनुभवांची आणि वैविध्यपूर्ण आठवणींची वाट पहात आहोत.
प्रकाशचित्र सौजन्य: उदयन
तुमचे प्रतिसाद, फोटो, ह्याच धाग्यात खाली द्या.
धन्यवाद.
संयोजक मंडळ, गणेशोत्सव २०१३
तुमच्या भरघोस प्रतिसादांची,
तुमच्या भरघोस प्रतिसादांची, फोटोंची, अनुभवांची आणि वैविध्यपूर्ण आठवणींची वाट पहात आहोत.
मी तिकडं शोधत होते... हा धागा
मी तिकडं शोधत होते... हा धागा 'संयोजन' मध्ये गेलाय!
धन्यवाद लोला, बदल केलाय.
धन्यवाद लोला, बदल केलाय.
या आहेत माझ्या घरच्या
या आहेत माझ्या घरच्या साटोर्या.
आमच्याघरी गणेशचतुर्थीला ऊकडीचेच मोदक असतात. सोबत खतखते. ( ते आज उद्या करतोच )
साटोर्याही चालतात. यात खास म्हणजे केशर घातले आहे तसेच पाण्याचा वापर न करता, ( दूध वापरून )
केल्या आहेत.
हा प्रकार म्हणजे जरा इंटरनॅशनल झालाय. अगदी त्या पारंपारीक उखाण्यासारखा.
कणीक अंगोलाची, रवा दक्षिण आफ्रिकेतला, साखर पोर्तुगालची, केशर स्पेनचे, दूध जर्मनीचे, तूप रत्नागिरीच्या मावशीकडचे !
......कणीक अंगोलाची, रवा
......कणीक अंगोलाची, रवा दक्षिण आफ्रिकेतला, साखर पोर्तुगालची, केशर स्पेनचे, दूध जर्मनीचे, तूप रत्नागिरीच्या मावशीकडचे !..
दिनेशदा मस्तच.
दिनेशदा, तुमच्या साटोर्या
दिनेशदा, तुमच्या साटोर्या आहेत की संपल्या? आले हो मी खायला...

लोला, धागा तर हलवला, आता नैवेद्याचा मोदकही इकडे हलवायला हवा ना? अजूनही तो प्रतिष्ठापनेच्या बाप्पासमोरच आहे.
हा आमच्या बाप्पासाठी केलेला
हा आमच्या बाप्पासाठी केलेला नैवेद्य



मस्त !
मस्त !
फोटोतल्या साटोर्या बघून
फोटोतल्या साटोर्या बघून स्क्रीनला पण मुंग्या लागल्या..
हा आमचा साधासुधा नैवेद्य
हा आमचा साधासुधा नैवेद्य
सगळ्यांचे मोदक छान आहेत. माझा
सगळ्यांचे मोदक छान आहेत. माझा राहिला नैवेद्याचा फोटो काढायचा
हे मोदक आमच्या बाप्पासाठी.
हे मोदक आमच्या बाप्पासाठी.

मस्त नैवेद्य! साटोर्या,
मस्त नैवेद्य!
साटोर्या, प्रीतिचं आणि प्राडीचं मोदकाचं ताट आणि दीपाचा केळीच्या पानावरचा नैवेद्य छान दिसतोय.
वा वा मस्त नैवद्य !
वा वा मस्त नैवद्य !
मस्त आहेत नैवेद्य उगाच नाही
मस्त आहेत नैवेद्य

उगाच नाही बाप्पा प्रत्येक वर्षी येत..
आलं आलं लोलाचं नैवेद्याचं ताट
आलं आलं लोलाचं नैवेद्याचं ताट आलं. झक्कास !! आर्चचे मोदक नाही आले अजून.
व्वा! सर्वांचेच नैवेद्य छान!
व्वा! सर्वांचेच नैवेद्य छान!
सर्वांचेच नैवेद्य छान छान
सर्वांचेच नैवेद्य छान छान आहेत बाप्पा खुश होतील असेच आहेत
सगळ्यांचे नैवेद्य मस्त..
सगळ्यांचे नैवेद्य मस्त..
बाप्पासाठी केशर घातलेले मोदक..
बाप्पा प्रसन्न झाला. अजून
बाप्पा प्रसन्न झाला. अजून लाजोचा नैवेद्य यायचा आहे.
वा सगळेच नेवैद्य सुंदर....
वा सगळेच नेवैद्य सुंदर....
सगळेच छान आहेत !
सगळेच छान आहेत !
सगळ्यांचेच नेवैद्य
सगळ्यांचेच नेवैद्य सुंदर....!!!
सगळ्यांचेच नैवेद्य सुपरडुपर!
सगळ्यांचेच नैवेद्य सुपरडुपर!
आम्ही गरीब आहोत. त्यामुळे
आम्ही गरीब आहोत.
त्यामुळे आम्ही फक्त साखर ठेवतो.
नैवेद्य बघूनच माझं पोट भरलं.
नैवेद्य बघूनच माझं पोट भरलं. किती निगुतीनं वाढलय... तितक्याच प्रेमानं रांधलं असणार. बाप्पा प्रसन्नं असल्याचं कळतचै...
जयंत, प्रेमानं ठेवली असणार तुम्ही साखर बाप्पासमोर... त्यानंही भरून पावलाय तो.
सर्वांचेच नैवेद्य मस्त.हा
सर्वांचेच नैवेद्य मस्त.हा आमचा नैवेद्य.

कसले सुपरडुपर मोदकम आहेत हे.
कसले सुपरडुपर मोदकम आहेत हे. माझ्या एका तमिळ कलिगने बनवले. उडीदाच्या डाळीचे सारण असलेले. कृती हवी असल्यास देईल.
बाप्पा ला प्रसाद माबो फेमस
बाप्पा ला प्रसाद माबो फेमस मलई बर्फी

मस्तच नैवेद्य आहेत सगळे!
मस्तच नैवेद्य आहेत सगळे! बाप्पा खुश!
लोला, वाटीत ते पांढरे ताक आहे का?
Pages