Submitted by वेल on 5 September, 2013 - 09:00
आता उभे आहोत आम्ही
जीवनच्या उंबरठ्यावरती
खुल्या जागाच्या प्रांगणात
पदार्पण करण्यासाठी.
इतके दिवस आम्ही
खरंच खूप लहान होतो
आईबाबा शिक्षकांच्या
पंखाखाली सुरक्षित होतो.
नजरेचा धाक तरी
मुक्तपणे बागडत होतो
कळत नव्हत तेच बालपण
तरी स्वच्छंगपणे विहरत होतो.
जरा खुट्ट झालं तरी
सारे मोठे सावरत होते
झाल्या चुका विसरून मग
प्रेमाने अम्हाला थोपटत होते.
आता मात्र सारेच धोके
आमचे आम्ही ओळखायचे
बालपण विसरायचे
आणि जबाबदारीने वागायचे.
१२.४.१९९७
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा