पिकनिक
'च्यायला, हा मधुकर कुठे मेलाय?' नाऱ्याने दुसरी सिगारेट संपवत गोपूला विचारले. 'अरे काय, माहिती कुठे बोम्बलला. साला आहे पक्का चमडी चोर, कुठे तरी जावून रात्र रंगीन केली असेल साल्याने'. तेवढ्यात त्यांना आरामात येत असलेला मधुकर दिसला .'साला, तो बघ कसा रमत गमत येतोय .एक तास लेट आलाय पण बेफिकिरी बघ त्याची .'तेवढ्यात मधुकर तिथे येवून हजर झाला. नाऱ्याच्या पाठीत गुद्दा घालून म्हणाला 'सिगारेट काढ'. 'अरे, मधुकर काय हा उशीर' गोपू करदावला.यावर मधुकर म्हणाला 'काल गम्मत म्हणून हातभट्टीची घेतली जाम किक बसली रे सकाळी उठवतच नव्हते'. चल बस गाडीत आधीच उशीर झालाय'.
मधुकर, गोपू नि नाऱ्या हे तिघे सक्खे मित्र एकाच ऑफिसात काम करत ऑफिसला तीन दिवस लागून सुट्टी आली होती. तेव्हा शहराबाहेरच्या जंगलात तिघांनी पिकनिकला जायचे ठरवले होते. तिघाही गडी एन जवानीत होते. अजून लग्न व्हायचे बाकी होते. यातला मधुकरहा अट्टल बेवडा होता बाई बाटली या सार्यांचा त्याला नाद तसेच नाद थोड्या फार प्रमाणात गोपू नि नाऱ्याला असल्याने त्यांची गट्टी चांगलीच जमली होती. मधुकर हा ह्या ग्रुपमध्ये अत्यंत चलाख होता पक्का गोडबोल्या पण अत्यंत घातकी असा त्याचा स्वभाव होता. गोपू व नाऱ्या त्याला मानत नेहमी त्याचा सल्ला घेत. .
सकाळी ९ वाजता ते चंपाकलीच्या जंगलात जावून पोहचले. चारही बाजूने डोंगराने हे जंगल वेढलेले होते. जंगलच्या कडेला आदिवासी वस्ती होती. गोपूने गाडी थांबवली कारण पुढे जायला रस्ता नव्हता. सारी पावूलवाट होती. त्यांनी गाडी तेथे लावली व आपापले सामान घेवून ते उतरले. अचानक गोपूचे लक्ष पाठी गेले ज्या रस्त्यावून ते आले होते तो नागमोडी रस्ता एकाद्या काळ्याभोर अजगरासारखा दिसत होता एखादे भक्ष्य खावून सुस्त पडलेल्या अजगराचीच आठवण गोपूला तो रस्ता पाहून आली नि तो शहारला. गोपू हा स्वभावाने धार्मिक होता व त्याचा शकुन भुते खेते यावर विश्वास होता. गोपूच्या चेहऱ्याकडे पाहून मधुकर म्हणाला काय झाले रे काही नाही एवढेच बोलून गोपू पुढे निघाला.
चंपाकलीच्या जंगलातली शांतता भयाण वाटत होती.रस्त्यावरचे दगड धोंडे चुकवत तिघे मित्र जंगलाची वाट चालू लागले. जंगले अस्ताव्यस्त पसरले होते. थोडी चढण चढून जाताच त्यांना तिथे एक तळे दिसले चारही बाजूनी झाडींनी वेढलेले ते तळे पाहून ते खुश झाले तेवढ्यात नाऱ्याचे लक्ष एका ठिकाणी गेले नि तो चमकलाच. दोन काळ्याभोर आदिवासी तरुणी त्या तळ्यात नहात होत्या. त्याने ते दृश्य मधुकर दाखवताच तो चेकाळलाच. त्याने आपल्या ब्याग मधून दुर्बीण काढली व तो त्या तरुणींना हावरटपणाने न्याहाळू लागला. शेजारीच नाऱ्यापण अनिमिष नेत्राने ते दृश्य पाहत होता.
गोपूने हि ते दृश्य पाहिले तो मधुकरला म्हणाला, 'चला, पुढे निघूया'. मधुकर म्हणाला, 'समोर असे दृश्य दिसत असताना तुला पुढे तरी कसे निघवते'. "अरे, लहान मुली आहेत त्या". 'सोळा, सतरा वर्षाच्या मुली तुला लहान वाटतात. तू न खरच साला येडचाप आहेस' मधुकर खेकसला.अचानक गोपूचे लक्ष तेथील एका जुन्या देवळाकडे गेले ह्या दोघांना त्याने सांगितले मी मंदिरात जातो. तुम्ही तिकडे या आणि फालतुगिरी करू नका. आपण अनोळखी जागी आहोत काय झाले तर लेण्याचे देणे पडतील. आमचे आम्ही बघु रे. तू जा देवळात असे त्याला बोलून मधुकर पुन्हा ते दृश्य पाहण्यात मग्न झाला.
गोपूने आपली पावले देवळाकडे वळवली. देवळात काळ्या दगडात कालीमातेची मूर्ती होती.देवूळ बरेच प्राचीन वाटत होते त्यातच देवळात बरेच दरवाजे होते. आत छोट्या छोट्या खोल्या होत्या. .गोपू हा देवीपुढे ध्यानस्थ बसला. इकडे तळया मध्ये न्हाणाऱ्या त्या दोन्ही वनकन्या आपली आंघोळ आटपून किनाऱ्यावर आल्या. आपल्याकडे वासनांध नजरा लागल्या आहेत ह्याची त्या बिचारींना जाणीवही नव्हती. त्या दोघी जशा तेथून निघाल्या तसे मधुकर नि नाऱ्या त्यांच्या मागे निघाले.
त्या दोघी जंगलातून सुक्या काटक्या वेचू लागल्या.हे दोघे त्यांच्या मागावरच होते तितक्यात त्यांना आवाज आला 'काय, साहेबानू काय चाललाय?' दोघेही दचकले.पाठी वळून पहिले तर एक जाडा अस्ताव्यस्त सुटलेला,डोक्याचा पूर्ण गोटा केलेला काळाढूस माणूस उभा होता. त्याने फक्त लंगोटी नेसली होती वरती तो पुरा उघड्बंब होता. त्याचे पोट एखाद्या नगाऱ्या सारखे सुटलेले होते. हसताना त्याचे पिवळे दात उठून दिसत होते. त्याला बघून दोघेही दचकले. मधुकर तत्परतेने म्हणाला काही नाही पिकनिकला आलो होतो. नाऱ्याची तर वाचाच बंद झाली होती. आपल्या हातातल्या सिगारेटकडे जाड्या हावरटपने बघतोय हे लक्षात आल्यावर ह्याला लपेटायला वेळ लागणार नाही. हे चाणाक्ष मधुकरच्या ध्यानात आले.
मधुकरनी त्याला विचारले 'सिगारेट घेणार?' जाड्याने हावरटपने सिगारेटवर झडप घातली. त्यानंतर मधुकरनी आपल्या ब्याग मधून व्हिस्कीचा खंबा काढला व जाड्याला विचारले 'घेणार का'?. नंतर जंगलात जाड्या, मधुकर नि नाऱ्या यांची पार्टी रंगली.चखना म्हणून नाऱ्याने वेफरचा पुडा काढला. तिघेही शांत चित्ताने दारू पिवू लागले.जस जशी दारू अंगात भिनू लागली तस तसे मधुकरचे डोके चालू लागले. मधुकरने आपले पाकीट काढले आणि त्यातला नोटा तो मोजू लागला. जाड्या चकित होवून त्या नोटांकडे पाहतच राहिला. आता हे सावज आपल्या ताब्यात येणार याची मधुकरला खात्री पटली.
ते ज्या जागी बसून दारू पीत होते तेथून त्यांना त्या पोरी दिसत होत्या. मधुकरनी जाड्याला विचारले 'तुमचे नाव काय?' 'बाळ्या' तोंडात वेफरचा बकाणा भरत जाड्या उद्गारला.'ह्या पोरी कोण आहेत?' मधुकरने विचारले 'अहो ह्या ती शकू नि ती बेबू.आमच्याच पाड्याच्या पोरी आहेत. त्या इथे रानात जळणासाठी लाकड गोळा करायला आल्यात'.मधुकरने व्हिस्कीचा अजून एक पेग जाड्याच्या ग्लासात ओतला जाड्याने ती कच्चीच दारू घशाखाली ओतली. मधुकरने आपले पाकीट बाहेर काढले त्यातल्या नोटा बाहेर काढल्या नि जाड्याला म्हटले 'ह्या दोन पोरी जर तू आम्हाला मिळवून देशील तर ह्या नोटा तुझ्या'. जाड्याने नोटांकडे पहिले व त्यांच्यावर झडप घातली व हसत म्हणाला,"सायबानु,इतके पैसे मिळाले तर मी ह्या दोघीच काय, साऱ्या गावच्या पोरी तुम्हाला आणून देयील. तुम्ही थांबा मी आलोच".
नाऱ्या मधुकर काय करतोय ह्याच्या कडे कौतुकाने बघत होता इतक्या वर्षाच्या अनुभवाने नाऱ्याने जाणले होते मधुकर जे काय करतो त्यामुळे फायदाच होतो. नाऱ्या हा शरीराने धष्टपुष्ठ होता. पण त्यांच्या तला खरा ब्रेन होता तो मधुकर. .
इकडे गोपूने मंदिरात आपले ध्यान संपवले अजून हे दोघे आले नाहीत हे पाहून तो ते मंदिर पाहत फिरू लागला. मंदिर अति प्राचीन होते व त्याचा विस्तारही मोठा होता. कालीमाता आपल्या लाल भडक नजरेने आपल्याला रोखून पाहत आहे असे त्याला वाटले. तो मंदिर पाहत फिरू लागला. काळ्या कातीव दगडांनी ते मंदिर बांधले होते बांधकाम ओबडधोबड होते. तेथे जी शांतता होती अंगावर येणारी होती.
इकडे जाड्या त्या दोन मुलीना घेवून मधुकर नि नाऱ्याकडे आला. त्या मुलीना त्याने सांगितले होते हे दोघा साहेबाना जंगल फिरवून दाखवा ते तुम्हाला १०० रुपये देतील १०० रुपयाच्या लालसेने त्या गरीब पोरी तयार झाल्या. त्यांना काय माहित त्यांच्यापुढे काय वाढून ठेवले होते. त्यां मुली ह्या दोघांना घेवून दाट जंगलात शिरल्या . तोच मधुकरने आपल्या हाताचा विळखा शकुच्या पाठून घातला. काय होते ते कळायच्या आधीच त्याने तिला गवतात टाकले व तिच्या शरीराशी तो झोंबू लागला. ती घाबरून गेली त्याचे पाहून नाऱ्यानेही बेबुला पकडले. ती ओरडू लागली तेव्हा त्याने आपला राठ पंजा तिच्या तोंडावर ठेवला. अंगात दारू भिनलेले ते दोघे त्या पोरींवर तुटून पडले. नंतर आपले काम उरकून मंदिराच्या दिशेने चालू लागले.
इकडे जंगलात काय चाललेय हे गोपूला अजिबात माहित नव्हते. तो मंदिराचे निरीक्षण करण्यात दंग होता. तितक्यात त्याला दोघे मंदिराकडे येताना दिसले. "काय, रे साल्यानो किती वेळ आणि हे काय तुमचे कपडे अशे मातीने का माखलेत? जंगलात कुस्ती खेळत होता कि काय'? "होय रे, कुस्तीच खेळलो पण त्या पोरींशी". मधुकर हसत हसत म्हणाला. नाऱ्या म्हणाला,"अस्सल रानमेवा खावून आलोत. तो हि कवळा". नि ते दोघेही हसू लागले ते एकूण गोपू मात्र भडकला. "साल्यानो काय केलेत तुम्ही त्या पोरींवर रेप केलात कि काय? मधुकर भडकला,"साल्या, गोपू तू न मामू तो मामुच राहणार आहेस. साल्या, फट्टू आहेस दुसर काय? चल जो भी होगा देखा जायेगा". आता मात्र ह्या जंगलात राहणे गोपूला धोकादायक वाटू लागले. तो ह्या दोघांना बोलला बस झाली पिकनिक चला आपण निघूया पण दोघेही एकायच्या मूडमध्ये नव्हते.ते तिघे थोडा वेळ मंदिरात थांबून बाहेर आले नि पायवाटेला लागले .
तोच समोरचे दृश्य पाहून मधुकरची नि नाऱ्याची दारू उतरली गोपू थरथर कापु लागला. समोर १०० ते १५० जणांचा आदिवासींचा जमाव जमला होता. सार्यांच्या हातात भाले नि लाठ्या काठ्या होत्या. त्यांना पाहून तो जमाव त्यांच्या दिशेने पळत पळत आरडा ओरडा करत येवू लागला. गोफणीतून सुटलेला एक दगड हा सणकन नाऱ्याच्या डोक्यावून गेला. तिघे वेड्यासारखे पळत सुटले. पळत पळत मंदिराच्या मागच्या दिशेने आल्यावर त्यांना भोसकून फेकलेले जाड्याचे प्रेत दिसले. ते डोळे वासून आपल्याकडेच पाहतेय असे मधुकरला वाटले. ते तिघे सुसाट गाडी लावली होती त्या दिशेने पळत होते.
सर्वात पुढे गोपू होता त्याच्या मागोमाग मधुकर नि शेवटी नाऱ्या होता. पाठून आदिवासी जवळ येत होते आरडा ओरडा चालू होता,"पकडा, त्या भडव्यांना, साल्यानी आपल्या पोरी बाटवल्या. एकभी जिता जाता कामा नये." पळताना गोफणीतून निघालेला एक दगड झपकन आला नि गोपूच्या डोक्यात बसला. गोपू तिथेच कोसळला मागून येणाऱ्या मधुकरने पडलेल्या गोपूच्या खिशात हात घालून गाडीची चावी काढून घेतली. नि तो सुसाट पळाला गोपू हा आश्चर्याने नि असहायपणे पाहताच राहिला. . तेवढ्यात पाठून आलेला नाऱ्या गोपूपाशी थबकला. पण पाठून येणारे आदिवासी पाहून तो हि पळत सुटला गोपू हा आदिवास्यांच्या तडाख्यात सापडला. पुढे पळणाऱ्या नाऱ्याच्या पाठीत एक भाला सपकन येवून घुसला तो त्याच्या पाठीतून निघून पोटातून आरपार गेला.
मधुकर मात्र बराच पुढे पोहचला होता. त्याने मागे वळून पहिले त्याला नाऱ्या पडलेला दिसला नि गोपूची कुऱ्हाडीने खांडोळी करत असलेले आदिवासी दिसले. त्याने झपाट्याने पुढे होवून गाडीचा दरवाजा खोलला.तितक्यात एक आदिवासींचा जमाव जवळपास येवून पोहचला. त्यांनी गाडीवर गोफणीचा मारा चालू केला. टपटप आवाज करत दगड गाडीच्या पत्र्याला पोचे पडू लागले. सार्या काचा फुटल्या एक दगड रपकन येवून मधुकरच्या कानावर बसला. पण त्याने त्याही अवस्थेत गाडी चालू केली नि तो शहराच्या दिशेने सुसाट सुटला. पाठी वळून पहिले तर मागावर असलेले आदिवासी मागे पडले होते त्यांचा आवाज कमी कमी होवून नाहीसा झाला होता.
इकडे जंगलात मात्र गोपू नि नाऱ्याच्या छीन्न, वीछीन्न झालेल्या प्रेतांवर गिधाडे तुटून पडली होती नि शांत असलेले चंपाकलीचे अरण्य गिधाडांच्या आवाजाने गजबजून उठले होते.
"लेण्याचे देणे पडतील" फालतू
"लेण्याचे देणे पडतील"
फालतू कथा आणि त्याहून फालतू (हिंदीमिश्रीत) मराठी.
ह्य पेक्षा पगारे साहेब आपली
ह्य पेक्षा पगारे साहेब आपली जुनी लाईन मस्त होती काँग्रेस् प्रचार करण्याची