"सकाळी सकाळी पूजा, स्वयंपाक करून ऑफिसला जा म्हणतात? कसं जमणार? कोण समजावणार साबांना?"
"दहा कामं एका वेळेस करायला मी काय मशिन आहे? पण बॉसला कोण सांगणार?"
"मी शाळेत असताना कित्ती मारकुट्या होत्या या बाई! शाळा म्हणलं की काटा यायचा यांच्यामुळे! कोणी तरी सांगायला हवं यांना!"
कित्ती काही सांगायचंय
या हृदयीचं त्या हृदयी पोहचवायचंय
मनात साठलंय बरंच काही,
त्यांच्यापर्यंत नेणार नाही?
आलीय बरं का संधी नामी
मन करा हलकं, भार होईल कमी
गणेशोत्सव तर निमित्तमात्र
मन करा मोकळं ,लिहा एकमेकांना पत्र!
पण थांबा थांबा, धीर धरा थोडा
आधी नियमावलीही वाचून काढा..
नियमावली
१. या स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाने दोन पत्रे लिहायची आहेत.दोन व्यक्तींनी एकमेकांना लिहिलेली असे कल्पून ही पत्रे लिहायची आहेत.शब्दमर्यादा नाही ,पण पत्रसंख्या मात्र दोनच आहे. एका व्यक्तीने लिहिलेले पहिले पत्र व त्याचे दुसर्या व्यक्तीने दिलेले उत्तर.
२. कधीकधी रोजच्या सामान्य संवादापेक्षा पत्र लिहिणे अधिक सखोल संवादासाठी आवश्यक असते याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. अगदी इमेलच्याही स्वरूपात आपण पत्रे लिहितो, संवाद साधतो.पत्र या माध्यमात काव्यमयता असू शकते किंवा सखोल विचार, मार्गदर्शन, निखळ संवादही. पत्रव्यवहाराची ही सर्व मनोहारी वैशिष्ट्ये या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जागवणार आहोत.
३. या दोन व्यक्तींमधले नाते कोणतेही असू शकते. दोन मित्र, दोन मैत्रिणी, आई-मुलगा/मुलगी, सासू-सून,प्रियकर-प्रेयसी,नवरा-बायको, कार्यालयातले सहकारी-वरिष्ठ इत्यादि इत्यादि .
४.पहिल्या व्यक्तीच्या पहिल्या पत्रातल्या प्रश्नांना, विसंवादाला, परिस्थितीला दुसर्या पत्रात दुसर्या व्यक्तीने उत्तर द्यायचे आहे ज्यातून एक नाते उलगडते, एक संवाद पूर्ण होतो,एक कथाबीज अंकुरते.
५. कोणालाही पत्रं लिहू शकता...
प्राण्याला,देवाला,अप्सरेला, राक्षसाला,मानवयोनीतल्या कुणालाही चालेल.
फक्त प्रत्युत्तर अपेक्षित आहे आणि ते तुम्हालाच लिहायचय हे लक्षात ठेवा !
६.पत्रांचा सूर विरोधाचा असू शकतो वा सहकार्याचा, प्रेमाचा, मदतीचा. कोणतीही भावना पण अर्थातच सभ्यतेची पातळी सांभाळून व्यक्त केलेली असावी.
वाटते आहे ना आव्हानात्मक ? मग चला सुरुवात कराच लिहायला. कदाचित तुमच्या किंवा जवळच्या कोणाच्या तरी आयुष्यातला एखादा नाट्यपूर्ण प्रसंग या पत्र-जोडीतून उलगडत जाईल..
स्पर्धेत भाग कसा घ्याल?
'' पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धेत भाग घेण्यासाठी नवीन लेखनाचा धागा उघडावा लागेल.
प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून,९ सप्टेंबर २०१३ (भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, १८ सप्टेंबर २०१३ (अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) स्वीकारण्यात येतील. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१३' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता 9 सप्टेंबरला खुला करण्यात येणार आहे.
१. 'मायबोली गणेशोत्सव २०१३ पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१३' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१३' या ग्रूपचे सभासद झाला आहात.
२. याच ग्रूपमध्ये उजवीकडे '' पत्र सांगते गूज मनीचे ''या शब्दांवर टिचकी मारा.
३. नवीन धागा उघडला जाईल. त्यात 'शीर्षक' या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :-
- '' पत्र सांगते गूज मनीचे '': मायबोली आयडी.
४. शब्दखुणा या चौकटीमध्ये मायबोली गणेशोत्सव २०१३ हे शब्द लिहा.
५. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
६. Save ची कळ दाबा.
७. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.
८. या स्पर्धेचा अंतिम विजेता मायबोलीचे सभासद मतदान पध्दतीने ठरवतील. या मतदानासाठीचा धागा अनंतचतुर्दशी नंतर उघडण्यात येईल व विजेत्याला ई-प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
अभिषेक तुम्ही लिहाच...छान
अभिषेक तुम्ही लिहाच...छान लिहिता तुम्ही.
सुशांत, एकाच धाग्यात दोन्ही
सुशांत, एकाच धाग्यात दोन्ही पत्रं, पत्र क्रमांक-१ आणि पत्र क्रमांक-२ अशी शीर्षके टाकून लिहायची आहेत.
मस्त ऊपक्रम आहे हां
मस्त ऊपक्रम आहे हां
मस्त आहे कल्पना
मस्त आहे कल्पना
आशूडींनी लिहिलेले पत्र
आशूडींनी लिहिलेले पत्र स्पर्धेच्या नियमांमध्ये बसते आहे का?
संयोजकांनी दिलेले स्पष्टीकरण :
<तुमचा अभिषेक,
पत्र लिहितांना तुम्ही स्वतः त्यातले एक हवेतच आणि पत्राची सुरुवातही तुमच्याकडूनच हवी. प्रत्युत्तर समोरून यायला हवं.>
अभिषेक यांनी व्यक्त केलेल्या शंकेप्रमाणे दोन तिर्हाइतांमधील पत्रसंवाद आशुडी यांनी लिहिला आहे.
भरत मयेकर, तसं असेल तर दोन्ही
भरत मयेकर, तसं असेल तर दोन्ही एंट्र्या बाद!
मामी, ते संयोजकांकडून नसून
मामी,
ते संयोजकांकडून नसून प्रशासकांकडून चुकुन झालं होतं. ते प्रतिसाद आणि त्या अनुषंगाने असलेला तुमचा प्रतिसाद काढून टाकला आहे.
ते संयोजकांकडून नसून
ते संयोजकांकडून नसून प्रशासकांकडून चुकुन झालं होतं. ते प्रतिसाद आणि त्या अनुषंगाने असलेला तुमचा प्रतिसाद काढून टाकला आहे.
>> ते माध्यम प्रायोजकांकडून झालं होतं. हे वेंधळेपणानं अथवा अनवधानानं नक्कीच झालं नव्हतं. कारण आशूडीच्या धाग्यावर 'तुम्ही लिहिलेल्या धमाल पत्राबद्दल' असा उल्लेख होता. शिवाय दोन धाग्यांवर ते बक्षिस दिलं होतं.
कृपया, सारवासारव न करता पूर्ण खुलासा द्यावा.
माध्यम प्रायोजकांकडून खुलासा
माध्यम प्रायोजकांकडून खुलासा अपेक्षित आहे. की अशी अपेक्षा अवाजवी आहे?
त्या अनुषंगाने असलेला तुमचा
त्या अनुषंगाने असलेला तुमचा प्रतिसाद काढून टाकला आहे. >> मी कोणताही प्रतिसाद आशूडीच्या अथवा फोटोच्या झब्बुच्या धाग्यावर दिला नव्हता.
ते गणेशोत्स्वातील
ते गणेशोत्स्वातील उपक्रम्/स्पर्धेसाठीचं बक्षीस नसून मायबोलीचाच दुसरा उपक्रम "माध्यम प्रायोजक"तर्फे तिकीट देण्याचा प्रशासनाचा विचार होता. त्यामध्ये अनवधानाने स्पर्धेतील एका प्रवेशिकेवर तो प्रतिसाद दिला गेला. हे लक्षात येताच तो काढलाही गेला आहे. यात सारवासारव करण्यासारखे काही नाही.
एक पूर्ण दिवस तो प्रतिसाद
एक पूर्ण दिवस तो प्रतिसाद तेथे होता त्यामुळे खुलासा पटलेला नाही. पण तुम्ही म्हणत आहात म्हणून वाद पुढे वाढवत नाही.
मामी आणि अडमिन कोणत्या
मामी आणि अडमिन कोणत्या बक्शीसाबद्दल लिहीतायत काही समजले नाही. प्रकरण मिटलेले असेल तर हरकत नाही पण नेमके काय घडले याची मला कल्पनाही नाही.
आताच एका बाफवर वाचले स्पर्धेचे नियम शिथिल केले आहेत. नेमके कोणते नियम बदललेत? माझी प्रवेशिका मी हेडरमध नियम पाळून लिहीली होती. आता जर ती बाद होत असेल तर हरकत नाही. मला लिहून मजा आली इतकं पुरे आहे.
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
यापुढे या स्पर्धेतील
यापुढे या स्पर्धेतील प्रवेशिका स्विकारणे बंद करत आहोत.
स्पर्धेसाठी खालील प्रवेशिका आलेल्या आहेत -
मामी : http://www.maayboli.com/node/45158
आशूडी : http://www.maayboli.com/node/45181
जाई. : http://www.maayboli.com/node/45319
जागू : http://www.maayboli.com/node/45311
घारुआण्णा : http://www.maayboli.com/node/45153
पुरंदरे शशांक : http://www.maayboli.com/node/45316
manee : http://www.maayboli.com/node/45323
जिगिषा : http://www.maayboli.com/node/45305
तुमचा अभिषेक : http://www.maayboli.com/node/45246
कविन : http://www.maayboli.com/node/45304
नजरचुकीने एखादी प्रवेशिका इथे लिहायची राहुन गेली असल्यास आठवण करुन द्यावी ही विनंती.
मतदानाचा धागा लवकरच खुला करण्यात येईल.
संयोजक गणेशोत्सव 2013 या
संयोजक गणेशोत्सव 2013 या उपक्रमाच्या बीबी वर पत्र सांगते या विभागात बाकीच्या प्रवेशिका दिसत नाहीयेत
ज़रा लक्ष देणार का
चांगली झाली स्पर्धा. काही
चांगली झाली स्पर्धा. काही पत्रं आवडली.
लिहावंसं वाटलं होतं खरं, पण दोन ओळी खरडल्या आणि डोस्कंरुपी घोडं पेंड खायला लागलं. पण ही आयडिया आवडलेली आहे. स्पर्धा संपली असली तरी हा फॉर्म (पत्रोत्तरं) वापरण्याची परवानगी असावी.
संयोजक, तीनही मतदानाच्या
संयोजक, तीनही मतदानाच्या धाग्यांवर प्रत्येकाच्या प्रवेशिकेच्या नावात त्या त्या धाग्याची लिंक दिलीत तर उत्तम होईल.
तसंच प्रत्येक मतदानाच्या धाग्यावर इतर दोन मतदानाच्या धाग्यांच्या लिंक्स दिल्यास, शोधाशोध करावी न लागल्याने, मतदारांचे जीवन सुखकर होईल.
.
.
धन्यवाद मामी, सर्व
धन्यवाद मामी, सर्व प्रवेशिकांवर सर्व मतदानाच्या धाग्यांचे दुवे दिलेले आहेत. इथेही देत आहोत.
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383
Pages