Submitted by संयोजक on 28 August, 2013 - 12:45
१) ही स्पर्धा नाही, उपक्रम आहे. वयोगट - ६ ते १५
२) उपक्रमात आपल्या पालकांच्या आय डी नेच भाग घ्यायचा आहे.
३) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
४) पत्र मुलांच्याच हस्ताक्षरात असावे.ते पत्र पालकांनी scan करून किंवा फोटो काढून sanyojak@maayboli.com या इ-मेल आयडी वर पाठवायचं आहे.
५) पत्र मराठी भाषेतच लिहिलेले हवे. पालकांनी मुलांकडून पत्र गिरवून घेतले तरी चालेल.
६) पालकांनी मुलांना मार्गदर्शन करावे पण मुख्य विचार व शब्द मुलांचेच असावेत.
७) प्रवेशिका १७ सप्टेंबर पर्यंतच स्वीकारल्या जातील.
.. मग छोट्या दोस्तांनो आता वाट कसली पहाताय? लिहिताय ना पत्र?
विषय:
Groups audience:
शेअर करा
*
*
वॉव... मस्त उपक्रम..
वॉव... मस्त उपक्रम..
संयोजक मंडळ एकदम जोरात आहे.
संयोजक मंडळ एकदम जोरात आहे. उपक्रम आला देखिल! मस्त आहे हा उपक्रम. धन्यवाद.
खूपच मस्त उपक्रम आहे, छान छान
खूपच मस्त उपक्रम आहे, छान छान पत्रं वाचायला मिळतील.
अरे व्वा! उपक्रम सुरु पण
अरे व्वा! उपक्रम सुरु पण झाले.. मस्तयं!
अरे वा छान आहे उपक्रम. आम्ही
अरे वा छान आहे उपक्रम. आम्ही भाग घेणार.
अरे वा.....मस्तच
अरे वा.....मस्तच
उपक्रमात आपल्या पालकांच्या आय
उपक्रमात आपल्या पालकांच्या आय डी नेच भाग घ्यायचा आहे.
>>
संयोजक,
माझ्या पुतण्याला जर भाग घ्यायचा झाला तर माझा (काकाचा) आय डी चालेल का?
राहुल, बहूतेक असं चालणार
राहुल, बहूतेक असं चालणार नाही. पुतण्याला भाग घ्यायचा असल्यास तुमच्या भावाला मायबोलीचे सदस्यत्व घ्यावे लागेल. (त् मायबोली सदस्य नाहीत असं मी गृहीत धरलंय. )
छान उपक्रम संयोजक.
माझा पोरगा सव्वापाच वर्षाचा आहे. मराठी मुळाक्षरं लिहिता येतात त्याला. काना-मात्रा कश्या लिहायच्या ते दाखवल्यास त्याला बहूतेक काही वाक्य लिहायला जमू शकतिल. त्याने भाग घेतला तर चालेल का?
पत्र मराठीतच पाहिजे काय?
पत्र मराठीतच पाहिजे काय?
पत्र मराठीतच पाहिजे काय? >>>>
पत्र मराठीतच पाहिजे काय?
>>>> हो बहुतेक. जसं सांता क्लॉजला मराठीतून पत्र लिहून चालणार नाही तसं गणपतीबाप्पाला इंग्रजीतून पत्र लिहून चालणार नाही.
आत्ताच हे लॉजिक लेकीच्याही गळी उतरवलं......
मामी, तू गप्प बस. संयोजक
मामी, तू गप्प बस. संयोजक सांगतील.
बाप्पाला सगळ्या भाषा कळतात. भारतात दक्षिणोत्तर जिथे गणपती पूजतात तिथं काय लोक मराठी बोलतात काय? आणि जगातले सगळे ख्रिश्चन इंग्लिश?
उपक्रमावरील प्रतिसादांसाठी
उपक्रमावरील प्रतिसादांसाठी आणि भाग घेण्याबाबतीत दाखवलेल्या उत्साहासाठी सर्वांना धन्यवाद.
राहूल, तुमच्या पुतण्याच्या आईला किंवा वडिलांना मायबोलीचं सदस्यत्व घेऊन त्यांना प्रवेशिका पाठवावी लागेल.
अल्पना, एवढ्या लहान मुलांना पत्र लिहिता येईल की नाही, हा विचार करुन ६ च्या पुढचा वयोगट ठेवलेला होता. पण तुम्ही तुमच्या त्या वयोगटापेक्षा लहान मुलाला भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहात, ही विशेष कौतुकाची बाब आहे. तेंव्हा तो भाग घेऊ शकतो.
लोला, पण आपली मायबोली मराठी असल्याने आपण मुलांना मराठीतून विचार करायला आणि लिहायला प्रवृत्त करायला हवे, प्रोत्साहन द्यायला हवे, यासाठी प्रवेशिका मराठीतच हव्या आहेत. तसे आता नियमांमध्ये लिहिले आहे.
लोला...
लोला...
उत्तराबद्दल धन्यवाद. >>आपण
उत्तराबद्दल धन्यवाद.
>>आपण मुलांना मराठीतून विचार करायला आणि लिहायला प्रवृत्त करायला हवे, प्रोत्साहन द्यायला हवे
ओके. मला वाटलं गणेशोत्सव म्हणजे बाप्पाशी संवाद, जवळीक, सणातला सहभाग याला प्राधान्य असेल. पण हरकत नाही. तुमच्या निर्णयाबद्दल आदर आहे.
धन्यवाद संयोजक. आम्ही नक्कीच
धन्यवाद संयोजक.
आम्ही नक्कीच प्रयत्न करु.
गणेशोत्सव म्हणजे बाप्पाशी
गणेशोत्सव म्हणजे बाप्पाशी संवाद, जवळीक, सणातला सहभाग याला प्राधान्य असेल.>>> हो लोला. अर्थातच, याला प्राधान्य आहे. मात्र त्याबरोबरच हे संकेतस्थळ मराठीत असल्याने मराठीतून लिहिण्याला प्रोत्साहन दिले जावे, ही अपेक्षा आहे. धन्यवाद.
छान स्पर्धा संयोजक. माझ्याही
छान स्पर्धा संयोजक.
माझ्याही साडेपाच वर्षाच्या मुलाला २-४ ओळींचं पत्र लिहायचं आहे. नक्की भाग घेऊ.
वा! मस्त उपक्रम. लहानग्यांची
वा! मस्त उपक्रम. लहानग्यांची पत्र वाचायला खूप छान वाटतं. भाग घेण्याचा प्रयत्न करू.
मस्त कल्पना आणि छान उपक्रम..
मस्त कल्पना आणि छान उपक्रम.. वाचायला मजा येणार एकेक..
सर्व बच्चेकंपनीला शुभेच्छा
संयोजक पत्राची मेल पाठवली
संयोजक पत्राची मेल पाठवली आहे. क्रुपया मिळाली का पहा.
धन्यवाद.
संयोजक, बाप्पाला पत्र उपक्रम
संयोजक, बाप्पाला पत्र उपक्रम सगळ्यात जास्त आवडला. छोट्या मुलांनी निरागसपणे लिहीलेली पत्रं, त्यांचं अक्षर इ. सगळं बघून फार म्हणजे फारच छान वाटलं पहिल्याच दिवशी. अजून भरपूर पत्रं वाचायला मिळतील ही मोठ्ठीच मेजवानी आहे. धन्यवाद या उपक्रमाकरता.
आमच्याकडे आज विचारुन बघते पत्र लिहीणार का म्हणून ? लिहीलं तर मी अजूनच जास्त खूष होईन.
धन्यवाद मवा तुमच्याकडच्या
धन्यवाद मवा तुमच्याकडच्या पत्राची वाट पहात आहोत.
संयोजक, पत्र पाठवले आहे.
संयोजक, पत्र पाठवले आहे.
संयोजक, प्रत्येक पत्रावरती
संयोजक,
प्रत्येक पत्रावरती "श्री" लिहायची सुचना कराल का ? एकतर लहान मुलांना श्री काढायचा सराव होईल आणि
पत्रावरती सर्वप्रथम तसे लिहायचा आपला एक प्रघात आहे. हि कला आता लुप्त होत चालली आहे त्याला तुम्ही प्रोत्साहन देता आहात ते चांगलेच आहे. पण आपला एक चांगला प्रघातही पाळला जावा असे वाटते.