अजुन एक बातमी, अन सगळ्यांची चीडचीड. तारस्वरात ओरडणारे चॅनेल्सवाले आणि मग सरकारची कासवाच्या, किंबहुना अधिकच संथपणे काही प्रतिक्रिया. मागील काही दिवसात ह्या घटना पुन्हा-पुन्हा होत आहेत. या घटनांनी "बलात्कार्याला फाशीच" दिली पाहिजे असे म्हणणारेसुद्धा वाढत आहेत. पण खरच फक्त ज्यांनी प्रत्यक्ष गुन्हा केला तेच दोषी आहेत का? त्यांना त्वरीत पकडणे, खट्ला चालवणे, शिक्षा करणे, इतकं पुरसं आहे का?
काही देशांत बलात्कारी पुरुषास देहदंडाची शिक्षा असल्याचे वाचले. मग त्या देशात बलात्काराचे प्रमाण कमी असायला हवे, पण तसेही नाही. तिथेही बलात्कार होतातच. मुळात कोणताही व्यक्ती गुन्हेगार का होतो, हे समजुन न घेता आपण फक्त गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे, असं का म्हणतो? की मुळ प्रश्नाकडे आणि त्याच्या मुळातुन कराव्या लागणार्या उपायांकडे आपण लक्षत देत नाही का?
आकडेवारीवर नजर टाकली तर बरेचसे गुन्हे हे अर्धशिक्षित वा अशिक्षीत लोकांनी केले आहे. म्हणजे त्या व्यक्तीची शालेय किंवा अ-शालेय शिक्षणातुन वैचारिक पातळी उंचावण्याचे कोणतेही प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत नाही किंवा तसे होत असतील तर त्याला आपणतरी किती हातभार लावतो?
मुळात मी बरोबर आणि दुसरा चुक असच मानुन आपण नेहमी दुसर्याकडे बोट दाखवतो. पण आपणही तितकेच दोषी नाही का? छोट्या छोट्या गोष्टीत "जाउ दे नं" म्हणत आपणही भ्रष्टाचाराला मदतच केली आहे नं. स्पर्धा म्हणत जगता कुठेतरी कोणाचा पतंग कापलाच ना? मुल्य हरवले म्हणताना आपणही ती मुल्ये खरच संवर्धन करायला काय करतो आहे. समाजात जे घडते त्याला आपण कमीअधिक प्रमाणात दोषी आहोतच. पुढची पिढी यासाठी आपल्याला माफ करणार नाही यात शंकाच नाही.
दोषी कोण?
Submitted by विजय देशमुख on 27 August, 2013 - 06:56
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आकडेवारीवर नजर टाकली तर
आकडेवारीवर नजर टाकली तर बरेचसे गुन्हे हे अर्धशिक्षित वा अशिक्षीत लोकांनी केले आहे.
सुशिक्षित गुन्हेगार त्याहून जास्त धोकादायक. कारण त्यांना कायदे वगैरे माहीत असतात. वकील गाठणं, त्याला पोसणं हेही त्याना येत असतं.