बलात्कार, खून, भ्रष्टाचार यांच्या बातम्या आता आपल्या सवयीच्या झाल्या आहेत. इतक्या सवयीच्या की अनेकदा आपण या बातम्यांकडे दुर्लक्ष करतो.
काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ साहित्यिक श्री. रत्नाकर मतकरी यांनी एका दिवाळी अंकात कथा लिहिली. पैशाचं आकर्षण असणार्या, बरंच काही मिळवण्याच्या मागे धावणार्या आणि आपल्या मुलानं यशस्वी राजकारणी बनावं यासाठी धडपडणार्या जोडप्याची ही कथा होती. वाचकांनी या कथेचं प्रचंड कौतुक केलं.
आशिष हा आजच्या काळातला एक शहरी तरुण. एका मोठ्या अमेरिकन कंपनीत तो नवी नोकरी सुरू करणार आहे. त्याची पत्नी प्राची. लवकरात लवकर भरपूर पैसे मिळावेत, आणि उच्चभ्रू वर्गात जागा मिळवावी, ही तिची इच्छा. या दोघांचा मुलगा सोहेल. मोठं होऊन त्यानं राजकारणात उतरावं, हे त्याच्या आईवडिलांचं स्वप्न. त्यासाठी आत्तापासून सोहेलवर योग्य ते संस्कार होतील, याची काळजी ते घेतायेत. सोहेलही अतिशय आत्मकेंद्री वृत्तीचा. आईवडिलांच्या महत्त्वाकांक्षा तो पूर्ण करेल, याची खात्री वाटणारा.
पण मग एका घटनेमुळं हा सारा डोलारा कोसळेल की काय, असं वाटू लागतं.
काय नैतिक आणि काय अनैतिक, हे प्रश्न उभे राहतात.
![invposter1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4614/invposter1.jpg)
ज्येष्ठ साहित्यिक श्री. रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेला व दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट 'इन्व्हेस्टमेंट' २० सप्टेंबर, २०१३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे.
या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांनी व रसिकांनी गौरवलं आहे.
मुंबईत एका दिमाखदार समारंभात नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली.
चित्रपटाशी संबंधित सर्व तंत्रज्ञ व कलाकार यावेळी उपस्थित होते.
मायबोलीचे प्रतिनिधी म्हणून इंद्रधनुष्य व योगेश कुळकर्णी यांनी या सोहळ्यास हजेरी लावली.
या सोहळ्यात इंद्रधनुष्य यांनी काढलेली काही छायाचित्रं -
इन्व्हेस्टमेंट
दिग्दर्शन - रत्नाकर मतकरी
सहदिग्दर्शन - गणेश मतकरी
छायालेखन - अमोल गोळे
संकलन - सागर वंजारी
ध्वनिलेखन - दिनेश उचिल, शंतनु अकेरकर
पार्श्वसंगीत - माधव विजय
कलादिग्दर्शन - सचिन भिलारे, अजित दांडेकए
वेशभूषा - सुप्रिया विनोद, वीणा दाभोळकर
कार्यकारी निर्मात्री - पल्लवी मतकरी
सहनिर्माते - मंदार वैद्य, अनीश जोशी
निर्माते - प्रतिभा मतकरी (महाद्वार प्रॉडक्शन्ससाठी)
प्रमुख भूमिका -
आशीष - तुषार दळवी
प्राची - सुप्रिया विनोद
आई - सुलभा देशपांडे
संदेश गडकर - संजय मोने
गांगण - संदीप पाठक
सौ. गांगण - भाग्यश्री पाने
सोहेल - प्रहर्ष नाईक
रजत पोपट - सोहम कोळवणकर
![investmentpress.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4614/investmentpress.jpg)
सही. कधीपासून वाट बघतीये या
सही. कधीपासून वाट बघतीये या चित्रपटाची. नक्की बघणार.
सहीच! नक्की बघणार आहे हा
सहीच!
नक्की बघणार आहे हा सिनेमा.
(No subject)
बघण्याची उत्सुकता आहे.
बघण्याची उत्सुकता आहे. आतापर्यंत फार चर्चा न झालेले, पण आधुनिक आणि इथून पुढच्या जीवनशैलीला जवळचे वाटतील अशा विषयांवरचे सिनेमे मराठीत येऊ लागणे हे सुचिन्ह वाटते. 'रत्नाकर मतकरी' हा एक्स फॅक्टर आहेच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
योकु आणि इंद्रा... सही आता
योकु आणि इंद्रा... सही आता प्रिमियरेचे पास कधी देणार ते ही सांगा पट पट बरं
वेगळा विषय वाटतोय. नॉर्मली
वेगळा विषय वाटतोय. नॉर्मली आईवडील ज्या प्रकारचे संस्कार मुलांवर करु पाहतात (मग भले शिक्षणाच्या बाबतीत स्वतःच्या इच्छा त्यांच्यावर लादोत), त्यापेक्षा वेगळीच महत्वाकांक्षा ठेवून त्यानुसार संस्कार स्वतः नोकरदार असूनही करणे म्हणजे नक्कीच वेगळं काही बघायला मिळेल असं वाटतंय.
नक्की बघणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बघण्याची उत्सुकता आहे.
बघण्याची उत्सुकता आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा ! मस्त वाटतोय विषय..
अरे वा ! मस्त वाटतोय विषय.. पहीन नक्की
'नारबाची वाडी'सुद्धा २० लाच
'नारबाची वाडी'सुद्धा २० लाच प्रदर्शित होतोय.. कुठला पाहावा..? असा प्रश्न आत्तापासूनच पडलाय..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आकर्षक आहे कथानक.. सुलभा
आकर्षक आहे कथानक..
सुलभा देशपांडेंची मुलाखत वाचल्यापासून हा सिनेमा पाहण्याचे वेध लागलेत