"औरंगजेब" हा मध्यंतरी येउन गेलेला चित्रपट नुकताच पाहिला. त्याचे थोडक्यात परीक्षण. काही काही गोष्टी स्वतः थेट बघितल्यास जास्त परीणामकारक होतील म्हणून जास्त येथे लिहीत नाही.
पहिल्या पाच मिनीटांत या चित्रपटाने जे खिळवून ठेवले ते शेवटपर्यंत सोडले नाही. दोन मिनीटे उठताना सुद्धा "पॉज" करून उठावे लागणे हे हिन्दी चित्रपटांच्या बाबतीत फार कॉमन नाही. मात्र यात, त्यातही सुरूवातीला, तुम्ही नीट लक्ष दिले नाहीत तर महत्त्वाचे क्लूज निसटतील. अत्यंत लक्ष देऊन पाहण्याचा चित्रपट आहे हा.
इण्ट्रोला असलेल्यांपैकी दोन जण सुरूवातीला सारखेच दिसल्याने फार गोंधळ झाला. मग पुन्हा मागे जाऊन सर्व कलाकारांची ओळख करून घेतली. तसे इतरांचे होऊ नये म्हणून ही थोडक्यात माहिती:
ऋषी कपूर: डीसीपी रविकांत फोगात
पृथ्वीराज सुकुमारनः एसीपी आर्य फोगात. ऋषी कपूरचा पुतण्या.
सिकंदर बेरी (खेर): देव. ऋषी कपूरचा मुलगा.
अनुपम खेरः विजयकांत फोगात. आर्य त्याचा मुलगा.
सुमीत व्यासः विष्णू. ऋषी कपूरचा जावई
जॅकी श्रॉफः यशवर्धन. गँगस्टर्/माफिया
अर्जुन कपूरः अजय आणि विशाल. जॅकीची जुळी मुले.
अमृता सिंगः नीना. डीलमेकर, जॅकी बरोबर काम करणारी
तन्वी आजमी: जॅकी ची त्याला सोडलेली बायको. यापेक्षा आणखी माहिती न देणे योग्य.
रविकांत, देव व आर्य हे पोलिसखात्याच्या भ्रष्ट पैशाच्या चेन मधले लोक. विष्णू हा इमानदार असल्याने यापासून त्याला लांब ठेवलेला. अनुपम खेरही मूळचा पोलिस ऑफिसर पण जॅकीचे एनकाउंटर करण्याच्या वेळेस गडबड झाल्याने नोकरी गेलेला. मरायच्या आधी तो आर्यला सांगतो की त्याच्या जीवनात आणखी एक स्त्री व मुलगा आहे. त्याच्या पश्चात त्यांची जबाबदारी आर्यवर आहे. त्यानंतर तो मेल्यावर आर्य त्यांना भेटायला जातो व तेथून जे नाट्य सुरू होते ते शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते.
सर्वांची कामे जबरदस्त झाली आहेत. अगदी अमृता सिंगचे सुद्धा. ऋषी कपूरतर आजकाल पूर्ण कात टाकूनच आलेला आहे. सर्वात जबरी वाटतो तो यात. त्याचा "Menace" दाखवण्याकरिता की काय पण मान थोडी समोर झुकवून बोलण्याची पद्धत फार परिणामकारकरीत्या वापरली आहे यात त्याने.
खरा हीरो अर्जुन कपूर आहे आणि त्याने काम चांगले केले आहे. थोडा डोक्यात जातो तो, पण एकूण ठीक. अशा रोलच्या मानाने आवाज नाजूक वाटतो त्याचा. जॅकीचा ही रोल मस्त आहे. पृथ्वीराज सुकुमारन हा मल्याळम चित्रपटांत बरीच वर्षे आहे अशी वेब वर माहिती मिळाली. त्याचा रोल मध्यवर्ती आहे यात, त्यानेही चांगले काम केलेले आहे.
गाणी बरीचशी पळवल्याने कळाली नाहीत. पटकथा एकदम सुरेख लिहीलेली वाटते. कथेतील प्रसंग व कलाकार त्यांच्या भूमिकेतून तेथे कसे वागतील याबद्दल खूप विचार करून लिहीलेली असावी. गुन्हेगारीवरचे असे चित्रपट पाहताना नकळत आपण गॉडफादरशी किंवा गाय रिचीच्या चित्रपटांशी(***) काही लिन्क लागते का असे शोधतो, पण हा चित्रपट तेथेही आपल्याला 'पकडू' देत नाही. शेवटी एका मीटिंग मधल्या रेडच्या वेळचा सीन हा फक्त अपवाद (तो गाय रिचीच्या चित्रपटात सहज खपेल). औरंगजेब नावाचा संदर्भ नंतर येतो, तो ही चपखल आहे.
एकूण माझ्याकडून १००% रेकमेण्डेशन. नक्की पाहा. पाहताना पूर्ण लक्ष देऊन पाहा. जबरदस्त थ्रिलर आहे.
(***) गाय रिची म्हणजे Lock Stock and Two Smoking Barrels सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक. या चित्रपटावरून आपल्याकडे हेरा फेरी-२ काढला होता. आपला कमीने सुद्धा याच दिग्दर्शकाच्या धाटणीचा.
फारेण्डा, आपण या सिनेम्याला
फारेण्डा,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आपण या सिनेम्याला जायचं सोडून तो दुसरा सिनेमा बघितला होता.
परीक्षण आवडलं.
ती खरंच उत्तम अभिनेत्री आहे.
<अगदी अमृता सिंगचेसुद्धा> हा उल्लेख आवडला नाही.
श्या!! भ्रमनिरास झाला... मला
श्या!! भ्रमनिरास झाला... मला वाटलं सिनेम्याची चिरफाड असेल![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला हा सिनेमाच माहित नव्हता म्हणा
श्या!! भ्रमनिरास झाला... मला
श्या!! भ्रमनिरास झाला... मला वाटलं सिनेम्याची चिरफाड असेल.. +१
माझ्याकडे या सिनेम्याची
माझ्याकडे या सिनेम्याची डीव्हीडी आहे, इतक्या दिवसात कधी पाहिला नव्हता, आता हे परीक्षण वाचून बघेन. ऋषी कपूरबद्दल मात्र अनुमोदन. उत्तम अभिनेता असूनदेखील इतकी वर्शं चॉकोलेट हीरो म्हणून काम केल्यावर त्याला सेकंड इनिंगमधे इतके मस्त रोल्स मिळत आहेत आणि तो ते अतिशय उत्तमरीत्या पार पाडतोय.
एकूण माझ्याकडून १००%
एकूण माझ्याकडून १००% रेकमेण्डेशन.> माझ्याकडून पण. मी हा सिनेमा रिलीझ झाला तेव्हाच बघितलेला. मोठया स्क्रीन वरच बघायला पाहिजे. अर्जुन कपूर चे काम आवडले. ऋषी कपूर फॅन्टास्टिक. टिपिकल हिरॉईन नाही म्हणून जास्त आवडला.
गुन्हेगारीवरचे असे चित्रपट पाहताना नकळत आपण गॉडफादरशी किंवा गाय रिचीच्या चित्रपटांशी(***) काही लिन्क लागते का असे शोधतो, पण हा चित्रपट तेथेही आपल्याला 'पकडू' देत नाही. > अनुमोदन.
धन्यवाद, अमोल. नक्की बघणार.
धन्यवाद, अमोल. नक्की बघणार.
गॉडफादर - हा चित्रपटाची सावली
गॉडफादर - हा चित्रपटाची सावली त्यानंतर आलेल्या सगळ्याच चित्रपटांमधे दिसते
मला हा सिनेमा मुळीच आवडला
मला हा सिनेमा मुळीच आवडला नाही.
चिरफाड करण्यासाठी अगदी योग्य सिनेमा.
"तेरा बाप, तेरा बाप नही है| मेरा बाप, तेरा बाप है|"
"मेरे जख्म के खुन का पसीना....." आणखी आठवत नाही.
असे संवाद भरपुर आहेत ह्या सिनेम्यात.
ऋषी कपूरबद्दल मात्र अनुमोदन.
राहिला आहे हा पाहायचा....
राहिला आहे हा पाहायचा.... त्यावेळि दुसरा कुठला तरी पाहिला गेला होता...
आता डाऊनलोड करून पाहीन, नक्कीच..
ऋषी कपूरला जरा उशीरानेच तो स्वतः गवसला आहे, बहुधा.. खूप वर्षं स्वतःला वाया घालवलं त्याने..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
श्या!! भ्रमनिरास झाला... मला
श्या!! भ्रमनिरास झाला... मला वाटलं सिनेम्याची चिरफाड असेल.. +१००
अरे फारुभाई ये क्या लिखा है?
अरे फारुभाई ये क्या लिखा है? चक्क पिच्चर अच्छी है बोलके? अर्जुन कपुर प्रतिक बब्बर नाही हे वाचून बरे वाटले.
मला आवडला हा सिनेमा.
मला आवडला हा सिनेमा.
छान आहे हा पिक्च्रर..मला
छान आहे हा पिक्च्रर..मला आवडला होता..
श्या!! भ्रमनिरास झाला... मला
श्या!! भ्रमनिरास झाला... मला वाटलं सिनेम्याची चिरफाड असेल>>> मलाही![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी गेल्याच आठवड्यात बघितला.
मी गेल्याच आठवड्यात बघितला. मुख्य म्हणजे कुणालाचा नाच / गाणे नाही त्यामूळे सर्व कलाकारांचे बेअरींग टिकलेले आहे. कथेतील काही घटना, हिंदी सिनेमासाठी अगदी नवीन आहेत. अर्जून दोन्ही रोलमधे शोभला.
( मी इश्कजादे बघितलेला नाही. )
( दिप्ती नवल आणि स्वरा पण आहेत, चित्रपटात. )
माझा बघायचा राहून गेला होता
माझा बघायचा राहून गेला होता हा. आता बघणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारएन्डः तुमच्या परिक्षणामधला
फारएन्डः तुमच्या परिक्षणामधला शब्द न शब्द खरा आहे. खरोखरच एक अतिशय खिळवून ठेवणारा,, मस्त सिनेमा आहे. मस्ट सी!
ऋषी कपूरला जरा उशीरानेच तो स्वतः गवसला आहे, बहुधा.. खूप वर्षं स्वतःला वाया घालवलं त्याने..
अस का म्हणता? सरगम, कर्ज, प्रेमरोग, दुसरा आदमी, लैला-मजनू (आता खूपसे आठवत नाहीत) असे खूप छान सिनेमा त्याने दिले आहेत त्यात त्याचा अभिनय पण छान होता.
कालच हा सिनेमा पाहिला..
कालच हा सिनेमा पाहिला.. अप्रतिम....
पहिल्या पाच मिनीटांत या चित्रपटाने जे खिळवून ठेवले ते शेवटपर्यंत सोडले नाही.>>> +१०००
पहातेच आता. झोपाळु वाटला होता
पहातेच आता. झोपाळु वाटला होता बोनी चा मुलगा म्हणुन पहायची इतकी इच्छा होत नव्हती. आता पहाणार. (लेख वाचला नाही फक्त पहिल्या ४ ओळी वाचल्या).
मला आवडलेला औरंगझेब. फक्त
मला आवडलेला औरंगझेब. फक्त अर्जुन कपूरला टपोरी भूमिका जेव्हढ्या सहज जमतात तेव्हढ्या सभ्य भूमिका सहज जमतात असे वाटत नाही. कदाचित इश्कझादेचा परीणाम असेल. अम्रुता सिंग बद्दल चिन्मयने वर लिहिलय त्याला अनुमोदन. पृथ्वीराज सुकुमारन पण गुणी अभिनेता वाटतो. सिनेमातला सगळ्यात कमकुवत भाग म्हणजे ज्या कारणासाठी तन्वी आझमी अनुपम खेर बरोबर राहते ते. ते fitting वाटत नाही पण fast pace मूळे फार फरक पडत नाही.
बघावा लागेल. ऋषी कपुरबद्दल
बघावा लागेल. ऋषी कपुरबद्दल अगदी बरोबर. आजकाल खुप चांगल्या भुमिका करतोय. बहुदा आता चॉईस करायला मिळत असाव्या. त्याचा आणि नीतूसिंगचा एक चित्रपट खुप आवडला होता. नाव विसरलो.
हा बघतो.
नक्की बघणार. (मलाही नेहमीची
नक्की बघणार.
(मलाही नेहमीची विनोदी चिरफाड असेल असं वाटलं होतं.)
सलमा आगा च्या मुलीचा उल्लेख
सलमा आगा च्या मुलीचा उल्लेख झाला नाही की केला नाही (नाव माहित नाही) ??? .....उल्लेख करण्यासारखं बहुतेक काही नसावं...पण परवाच एका आर्किटेक्ट च्या पार्टीत ती दिसली होती... ( काय करत होती तिथे काय माहित ) पण अजुनही औरंगजेबच्या साच्यातुन बाहेर आलेली वाटत नव्हती...अॅटिट्युड जबरस्त आहे तिचा...एक फ्रेशर स्टुडंट ने तीच्याबरोबर फोटो काढायची रिकवेस्ट केली तर मान झटकुन निघुन गेली ना राव ती....इतका भाव तर कॅटरीना पण नाही खात...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पिक्चरमधेही माझ्या डोक्यात
पिक्चरमधेही माझ्या डोक्यात गेली ती, म्हणून काहीच लिहीले नाही.
अमृता सिंग बद्दलः तिची ओळख 'बेताब' व 'मर्द' मधून झाल्यानंतर तिचे फारसे चित्रपट पाहिलेले नाहीत. आईना मधे बहुधा तिने चांगले काम केल्याचे ऐकले होते. पण जास्त माहिती नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारएण्ड, 'चमेली की शादी'ला
फारएण्ड,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'चमेली की शादी'ला विसरू नका.
हो त्याबद्दलही ऐकले होते.
हो त्याबद्दलही ऐकले होते. तोही पाहिलेला नाही. बहुधा अमजद खानच्या कामाबद्दल तेव्हा जास्त ऐकले होते.
'चमेली की शादी'ला विसरू
'चमेली की शादी'ला विसरू नका<<< हेच लिहिणार होते. माझा अत्यंत आवडता पिक्चर, अनिल कपूर आणि अमृतासिंग दोघांची धमाल आहे.
आईनामधला तिचा रोल चांगला होता, पण खूप स्टीरीओटाईप होता. अमृता सिंग एका टीव्ही मालिकेत काम करायची तेव्हा तिने मस्त काम केलं होतं.
विजय, दो दुनी चार का ? ऋषि
विजय, दो दुनी चार का ?
ऋषि कपूर ने वजन कमी करायला पाहिजे. त्याला आणखी चांगले रोल मिळतील.
पिक्चरमधेही माझ्या डोक्यात
पिक्चरमधेही माझ्या डोक्यात गेली ती, म्हणून काहीच लिहीले नाही.>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारेन्डा चित्रपट पाहिला नाही
फारेन्डा
चित्रपट पाहिला नाही पण चार राजकुमार असतील तर औरंगजेब नाव नक्कीच काही संशय मनात आणते.
चित्रपट नक्कीच पाहिला जाईल.
चमेली की शादी + १
Pages