विषय क्र. १. राममंदिर निर्माण चळवळ
पार्श्वभूमि:
जरी हल्ली असे म्हणत असले की सद्यस्थितीतील भारताचे लोकतांत्रिक एकछत्री रूप १९४७ नंतरच निर्माण झाले व तसे होण्यास बर्याच अंशी इंग्रजांची राजवट कारणीभूत झाली. त्याशिवाय असा गैरसमजही पसरवला जात असला की संवैधानिक राजवट ही केवळ इंग्रजांमूळेच इथे रुजली अन्यथा या देशाला स्वतःचे असे रूपडेच नव्हते, तरी असे म्हणणारे हे विसरू पहातात की आसेतू हिमाचल व गांधार प्रांत ते पुर्वेकडे ब्रह्मदेशापर्यंत या भूमिवर असंख्य लहानमोठ्या राजेरजवाडे/संस्थानिक यांचे राज्य असले तरी याच सर्व भूमिवर धार्मिक अधिसत्ता होती ती त्रिदेवांचीच! ब्रह्माविष्णुमहेश्वर व अन्य असंख्य हिंदू देवदेवतांचे पूजनामुळे असंख्य राज्ये/संस्थानांमध्ये विभागला गेलेला या भूमिवरील समाज तरीही एकच होता.
या सहिष्णु, अन म्हणूनच बेसावध बनलेल्या समाजावर तितकीच पराकोटीची बाह्यशक्तिंची/परकीयांची/परधर्मियांची क्रूर आक्रमणे झाली, व संख्याबळाच्या जोरावर कोणे एकेकाळचे हिंदू धार्मिक अधिसत्तेखालील गांधारप्रदेश/ब्रह्मदेश वगैरे बाबी इतिहास जमा होऊन आजचा भारत दृष्य स्वरुपात उभा राहीला.
गेल्या शतकातील स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात घडलेल्या अनेक घडामोडी/बदलांमुळे येथिल जनजीवन ढवळून निघालेच, शिवाय येथिल ग्रामव्यवस्थेची एकजूट अन जातीपातीतील सामंजस्य संपविण्याचे मागे इंग्रजांनी रुजविलेल्या व एतद्देशियान्नी उचलून धरलेल्या फूटीचे तंत्रदेखिल काम करुन गेले.
त्याचबरोबर, स्वातंत्र्योत्तर काळातील अपवाद वगळता तत्कालिक देशधुरीण "निधर्मवाद" की "अलिप्ततावाद", का अलिप्ततावाद जोपासण्याकरता व बाह्य शत्रू वाढू नयेत म्हणून धर्माचे आधारावर फाळणी झालेल्या या देशास "निधर्मी" ठरविण्याचे वैचारिक गोंधळात सापडलेला होता, ज्याचे पर्यवसन नंतर लोकशाहीतील संख्यात्मक एकगठ्ठा मतांचे बळावर सत्तेवर रहाण्याकरता (कम्युनिस्ट) निधर्मी ते सर्वधर्मसमभावी इथवर झाले.
या सर्वच काळात असंख्य घटना/निर्णय यामुळे येथिल हिंदू समाज त्यातिल जातीपातींमधे जास्तीत जास्त फूटून एकमेकांपासून दूर होऊन हिंदू म्हणून विस्कळीत कसा होईल याची कारस्थाने नित्य पहायला मिळाली.
गेल्या शतकातच नव्हे, तर गेल्या आख्ख्या सहस्रकात हिंदू म्हणून जगत असलेल्या या भूमिवरील व्यक्ति, राणाप्रताप/छ. शिवाजीराजे यासारखे अपवाद वगळता कधीही एकत्रितपणे हिंदू म्हणून खडबडून जागे झालेत/कृति केलीये असे झाले नाही. अर्थात सहिष्णुततेची परिसीमा गाठलेल्या या भूमिवासियांन्नी सगळेच अत्याचार मुकाट सोसले असेही झाले नाही. कित्येक धार्मिक आक्रमणान्नी येथिल त्रिदेवांवरील निष्ठा तसूभरही कमी झाली असेही झाले नाही. पण तरीही, अन्य धर्म/वंश/राष्ट्रांप्रमाणे येथिल समाज एकसमयावाच्छेदेकरुन शत्रूंच्या प्रतिकारास संघटीत पणे उभा राहिलाय असेही दिसले नाही.
होय, पानिपतावर लाखो मराठे मारले गेले तरीही हेच म्हणावे लागते कारण त्यावेळेस उत्तरभारतातील अन्य हिंदू राजेरजवाडे केवळ हातावर हात धरुन बसुन होते. कदाचित सत्ताकारणाचे त्यांच्या वैयक्तिक गणितामधे ते बसत नसेल.
येऊनजाऊन त्यानंतर १८५७ चे बंड हा एक मोठा प्रयत्न होता. तरीही दक्षिणेकडून पुरेशी साथ न मिळाल्याने व युद्धशास्त्रीय काही बाबींमधे कमजोर ठरल्याने हे बंड म्हणण्यापेक्षा मी युद्ध म्हणेन, फसले, हरले गेले.
वर्तमान वस्तुस्थिती:
या सर्व पार्श्वभूमिवर, गेल्या पन्नास वर्षात लोकतांत्रिक राजवटीमधे या देशाची भाषावार/प्रांतवार/जातीवार छकले उडू लागुन, तशीच ती उडावित असा जाणूनबुजून प्रयत्न सर्वथरांवर होऊ लागून, एकीकडे जातीपाती नष्टकरण्याचा धोषा लावत प्रत्यक्षात जातीपातींना अत्यंत विकृत पद्धतीने अधिक बळकटी देण्याचे कर्म सर्व स्तरांवर घडताना दिसले/दिसते.
या देशीच्या आराध्य त्रिदेवांना स्वतःलाच कसल्याही आशेला जागा असू नये/राहू नये असे हे दुर्दैवी चित्र उण्यापुर्या पन्नास/साठ वर्षात या देशाने अनुभवले, व इतिहासात कधीही न अनुभवलेल्या हिंदू धर्मांतर्गतचे "जातीय" द्वेष/तणावही अनुभवले.
इतकी सर्व दिशाहीन अवस्था असतानाच, एक चमत्कार घडला. होय, मी त्यास चमत्कारच म्हणेन.
व असा चमत्कार म्हणेन की गेल्या सहस्र वर्षात अशी घटना या भूभागाने वा जगानेही अनुभवली नाही.
स्वा. सावरकरांच्या सहा सोनेरी पानांनतर सातवे पान कुणास लिहावयाचे असल्यास याच घटनेवर ते लिहावे लागेल.
असे काय घडले होते?
घटनेचे विवरणः
वर वर पहाता उण्यापुर्या पाचसात वर्षांचे काळात एक चळवळ उभी राहिली व तिने ये भूमिवरील असंख्य क्रूर परकीय आक्रमकांपैकी एका आक्रमकाने येथिल मंदिर पाडून तेथे बांधलेली वास्तू सपशेल ध्वस्त केली.
हे करण्याकरता, परकीय आक्रमकांपासून व फाळणीतून उरल्यासुरल्या आसेतू हिमालयातील यच्चयावत प्रदेशातील यच्चयावत हिंदू सामान्यजन, हिंदूधर्मातील जातीद्वेषाच्या विषाची फिकीर न करता, किंबहूना जातीद्वेषाचे पेरलेले वीष पूर्णतया पचवून, "एक हिंदू" म्हणून उभा राहीला. त्यांच्या त्या एकत्र येण्यास तोडीचे असे उदाहरण जगात कुठेही नाही. हा समाज, जेव्हा जेव्हा "एक हिंदू" म्हणून एकत्रितपणे उभा रहातो, तेव्हा तेव्हा त्यांचेतील जातीपातींचे विभिनत्व एकतेने एकमेकांच्या गुणांचे सहकार्य घेत गुणांचा एकत्रित परमोच उत्कर्ष साधत एकत्रीतपणे वज्रमुठीप्रमाणे उभे रहाते व अशक्य ते शक्य करुन दाखवू शकते हा साक्षात्कार याच घटनेमुळे झाला.
नि:ष्कर्षः
वर वर पहाता, ही घटना केवळ पाच/सात वर्षांच्या प्रयत्नाने झाली असे वाटू शकेल, पण प्रत्यक्षात या घटनेची बीजे येथिल यच्चयावत जातींत विभागलेल्या प्रत्येक हिंदूधर्मियात परकीय आक्रमकांच्या बर्बर क्रूर धार्मिक आक्रमणांच्या आठवणीन्नी शिल्लक होतीच. व परकीय आक्रमकाने मंदीर पाडून बांधलेली वास्तू ही त्यांचे मनात वसलेल्या ठुसठूसत्या पुवळलेल्या जखमेवरील खपली प्रमाणेच होती. त्या खपलीला धक्का लागण्याचा अवकाश, जखमेच्या आत्यंतिक वेदनेने आख्खे शरीर जसे थरकापुन उठावे, तसा हा समाज सरसरून जागा झाला, व एका आत्यंतिक उर्मिने जे कर्म गेल्या सहस्रकातील काही शे वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते, गेला बाजार, निदान जे कर्म सरदार पटेलांन्नी घडवुन आणलेल्या सोरटीसोमनाथाच्या पुनरु:ज्जिवनानंतर तरी व्हायला हवे होते, ते स्वतःच करुन टाकले.
हे करताना त्यांना कसल्याही जातीभेदाची/ आर्थिक स्तराच्या भेदाची अडचण झाली नाही. त्यांना कसल्याही परकीय कम्युनिझमादिक विचारसरणींचा आधार घ्यावा लागला नाही.
हे करताना ते केवळ अन केवळ "एक हिंदू" म्हणून उभे राहिले होते.
पुरुषसुक्तातील सुदृढ हिंदू समाजपुरुषाचे दृष्य स्वरुप म्हणजे वास्तू ध्वस्त करण्यास उभा राहिलेला हिंदू समाज होता.
या हिंदू समाजपुरुषाचे असे संघटीत व एकीचे रूप पाहिल्यावर अनेकांच्या भुवया वक्र झाल्या, व हिंदू धर्मात जातींमधे फूट पडावी म्हणून त्यांचे प्रयत्न अधिकाधीक जोमाने सुरू झाले.
परंतू, गेल्या सहस्रकाच्या शेवटच्या शतकाच्या उत्तरार्धात एका दिवशी घडलेल्या या घटनेचे परीणाम हे आगामी सहस्रकावर दीर्घकालपर्यंत रहातील यात मला तरी तीळमात्रही शंका नाही.
सहसा कुणाच्या अध्यातमध्यात नसणार्या, आध्यात्मिक उन्नती करता भौतिक आयुष्यातिल कष्ट व अन्याय हसत हसत सहन करणार्या, बुद्धिमत्तेचे पूजक अन सहिष्णू अशा त्रिदेवांच्या पूजक हिंदुधर्मियांचे हे स्वरुप चकीत करणारे होते.
"भ्याड" अशी संभावना करुन, त्या हिंदूधर्मिय देशावर आक्रमण करावे असे विशेष त्यांच्यात उरलेच काय आहे अशी विचारणा करुन युद्धपिपासू हिटलरने ज्या देशावर आक्रमण करणे टाळले, त्याच देशात उण्यापुर्या पाचपन्नास वर्षात तेथिल हिंदू समाज स्वा. सावरकरांचे स्वप्नाप्रमाणे एकसमयावाच्छेदेकरुन संघटीत पणे उभा रहातो, व शतकानुशतकांच्या मंदीर नष्टकेल्याच्या अपमानाचा बदला, सहिष्णूपणे कसलीही मानवी हिंसा न करता, मात्र आक्रमकाची वास्तू ध्वस्त करुन घेतो हा गेल्या सहस्रकातील चमत्कारच म्हणावा लागेल.
जगातील सर्वात पुरातन, ज्याचा पूर्वकालखंडही अजुन निश्चित होत नाही, अशा हिंदू धर्माचे आता एका छोट्या एकमेव प्रदेशात एकवटलेले अनुयायी, आजवर गेली काही शतके झालेल्या परकीय विध्वंसक क्रूर आक्रमणांचे गर्तेतून/परिणामातून बाहेर पडून, एक हिंदू म्हणून, पुन्हा एकवार "कृण्वन्तो विश्वं आर्यं" हे प्रत्यक्षात उतरविण्यास सिद्ध होतील.
केवळ साडेनऊशे शब्दसंख्येचे
केवळ साडेनऊशे शब्दसंख्येचे आसपासचा हा निबंधवजा लेख अतिशय घाईगडबडीत व उपलब्ध मर्यादित वेळेत लिहीला आहे. मूळ प्रस्तावित लेख घरच्या पीसीवर तसाच अर्धवट पडून आहे, व अनेक मुद्यांना विस्तारपूर्वक स्पर्ष करण्याचे, स्पष्टीकरण करण्याचे राहूनच गेले आहे याची जाणिव आहे.
मात्र, स्पर्धेत किमान सहभाग तरी असावाच, तसेच, हा विषय मांडला जाऊ शकतो या उदाहरणाकरता म्हणून, आज केवळ अर्ध्यापाऊणतासाचे आत हा लेख(?) इथे दिला असे.
स्पर्धेच्या लेखातील मते लेखकाची (म्हणजे माझी) वैयक्तिक मते असून, त्याचे उत्तरदायित्व या साईटवर वा स्पर्धा आयोजकांवर नाही, तसेच ते या मतांशी सहमत असतीलच अशीही गरज नाही, याची मला कल्पना आहे.
स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे व मायबोलि साईटच्या व्यवस्थापकांचे धन्यवाद
शनिवारी उशिरा टाकलेला लेख "वर
शनिवारी उशिरा टाकलेला लेख "वर निघुन तरंगावा" म्हणून ही पोस्ट!
स्पर्धेमधे असले "पॉलिटिकली
स्पर्धेमधे असले "पॉलिटिकली इन्करेक्ट" विषय निवडू नयेत याचा धडा मिळाला असे
अभिनंदन लिंबुटिंबू. माझ्या
अभिनंदन लिंबुटिंबू. माझ्या आणि समस्त स्वाभिमानी आणि देशाभिमानी हिंदूंच्या दृष्टीने तुम्हीच विजेते आहात.
काय लेख आहे ...जबर्दस्त
काय लेख आहे ...जबर्दस्त टाकाऊ.
मंदिर वही बनायेंगे.... अजुन
मंदिर वही बनायेंगे....
अजुन बनलं की नाही?
लिखाणात ताकद आहे. त्या वेळीच
लिखाणात ताकद आहे. त्या वेळीच का नाही लिहीला हा लेख ?
इजिप्तपासून कंओडियापर्यंत
इजिप्तपासून कंओडियापर्यंत सगळे लोक छाती ठोकून सांगतात .. राम इथेच जन्मला म्हणून .. खुद्द अयोध्येतच अशा ढीगभर जागा आहेत. आता त्या उरलेल्या जागांवरील पाडापाडी कधी करणार लिंबुरामा?
लेख अपुरा वाटला. या जन
लेख अपुरा वाटला. या जन आंदोलनाचा इतिहास बराच जुना आहे तो इतिहास , त्यामधले प्रमुख लोक, घटनाक्रमात येणार्या मंदीराचे कुलुप राजीव गांधींच्या आदेशाने उघडले जाणे, मुलायमसिंग च्या सरकारने कारसेवकांवर केलेला गोळीबार, अडवाणीं ची रथयात्रा, ... या सारख्या प्रमुख घटना हे सार या निबंधात यायला हव होत. शब्दसंख्येची मर्यादा असावी कदाचित. तस असेल तर एक लेख मालाच लिहा अशी लिंबुटिंबू याना विनंती.
राम लिला अगध!!!!
राम लिला
अगध!!!!
श्रीकांत, शब्दसंख्येची
श्रीकांत, शब्दसंख्येची मर्यादा नव्हती तितकीशी, पण मलाच वेळेचे बंधन खूपच होते, त्यामुळे तुम्ही म्हणता तसे या घटनेच्या आधी काही शतके घडलेल्या असंख्य घडामोडींचा धांदोळा घेता आला नाही - लेखात मांडता आला नाही.
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार!
बाबराच्या ५०००० लोकांनी २०
बाबराच्या ५०००० लोकांनी २० वर्षात अख्ख्या देशभर त्यांची प्रार्थनास्थळे उभारली.
लिंब्या, देशभरातून लाखो लोक अयोध्येत गोळा करुनही तुम्हाला २० वर्षात फक्त एक देऊळ उभारणेही जमले नाही.
(No subject)
इजिप्तपासून कंओडियापर्यंत
इजिप्तपासून कंओडियापर्यंत सगळे लोक छाती ठोकून सांगतात .. राम इथेच जन्मला म्हणून .. खुद्द अयोध्येतच अशा ढीगभर जागा आहेत.>> तूनळीवर भडकाऊ ओवेसीच्या भडकाऊ भाषणात हा मुद्दा ऐकल्याचे स्मरते. संजिव पिल्ले साहेब त्याचेच कोणी नातेवाईक तर नव्हेत?
लगो (आणि मंडळी), रोज
लगो (आणि मंडळी), रोज अग्निहोत्र करता की काय ?
आगीत तेल, तूप ओतणे चांगले चालू आहे.
जपून असा, नाहीतर तेल ओतताना धपकन पडाल स्वतःच यज्ञात !
लगो, >> सगळ्या देशभरातून लाखो
लगो,
>> सगळ्या देशभरातून लाखो लोक अयोध्येत गोळा करुनही तुम्हाला २० वर्षात फक्त एक देऊळ उभारणेही जमले नाही.
भारताला आम्ही आमची मातृभूमी मानतो. सनदशीर मार्गाने राममंदिर उत्पन्न होऊ शकेल अशी धारणा आहे.
आ.न.,
-गा.पै.
राम कुठे जन्मला, मंदीर झाले
राम कुठे जन्मला, मंदीर झाले की नाही यापेक्षा हिंदू समाज कुठल्याहि कारणाने का होईना एकत्रित होऊ शकतो नि तसा तो व्हायला पाहिजे, हे महत्वाचे.
याचा अर्थ सगळ्यांनी हिंदू बनावे किंवा इतर धर्मीयांना हा़कलून द्यावे असा मुळीच नाही. पण जर या देशात सत्य अहिंसा अस्तेय, दुष्ट व्यक्तींचा नाश होण्यापेक्षा त्यांच्यातील दुष्टता, अज्ञान, नाहीसे व्हावे ही वृत्ति ठेवणे या हिंदू धर्मातील फक्त काही बाबी आहेत. इतर अनेक चांगल्या गोष्टी आहेत या धर्मात.
आता दुर्दैवाने धर्माचा अभ्यास, त्यातले सार काय याचा कुणि विचारच करत नाही. त्याबद्दल कुणाला खंत पण नाही!
केवळ एकमेकांवर चिखलफेक, अज्ञानी लोकांच्या चालीरीटींना धर्म समजणे नि त्यावर टीका करणे एव्हढेच मायबोलीवरील लोकांना कळते!
त्यामुळे श्री. लिंबूटिंबू, असले काही इथे लिहू नका.
कुणालाहि अज्ञानाची खंतच नाही! समजून घेण्यापेक्षा टीका करणे सोपे एव्हढीच बुद्धीची झोप असलेले लोक. रोजच्या व्यवहारात जगावे कसे, इतपर्यंतच त्यांच्या विचारांची झेप.
जे थोडे थोडके शिकू इच्छितात जे जाम गोंधळलेले. खरे काय नि खोटे काय? नि ते रोजच्या जीवनात कसे आणावे हे कुण्णाला कुण्णाला समजले नाही. शेवटी ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या म्हणून संपूर्ण शरणागति पत्करणे.
जपून असा, नाहीतर तेल ओतताना
जपून असा, नाहीतर तेल ओतताना धपकन पडाल स्वतःच यज्ञात !
तुम्हीच धप्पकन पडलेले आहात. लोक पांगले, पैसे गायब झाले, विटाही गायब झाल्यात, भाजपाच्या नव्या जाहिरनाम्यात देखील हा मुद्दा नसावा असे वाटते.
भाजपाच्या १९९८ च्या जाहिरनाम्यातील ही वाक्ये...
The BJP is committed to facilitate the construction of a magnificent Shri Ram Mandir at Ram Janmasthan in Ayodhya where a makeshift temple already exists. Shri Ram lies at the core of Indian consciousness. The BJP will explore all consensual, legal and constitutional means to facilitate the construction of Shri Ram Mandir at Ayodhya
http://bjpelectionmanifesto.com/pdf/manifesto1998.pdf
आणि आता नव्या २०१४ च्या जाहिरनाम्यात रामच नाही.
http://www.hindujagruti.org/news/17721.html
लिंबुरामा , मला एक विनोद आठवला... एक सैनिक दुसर्या सैनिकाला सांगत असतो.. मी शत्रूचे एक हजार हात कापून आणले... दुसरा विचारतो, मग हात का आणले, डोकी ना आणली नाहीत?
तर तो पहिला सैनिक म्हणतो.. डोकी आधीच कुणीतरी नेली होती रे! मग कशी आणणार?
तुमचा हा पाडापाडीचा उद्योगही मेल्या मढ्याचे हात कापण्याचा पराक्रम आहे.. जेंव्हा बाबर जिवंत होता, तेंव्हा विचारायची हिंमत नाही झाली. तो बाबरही गेला, त्याची सत्ताही गेली आणि आता हे पाडापाडीचा पराक्रम करत बसले आहेत.
लगो, >> तो बाबरही गेला,
लगो,
>> तो बाबरही गेला, त्याची सत्ताही गेली आणि आता हे पाडापाडीचा पराक्रम करत बसले आहेत.
पण बाबराचे वंशज आजून जिवंत आहेत भारतदेशी. Sons of Babar लिहिणारे कोण आहेत ते आम्हाला माहितीये. त्यांची पैदास जरा जास्तच माजलीये. मतपेटीतून तिची वासलात लावणे अधिक महत्त्वाचे आहे.
आ.न.,
-गा.पै.
बाबराचे वंशज असणे यात गैर काय
बाबराचे वंशज असणे यात गैर काय आहे? बाबराच्या वंशातील बहाद्दूरशहा जफर १८५७ स्वातंत्र्यलढ्यात भारताकडूनच लढला. त्यामुळे सन्स ऑफ बाबर म्हणून कुणी त्याच्याबद्दल अभिमान बाळगत असेल तर त्यातही काही गैर नाही.
सनदशीर मार्गाने राममंदिर
सनदशीर मार्गाने राममंदिर उत्पन्न होऊ शकेल अशी धारणा आहे. >>>>>>>>
विनोदाच्या धाग्यावर वाक्य हलवा...
लगो, पण शेवटी आढ्याचं पाणी
लगो, पण शेवटी आढ्याचं पाणी वळचणीस गेलंच ना? बाबराच्या अवलादीने पाकिस्तान पैदा केलाच ना?
आ.न.,
-गा.पै.
गापै, कृपया श्री. आनंद
गापै,
कृपया श्री. आनंद हर्डीकर लिखित 'कायदेआझम' हे पुस्तक वाचा. पाकिस्तान का व कसं निर्माण झालं याबाबत शंकानिरसन होईल.
हे पुस्तक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Kayadeaazam.html
रुपये तीनशेहून अधिक खरेदीवर भारतात शिपिंग मोफत.
अपि स्वर्णमयी लङ्का न मे
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥
अयोध्या सोडली तर दुसरं काहीही मला रुचत / आवडत नाही, असे स्वतः भगवंतांनीच सांगितले आहे.
यान्ना बाकी दुनियेत इंटरेस्ट नव्हता तर मग बाकी लोकांनीही यांच्या गावात कशाला इंटरेस्ट घ्यायचा नै का?
मा. लखनौ हायकोर्टाने तथाकथित
मा. लखनौ हायकोर्टाने तथाकथित वादग्रस्त जागा ही रामजन्म भुमी असल्याचे मानुन ती हिंदुंना द्यावी असा निकाल दिलेला आहे. १९४७ साली या जागेची मालकी वफ्फ बोर्डाची होती सबब १/३ जागा मुस्लीम ( इंटरेस्टेड पार्टी ) ला द्यावी असाही निकाल दिला आहे.
१९४७ साली ह्या वादग्रस्त वास्तुचे नाव जन्मभुमी मशिद होते जे स्वातंत्र्य उत्तर काळात बाबरी मशिद केले गेले वस्तुस्थिती सदर वास्तु जन्मभुमी असल्याचा पुरावा ( अनेक पुराव्या पैकी एक ) लखनौ हायकोर्टाने मान्य केले आहे.
दिवाणी कायद्यात पझेशन होल्डर हा सुप्रीम असे असताना लखनौ हायकोर्टचा निकाल हा अभुतपुर्व आहेच शिवाय हिंदुसमाजाने सर्व टिका सहन करत ( गरळ पचवत ) एकत्रीत आंदोलने केली त्याचा परिणाम आहे.
हा निकाल रामजन्मभुमी समितीला मान्य नसल्याने समिती कोर्टात गेली आहे. ही जागा १०० % हिंदुंची असुन मशिद बाधायची झाल्यास पंचक्रोशीच्या बाहेर बांधावी असे समितीचे म्हणणे आहे.
यावर लेख लिहुन आता जनमत एकत्रीत करण्याची वेळ नाही असे लिंबुभाउ मला सुचवावेसे वाटते.
बाकी अनेक पर्याय आणि अनेक टिका इतरांनी करुनही तो ढाचा आपण पाडुन तिथे छोटे का होईना राममंदीर बांधले आहे हा निर्णायक टप्पा आपण गाठला आहे.
चिनूक्स, पुस्तकाच्या
चिनूक्स,
पुस्तकाच्या उल्लेखाबद्दल धन्यवाद! सवडीने वाचेन. तोवर इथले परीक्षण वाचले : http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b90266&lang=marathi
जिना अचानक पाकिस्तानवादी का झाला? मुस्लिम लीगला कोणी हिंग लावून विचारंत नव्हतं तर एकदम सगळ्या भारतीय मुस्लिमांचं प्रतिनिधित्व तिला कसंकाय मिळालं? जिनाची डायरेक्ट अॅक्शन कशीकाय अंमलात आणली गेली? उत्तर भारतात (अलीगडछाप) विघटनवादी शक्ती कार्यरत आहेत म्हणूनच ना?
आज सलमान खुर्शिद खुशाल Sons of Babar म्हणून पुस्तक लिहितो. तो स्वत: आफ्रिदी पठाण आहे, जे मुघलांच्या विरुद्ध लढत असंत. मग आज हा इसम मुघलविरोधाचा वारसा टाकून कोणाची चाटत बसलाय? उत्तर उघड आहे. दिल्लीत कोण स्वत:स मुघलांचा वंशज मानतो?
सांगायचा मुद्दा काय की दोन विशिष्ट जमाती स्वगृही एकमेकांची डोकी फोडण्यास सदैव सज्ज असतात. मात्र त्या दूर भारतात असल्या की विशिष्ट पंथाच्या नावावर एकत्र येतात. त्यातून वेगळा देश तोडून काढतात. तो वेगळा देश मिळाला की परत एकमेकांची डोसकी फोडण्यात मग्न होतात. यातून भारताप्रती असलेला द्वेष दिसून येत नाही काय?
असो.
मूळ धाग्याकडे येऊया. भारताची एकात्मता कोण टिकवून धरतो? विशिष्ट पंथ की राम?
आ.न.,
-गा.पै.
मुस्लिम लीगला १९०६ च्या
मुस्लिम लीगला १९०६ च्या सुमारास कुणी हिंग लावून विचारत नव्हते. म्हणून १९४० च्या सुमारासही तीच स्थिती असावी, हा गामांचा हट्ट बालहट्ट आहे. इतिहासात चढ उतार होतच असतात.
आफ्रिदी पठाण आणि मोघलांच्या विरोधाचेही तसेच आहे. इतिहासात कोणतीही एक जमात / धर्म कोण्त्याअही एका जाती / विरोधात नव्हता.. अनेक हिंदु सरदार मोघलांच्यासमोर कंबरेत ९० अंशाचा कोन करुन वाकत होते. तसेच अनेक हिंदु राजांच्या पदरीही इतर धर्माचे लोक होते.
कुणी कुणाचा वारस समजावे, हाही विवादास्पदच मुद्दा आहे. कारण विशिष्ट धर्माचे राजे थोरच होते आणि विशिष्ट धर्माचे लुटारुच होते, असे पिढ्यानपिढ्या लोकांच्यावर अकारणच बिंबवले गेलेले आहे. पण म्हणून पुढच्या पिढीतही तोच व्ह्यु मानावा, हा अट्टाहास कशासाठी?
गामाच्या त्या दिव्य प्यारेग्राफात भारतीय आणि इंग्रज हे शब्द आफ्रिदी पठाण आणि मोघल ऐवजी वापरता येतात, हे त्याना स्वतःलाच समजलेले नाही. हे बघा..
मूळ पैलवानी मुक्ताफळ :
आज सलमान खुर्शिद खुशाल Sons of Babar म्हणून पुस्तक लिहितो. तो स्वत: आफ्रिदी पठाण आहे, जे मुघलांच्या विरुद्ध लढत असंत. मग आज हा इसम मुघलविरोधाचा वारसा टाकून कोणाची चाटत बसलाय? उत्तर उघड आहे. दिल्लीत कोण स्वत:स मुघलांचा वंशज मानतो?
आता नवीन प्यारेग्राफ बघा.
आज गामा पैलवान खुशाल लंडन मध्ये रहातो.. तो स्वत: भारतीय आहे, जे इंग्रजांच्या विरुद्ध लढत असंत. मग आज हा इसम इंग्रजविरोधाचा वारसा टाकून कोणाची चाटत बसलाय? उत्तर उघड आहे. पाउंडची किमया !
लगे रहो लगोभाय (सॉरी लगोबाय)
लगे रहो लगोभाय (सॉरी लगोबाय) !
हैं दुनिया उसीकी, जमाना उसीका,
मुहोब्बत मे जो हो गया हो किसीका !
प्यार बाँटते चलो, हम सब हैं भाई भाई !
पण चित्रपटाचे नाव तर "हम सब उस्ताद हैं"
लगो, १. >> आज गामा पैलवान
लगो,
१.
>> आज गामा पैलवान खुशाल लंडन मध्ये रहातो.. तो स्वत: भारतीय आहे, जे इंग्रजांच्या विरुद्ध लढत असंत.
>> मग आज हा इसम इंग्रजविरोधाचा वारसा टाकून कोणाची चाटत बसलाय? उत्तर उघड आहे. पाउंडची किमया !
गाम्याच्या इंग्लंडमधील वास्तव्याने भारतीय एकात्मता खंडित होत नाही.
२.
>> कुणी कुणाचा वारस समजावे, हाही विवादास्पदच मुद्दा आहे. कारण विशिष्ट धर्माचे राजे थोरच होते आणि विशिष्ट
>> धर्माचे लुटारुच होते, असे पिढ्यानपिढ्या लोकांच्यावर अकारणच बिंबवले गेलेले आहे. पण म्हणून पुढच्या
>> पिढीतही तोच व्ह्यु मानावा, हा अट्टाहास कशासाठी?
कोण करतंय अट्टाहास? मी तरी नाही. बलुची लोकांना जिना पसंत नाही. खान अब्दुल गफारखान यांच्यासारख्या भारतवादी मुस्लिमांचा पाकिस्तानने द्वेषच केला आहे.
३.
>> इतिहासात कोणतीही एक जमात / धर्म कोण्त्याअही एका जाती / विरोधात नव्हता..
असं असेल तर मग पाकिस्तान धर्माच्या आधारावर उत्पन्न का झाला?
आ.न.,
-गा.पै.
गापै, ते तरी कुठे टिकले, नंतर
गापै, ते तरी कुठे टिकले, नंतर १९७० चा इतिहास आहेच.
Pages