Submitted by अल्पना on 19 August, 2013 - 03:40
मधुबनी स्टाईल वापरुन हे काही बुकमार्क्स करायला घेतले होते.
Painted on black tea treated hand made paper with poster colors and permanent markers.
पण हा कागद जरा नाजूक आहे. त्यामूळे बुकमार्क म्हणून टिकणं थोडं अवघड आहे. कदाचीत लॅमिनेट करुन वापरता येतिल. अजुन दोन होते, ते काल एका पाहूणीला गिफ्ट केले. ती कॉन्ट्रास्ट कागदावर चिटकवून फ्रेम करणार आहे बहूतेक.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव मस्तच आहेत....
वॉव मस्तच आहेत....
सुरेखच आहेत ग.
सुरेखच आहेत ग.
मस्त! पुस्तक वाचण्याऐवजी
मस्त! पुस्तक वाचण्याऐवजी बुकमार्कच बघत राहावा, अस वाटायची शक्यता आहे!
सुंदर!
सुंदर!
सुंदर आहेत. फ्रेम केलेलेही
सुंदर आहेत. फ्रेम केलेलेही चांगले दिसतील.
खूप छान. दुसरे जास्तच आवडले.
खूप छान. दुसरे जास्तच आवडले.
अगदी सुबक
अगदी सुबक
धन्यवाद.
धन्यवाद.
मस्त
मस्त
मस्तच. सगळे एकाशेजारी एक पण
मस्तच. सगळे एकाशेजारी एक पण जरा वर खाली करून फ्रेम करून घे. छान होईल.
मस्त.
मस्त.
मामी, आयडिया मस्त आहे तुझी.
मामी, आयडिया मस्त आहे तुझी. यावेळी यांना लॅमिनेट करून बुकमार्क म्हणून्च वापरणार. गिफ्ट द्यायला होतिल.
पण पुढच्या टायमाला तुझी आयडीया लक्षात ठेवून त्या उद्देशानेच २-४ चित्र करून एकत्र फ्रेम करेन.
खूप सुंदर. लॅमिनेट केले तर
खूप सुंदर.
लॅमिनेट केले तर बूकमार्क्स म्हणून नक्की वापरता येतील.
कूल. आवडले.
कूल. आवडले.
छान आहेत!! कसे करायचे ते पण
छान आहेत!! कसे करायचे ते पण लिहा ना, इथे!!!
अल्पना सगळेच बुकमार्कस भारी
अल्पना सगळेच बुकमार्कस भारी आहेत. आमची तीन-चार सेटची ऑर्डर घेऊन ठेवा
खूप सुंदर! लॅमिनेट करून विकत
खूप सुंदर! लॅमिनेट करून विकत असाल तर ऑर्डरी कधी आणि कुठे नोंदवू ते कळवा.
रोचीन, माझ्याकडे एक ए-४
रोचीन, माझ्याकडे एक ए-४ साईझचा पांढरा हँडमेड पेपर होता. बिना साखरेचं चहाचं पाणी उकळून ब्रशनी त्या पाण्यचा एक वॉश आधी कागदावर दिला. त्यामूळे कागदाला जुनाट लुक आला आपोआप. बुकमार्कच्या साईझमध्ये कागदाला कापून मग सरळ रंगवायला घेतलं.
मधुबनी स्टाईलमध्ये अगदी साध्या सरळ फिगर्स असतात. प्रत्येक बुकमार्कला बॉर्डर करून हवी ती फिगर सरळ काळ्या मार्करनी त्यावर काढली. (मी आधी एकदा तशाच चहाचा वॉश दिलेल्या कागदावर पेन्सिलनी चित्र काढून बघितलं होतं. चुकलं तर खोडताना कागदाचा लेयर निघत होता. म्हणून यावेळी पेन्सिल- इरेझरच्या भानदडीत न पडता सरळ पेनानी चित्र काढली) प्रत्येक मेन फिगरला आउटलाइन केलं आणि मग मेंदी काढताना जसे मधले भाग भरतो तसं पेनानी बारिक डिझाईन काढत गेले. मधल्या छोट्या छोट्या मोकळ्या स्पेसेस ००० नंबरच्या ब्रशनी रंगवल्या. रंगवण्यासाठी जुने वाळलेले पोस्टर कलर्स वापरले आहेत. काही ठिकाणी लाल आणि हिरव्या मार्करचा पण वापर केलाय.
मी खरंतर हे बुकमार्क भावांना
मी खरंतर हे बुकमार्क भावांना नुसत्या राख्या पोस्ट करायच्या ऐवजी सोबत काहीतरी देवू या विचारानी बनवायला घेतले होते. ते इतके छान होतिल याचा मला पण अंदाज नव्हता.
कुणाला हवे असतिल तर सांगून ठेवा विपुमध्ये. अजून करेन मी. याच प्रकारे अजूनही काही वस्तू (कॉफी मग, बोल्स, ती कोस्टर्स इ.) करायचा विचार आहे. जर ते पुर्ण झालंच तर इथे मायबोलीवर सांगेनच.
सुंदर
सुंदर
बुकमार्क साठी पुस्तक विकत
बुकमार्क साठी पुस्तक विकत घ्यायची इच्छा व्हावी सुरेख.