नमस्कार मायबोलीकर,
मायबोली टी शर्ट २०१३ या उपक्रमाची देणगी दिली आणि या उपक्रमाच काम पूर्ण झाल. आपण दिलेल्या देणगी बद्दल "प्रगती प्रतिष्ठान" यांनी एक पत्र मायबोलीला दिले आहे. याचबरोबर देणगीचा कसा वापर केला याबद्दल माहिती सुद्धा पुढे पत्रकात दिली आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे या देणगीतुन त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेश शिवुन घेतले आणि १५ ऑगस्ट च्या कार्यक्रमात सगळ्या मुलांना घालायला मिळाले. आपण सगळ्यांनी दिलेल्या योगदानातुन जे गणवेश विद्यार्थ्यांकरता बनवले गेले आणि ते परिधान केलेल्याचा आनंद पाहण्याकरता आणि या मुलांच्या भेटीकरता आम्ही काही मायबोलीकर १५ ऑगस्ट ला जव्हार येथे "प्रगती प्रतिष्ठान संचलित निलेश ल. मुर्डेश्वर कर्णबधीर विद्यालय" ला भेट देउन आलो. तेथील काही क्षणचित्रे येथे देत आहे.
संस्थेचा परिसर :-
सुनंदा ताई पटवर्धन आणि तिथल्या शाळेचा कर्मचारी वर्ग यांनी आम्हाला शाळेची माहिती करुन दिली.
कर्णबधीर मुलांच्या बाबतीत येणार्या समस्या , याचबरोबर असणारे इतर आजार ,पालकांचा अशिक्षीतपणा मुळे अशा मुलांकडे होणार दुर्लक्ष त्याचबरोबर संस्थेत उपलब्ध असणार्या सोयी आणि राबवले जाणारे निरनिराळे उपक्रम यांची त्यांनी माहिती करुन दिली.
संदीप खांबेटे( घारुआण्णा ) माहिती वाचताना :-
शाळेत मुलांनी केलेले किल्ले :-
व्यवस्थितपणा :- ( हे बघुन मला माझ कपाट आठवल्याशिवाय राहिल नाही )
तेथील मुलांनी केलेली वारली चित्र परदेशात सुद्धा विकली जातात , त्यातील काही चित्रे दाखवताना मुग्धा कुलकर्णी ( मुग्धानंद ) आणि संदीप खांबेटे ( घारुआण्णा )
तेथील मुलांची माहिती करुन देताना शिक्षक :-
सगळ्यात शेवटी मुलांबरोबर एक मायबोलीकरांचा फोटो :-
आणि त्या लहान मुलांनी त्यांच्या भाषेत व्यक्त केलेला आनंद :-
सर्व मायबोलीकरांना हा क्षण नक्कीच आनंद आणि एक छानशी आठवण देउन जाईल.
पुन्हा पुढच्या वर्षी नवीन जोमाने नवीन संयोजकांबरोबर मायबोलीच्या सगळ्याच उपक्रमात आपणही सगळे सहाभागी व्हाल अशी आशा आहे.
धन्यवाद
मस्त! खूप चांगल्या ठिकाणी
मस्त!
धन्यवाद संयोजक आणि ह्या कामात भाग घेणारे सगळेच 
खूप चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या पद्धतीने केलेल्या मदतीचा विनियोग होईल ह्याबद्दल शंका नाही.
खूप छान!!
खूप छान!!
मायबोली आणि संयोजक...कौतूक
मायबोली आणि संयोजक...कौतूक आहे तुमचे
आज मी मायबोलीची सदस्य आहे याचा विशेष आनंद होतोय..
मायबोली संयोजकांचे आभार.
मायबोली संयोजकांचे आभार. अभिमान वाटतोय. गर्व से कहो हम मायबोलीकर है ... शेवटचे प्र.चि. पाहुन खुप आनंद झाला.
के अंजली +1111 छान वाटल वाचून
के अंजली +1111
छान वाटल वाचून
अत्यंत कौतुकास्पद आणि
अत्यंत कौतुकास्पद आणि अभिनंदनीय उपक्रम!
किती गोड मुले आहेत.
Sanyojakanch manaapaasun
Sanyojakanch manaapaasun kautuk..
Chhan vaatal vaachun!
Photonbaddal vishesh aabhar
व्वा. ...खुप छान
व्वा. ...खुप छान रे...!!!
मुलांच्या चेहर्या वरचा आनंद बघुन मायबोलीने असे उपक्रम दरवर्षी राबवावे असे वाटतय.
टि-शर्ट समितेचे विषेश अभिनंदन...इतकी मेहनत घेऊन उपक्रम तर राबवलाच पण देणगी सत्कारणी लागतेय की नाही हे ही तपासले. खरोखर कौतुक.
हॅट्स ऑफ टू टी-शर्ट समिती.
हॅट्स ऑफ टू टी-शर्ट समिती.
मस्त! ववि आणि टी-शर्ट
मस्त! ववि आणि टी-शर्ट समितींचं खूप कौतुक वाटतंय.
मुलांच्या गणवेशांचा कोरेपणा फोटोतूनही जाणवतोय आणि तो शेवटचा फोटो !! आहे बुवा!!!!
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
वा छान. अभिनंदन आणि कौतुकही.
वा छान. अभिनंदन आणि कौतुकही.
अभिमान वाटतो मायबोलीकर
अभिमान वाटतो मायबोलीकर असण्याचा.
टी शर्ट समिती खरच खूप खूप धन्यवाद आणी अभिनंदन!
मस्त!!!
मस्त!!!
विधायक कामाबद्द्ल मायबोलि व
विधायक कामाबद्द्ल मायबोलि व संयोजकांचे खूप खूप कौतुक.
तेथील मुलांनी केलेली वारली चित्र परदेशात सुद्धा विकली जातात >>> हे विकत घ्यायचं झालं तर त्यांचा काही कॅटलॉग वगैरे आहे का? किंवा त्यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील तर त्यांचा पत्ता मिळेल का?
किती गोड आणि निरागस मुलं
किती गोड आणि निरागस मुलं आहेत!
शाळेचा परिसर, तिथली स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. मुलांच्या कलाकृती सुंदर! वारलीकाम तर फार आवडलं.
टी-शर्ट समिती, तुम्हाला मनापासून धन्यवाद!
छान वाटलं वाचून .अभिनंदन व
छान वाटलं वाचून .अभिनंदन व कौतुक.
सुंदर! तुमचे खुप कौतुक व
सुंदर!
तुमचे खुप कौतुक व धन्यवाद.
पुढील वर्षासाठी आत्ताच शुभेच्छा.
ग्रेट जॉब!!!! ववि आणि टीशर्ट
ग्रेट जॉब!!!!
ववि आणि टीशर्ट समितीचे खुप खुप कौतुक!
टी शर्ट समिती खरच खूप खूप
टी शर्ट समिती खरच खूप खूप धन्यवाद आणी अभिनंदन!!
३ Cheers for टी शर्ट समिती!!
शाळेचा परिसर, तिथली स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. मुलांच्या कलाकृती सुंदर!
टी शर्ट समिती कौतुकास आणि
टी शर्ट समिती कौतुकास आणि अभिनंदनास पात्र आहे.
वारली चित्र मस्तच
टी-शर्ट आणि ववि
टी-शर्ट आणि ववि समिती,
अभिनंदन.
उत्तम कल्पना आणी तितकेच उत्तम
उत्तम कल्पना आणी तितकेच उत्तम एक्झेक्युशन देखील. टीशर्ट समिती आणि सर्वच मायबोलीकरांचे कौतुक.
उत्तम कल्पना आणी तितकेच उत्तम
उत्तम कल्पना आणी तितकेच उत्तम एक्झेक्युशन देखील. > +१
टिशर्ट समितीचे मनापासुन अभिनंदन
शेवटचा जल्लोषाचा फोटो आणि त्या चिमुकल्यांना अग्रस्थानी ठेवुन काढलेला फोटो फारच बोलके आहेत.
वा! वा! खूपच छान. स्क्रोल
वा! वा! खूपच छान.
स्क्रोल करता-करता गणवेषातल्या मुलांचा पहिला फोटो स्क्रीनवर आला आणि भरूनच आलं एकदम. मुलांची वयं इतकी लहान असतील असं मला अपेक्षित नव्हतं अजिबात.
छान, मला शेवटच्या फोटोतील
छान, मला शेवटच्या फोटोतील दृष्य फारच आवडले
उपक्रम राबविल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन व संस्थेला शुभेच्छा
जेब्बात... शेवटचे दोन फोटो
जेब्बात... शेवटचे दोन फोटो जबरी... नवीन गणवेशामुळे सगळे जण कसे ऐटीत दिसताहेत..
अतिशय स्तुत्य उपक्रम! उपक्रम
अतिशय स्तुत्य उपक्रम!
उपक्रम राबविल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन व संस्थेला शुभेच्छा
असेच म्हणतो.
अतिशय सुंदर आणि गौरवास्पद
अतिशय सुंदर आणि गौरवास्पद उपक्रम.ठाणे जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा या आदीवासी भागात ठाण्याच्या सुनंदाताई पटवर्धन प्रगती प्रतिष्टान मार्फत अनेक सामाजिक प्रकल्प अगदी उत्तमपणे राबवित आहेत..आदीवासी जनतेच्या विकासासाठी त्यांनी अनेक पथदर्शी असे प्रकल्प सुरू केले आहेत. मी गेल्या १२ वर्षापासून या संस्थेशी परीचीत आहे..माबोकरांचे अभिनंदन..!
काय वाटतं आहे हे फोटो बघून ते
काय वाटतं आहे हे फोटो बघून ते नेमक्या शब्दात सांगता येणार नाही. पण मायबोली फक्त एक वेबसाईट, ऑनलाईन फोरमपेक्शा खूप काही आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली. टी शर्ट व ववि समिती धन्यवाद, अभिनंदन.
Pages