एक वाटी बदाम
पाऊण वाटी साखर
चार मोठे चमचे तुप
चार-पाच केशराच्या काड्या
दोन वेलदोडे
पाऊण वाटी पाणी.
१.बदाम किमान ६ तास भिजवुन घ्यावे. साले काढुन भरड वाटावे.
.
.
२.पॅनमधे तुप टाकुन, वाटलेल बदाम टाकावेत. थोडा रंग बदलेपर्यंत मंद आचेवर परतावे.
३.एकीकडे जाड बुडाच्या पातेल्यात साखर, पाणी, केशर आणि वेलदोडा सगळे एकत्र करुन पाक करायला घ्यावा. पक्का पाक करायचा आहे.
४.तयार झालेला पाक बदामाच्या भुग्यावर ओतावा, निट एकत्र करुन लगेच वड्या थापाव्या.
.
१.पाककृतीला लागणार्या वेळात, बदाम भिजवणे आणि सोलणे हा वेळ धरलेला नाही.
२.ज्यांच्या हातची खाल्ली, त्यांचे प्रमाण आठवत नव्हते, त्यामुळे मी हे अंदजानेच घेतले.
३.मी आज हे पहिल्यांदाच केले. पसरट पॅनमधे, बदामाचा भुगा परतुन घेतला, नंतर त्यातच पाक ओतला, आणि डावाने पटकन पसरवुन दिले. वेगळ्या थाळीला तुप लावुन, त्यात मिश्रण ओतुन मग वड्या थापण्याचे माझे कष्ट वाचले.
४.या पद्धातीनेच काकु काजुच्या पण वड्या करतात. फक्त परतताना त्यात थोडे दुध घलतात.
अरे वा मस्त रेसिपि. बदाम
अरे वा मस्त रेसिपि. बदाम वाटताना काहि टाकले कि कोरडेच वाटायचे.
सह्ही दिसताय्त पण ते पाक
सह्ही दिसताय्त
पण ते पाक प्रकरण .... नीट जमलं नाही तर दगड नाहीतर भुस्सा...
प्रिया, भिजवलेले बदाम ओलसर
प्रिया, भिजवलेले बदाम ओलसर असतातच. त्यामुळे नुसतेच वाटायचे.
लाजो, ती थेंबाची टेस्टींग मेथड वापरायची ...
मस्त दिसताहेत. बदामाची तयार
मस्त दिसताहेत.
बदामाची तयार पूड मिळते. ( गल्फमधे आपल्यासमोर करुन मिळते ) ती वापरली तर आणखी सोपे.
एकदम झक्कास !!!! धन्यवाद
एकदम झक्कास !!!!
धन्यवाद
पक्का पाक म्हणजे गोळिबंद पाक
पक्का पाक म्हणजे गोळिबंद पाक करायचा की दोन तारी, तीन तारी असा करायचा?
वड्या मस्त दिसताहेत आणि वाचून तरी सोप्प्या वाटताहेत.
आम्ही अश्याच करतो पण पाक बनवत
आम्ही अश्याच करतो पण पाक बनवत नाही.
बदामाच्या पूडीत पूडीच्या निम्मी साखर टाकून हलवत रहायचे.
आपोआप साखर विरघळते. चव पाहून साखर अॅडजस्ट करायची. मिश्रण पॅनपासून सुटू लागल्यावर ताटाला तूप लावून वड्या थापायच्या.
बदामाच्या वड्या -- वा वा!
बदामाच्या वड्या -- वा वा! फोटोतली वडी पटकन उचलून तोंडात घालावीशी वाटते आहे.
ओके आरती जेव्हा निवांत वेळ
ओके आरती

जेव्हा निवांत वेळ असेल तेव्हा 'पाक'प्रयोग करेन
व्व्वा !!! छानच आहेत
व्व्वा !!! छानच आहेत बदामड्या.
पक्का पाक म्हणजे गोळिबंद पाक
पक्का पाक म्हणजे गोळिबंद पाक करायचा की दोन तारी, तीन तारी असा करायचा? >> शांकली, गोळिबंदच करायचा.
साखर टाकून हलवत रहायचे. >> हे थोडे वेळखाउ प्रकरण आहे, या अगदी झट्पट होतात.
बाकी मी पण बरेच वड्यांचे प्रकार, तु लिहिले आहेस त्या पद्धतीनेच करते.
ती वापरली तर आणखी सोपे. >>
ती वापरली तर आणखी सोपे. >> दिनेश, मुख्य म्हणजे ते बदाम सोलण्याचे काम वाचेल.
धन्स गं आरती!........ काय आहे
धन्स गं आरती!........
काय आहे हे 'पाक' प्रकरण जरा डी ग्रूप मधलं असल्याने
जरा भीत भीतच त्याच्या वाट्याला जावं लागतं. म्हणून खात्री करून घेतली.
आरती छान रेसिपी... सातींनी
आरती छान रेसिपी... सातींनी सांगितलेली पद्धत सोपी वाटत आहे.
थोड्या प्रमाणात करुन बघेन.
थोड्या प्रमाणात करुन बघेन. बाकी एकदम मस्त दिसतायत वड्या!
रिक्षा! http://www.maayboli.c
रिक्षा!
http://www.maayboli.com/node/31553
फोटोतली वडी पटकन उचलुन तोंडात
फोटोतली वडी पटकन उचलुन तोंडात टाकावी असे वाटतय!
'पाक' करताना मला खरच 'पाकपुक' होतं!
कोणीतरी ती 'पाकाची' 'चाचणी' लिहा ना!
रिक्षामधे खवा आहे ....
रिक्षामधे खवा आहे ....
ज्यांनाज्यांना तोंडात टाकावी असे वाटतय, त्यांनी लगेच टाकावी.
वत्सला,
अगदी थेंबभर पाक चमच्यात घेउन, ताटलीत टाकायचा. तो थेंब जागच्याजागी बसला की समजायचे पाक झाला.
ओघळ गेला तर नाही झाला. दोन बोटांमधे घेउन पण चेक करता येते पण ते सवयीचे झाले की.
सगळ्यांना धन्यवाद
मस्त दिसतेय बर्फी. आणि सोपी
मस्त दिसतेय बर्फी.
आणि सोपी वाटतेय करायला, साहित्यही सहज मिळणारं आहे.
गणपतीच्या आधी एकदा सराव परीक्षा घेण्यात येईल.
व्व्वा !!! छानच...
व्व्वा !!! छानच...
पाक प्रकरण झेपत नाही. पण
पाक प्रकरण झेपत नाही. पण वड्या मात्र एकदम मस्त.
मस्तच.
मस्तच.
मस्त दिसतायेत वड्या. मला पण
मस्त दिसतायेत वड्या. मला पण पाकाची फार भिती वाटते. मी बदाम पूड, साखर, दूध, तूप एवढं वापरून सोप्प्या वड्या करते.
मस्तं. फार टेम्प्टींग आहे.
मस्तं. फार टेम्प्टींग आहे.
घाबरु नका, करुन बघा पाकाच
घाबरु नका, करुन बघा
पाकाच तंत्र एकदा जमलं की झटपट होतात वड्याबिड्या.
मंजूडी, परिक्षेचा निकाल सांगा.
घाबरु नका, करुन बघा स्मित
घाबरु नका, करुन बघा स्मित पाकाच तंत्र एकदा जमलं की झटपट होतात वड्याबिड्या.>>> मस्तच होतात. अगदी झटपट.
वा नलिनी मस्तच, रंग अगदी छान
वा नलिनी मस्तच, रंग अगदी छान बदामी आला आहे.
नलू सध्या माबो रेसिपीजचा
नलू सध्या माबो रेसिपीजचा सपाटा लावलेला दिसतोय
छान आहेत सगळ्यांच्या वड्या.