मोड आलेले हिरवे मूग - दोन ते अडीच वाट्या
चवीनुसार : गूळ, मीठ व आमसूल
पाणी
वाटणासाठी :
धणे : २ टेबलस्पून
उडीद डाळ : १ टेबलस्पून
जिरे : १ टीस्पून
सुक्या लाल मिरच्या : ६
किसलेले कोरडे खोबरे : अर्धी वाटी
कढीपत्ता : ६-७ पाने
तेल : वरील जिन्नस भाजण्यापुरते
फोडणीसाठी :
तेल
मोहरी
सुक्या लाल मिरच्या : २
कढीपत्ता : २-४ पाने
हिंग
कोथिंबीर
हळद
सजावटीसाठी :
ओले खोबरे, कोथिंबीर.
मोड आलेले हिरवे मूग वेगळे शिजवून घ्यावेत.
कढईत थोडे तेल तापवून त्यात अनुक्रमे धणे, जिरे, उडीद डाळ, लाल मिरच्या, कोरडे खोबरे व कढीपत्ता परतून घ्यावे. खूप परतायचे नाहीये. वरील जिन्नस गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत.
नॉन स्टिक पॅनमध्ये शिजवलेले मूग, वरील वाटण, चवीनुसार मीठ - गूळ - आमसूल एकत्र करावे व आवश्यकतेनुसार पाणी (२ वाट्या अंदाजे) घालून एक दणदणीत उकळी आणावी.
लोखंडाच्या छोट्या पळीत फोडणीसाठी तेल गरम करावे. गरम तेलात मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात अनुक्रमे लाल मिरच्या, कढीपत्ता, हिंग, कोथिंबीर व हळद घालून गॅस बंद करावा. शिजलेल्या मुगांवर ही फोडणी घालावी व उसळ एकसारखी करून घ्यावी. वरून सजवण्यासाठी हवे असल्यास ओले खोबरे, कोथिंबीर भुरभुरावी.
पोळी, भाकरी, भातासोबत उसळ खावी.
१. आमसुलाऐवजी आमचूर पावडर वापरू शकता.
२. लाल मिरच्यांचे प्रमाण गरजेनुसार कमी करू शकता. पण चवीचा खमंगपणा त्या प्रमाणात येईलच ह्याची गॅरंटी नाही!
३. एकूण वेळात मूग शिजवण्याचा वेळ (१० ते १५ मिनिटे) व उसळ करण्याचा वेळ (२५ ते ३० मिनिटे) गृहित धरला आहे.
४. या पाककृतीचे काही खास दाक्षिणात्य नाव आहे, परंतु ते आठवत नसल्यामुळे दाक्षिणात्य चवीची हिरव्या मुगाची उसळ असे शीर्षक या पाककृतीला दिले आहे.
५. एरवीच्या मुगाच्या उसळीसारखीच ही उसळही दिसते. चवीत काय तो फरक, म्हणून वेगळा फोटो दिलेला नाही.
उद्याच करण्यात येईल मोड आलेले
उद्याच करण्यात येईल मोड आलेले मूग आहेतच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान प्रकार. करुन बघीन.
छान प्रकार. करुन बघीन.
फोटू
फोटू
हा प्रकार थोडासा शोनुच्या
हा प्रकार थोडासा शोनुच्या मुगा मोळो सारखा लागेल असं वाटतंय.
हो, सिंडरेला, बहुतेक त्या
हो, सिंडरेला, बहुतेक त्या चवीच्या जवळपास जाणारी चव असेल... मसाल्यातले काही घटक सेम आहेत. मेधाची मुगा मोळोची कृती वाचली. तिने दिलेल्या कृतीत व ह्या पाककृतीत थोडाफार फरक आहे, पण चव तशीच लागत असणार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाचून त्रास होतो आहे. करून
वाचून त्रास होतो आहे. करून बघावी लागेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच अरुन्धन्ती.
छान. करु हं करु.
छान. करु हं करु.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे रेसिपी .. दाक्षिणात्य
छान आहे रेसिपी ..
दाक्षिणात्य पद्धतीच्या (कर्नाटक सोडून) गूळ, आमसूल वापरतात का भाजी आमटीत?
मी ह्या पद्धतीने चवळीची उसळ
मी ह्या पद्धतीने चवळीची उसळ करते. कारण चवळी जरा चवीला उग्र असते. आता मुगाची करुन पाहिन. बहुतेकदा मुगाची उसळ मी लसूण फोडणी देवुन करते. आता अशी करुन बघेन....
दाक्षिणात्य पद्धतीच्या
दाक्षिणात्य पद्धतीच्या (कर्नाटक सोडून) गूळ, आमसूल वापरतात का भाजी आमटीत?
>>> तमिळनाडूत तरी आमसुलं माहित नाहीत, असा माझा अंदाज. गूळ भाजीआमटीत वापरत नाहीत.
नाव वाचुन वाटले की चेन्नै
नाव वाचुन वाटले की चेन्नै एक्सप्रेस्स वर काही असावं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान रेसीपी.
आज केली छान झाली मी त्यात
आज केली छान झाली मी त्यात थोड्या मेथ्या पण टाकल्या.
अरे वा! नक्की करणार ही
अरे वा! नक्की करणार ही उसळ.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बिनकांद्याची उपयोगी रेसिपी
मूळ रेसिपीत (विष्णू मनोहरांनी
मूळ रेसिपीत (विष्णू मनोहरांनी सांगितलेल्या) आमचूर पावडर वापरली होती, आणि त्या ऐवजी आमसुलं घातली तरी चालतील असे ते म्हणाले होते.
मंजू, छानच की!
ललिता-प्रीति, येस्स, बिनकांद्याची रेसिपी आहे आणि खमंग चव आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)