कच्चे केळी ची भाजी

Submitted by हर्शा १५ on 13 August, 2013 - 16:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

काल केलि आणिक नवरा ला जाम आवडली , रेसिपी टाक किवा लिहून ठेव सांगितले . आणि हो परत लवकर करावे लागणार मग फोटो पन टाकते नक्की . या खेपे ला सोर्री.

साहित्य : दोन - तीन केळ , दही एक वाटी किवा ताक , जिरे , हिंग, चिमुट भर साखर , मीठ, कढी पत्ता, कोथिम्बिर ,

क्रमवार पाककृती: 

कृती
१ केळी सोलून त्याचे गॊल चकत्या करावे
२ पन मधे तेल गरम करून हिंग जिरे आणिक कढी पत्ता ची फोडणी करावी
३ आता केळी, मीठ घालून भाजी परतावी आणिक किंचित पाणी घालून झाकण ठेऊन बारीक गस वर शिजू द्यावी (१०-१२ मीन )
४ अधून मधून केळी शिजत आहे का बघावे आणिक हवे असेल तसे पाणी घालावे पन आकडी मऊ नाही झाले पाहिजे .
५ दही पाणी घालून पातळ करावे आणिक भाजी मधे घालून एक उकडी काढावी
६ आता साखर घालून ए मीन ठेवावे वर कोथिम्बिर घालावी

अधिक टिपा: 

अगदी आधी पासून केळी चिरून नाही ठेवायची जेवा भाजी करायची आहे तेवा १० मीन पूर्वी चिरले तर चालतील नाहीतर ते काळे पडतात . भाजी तुपात पण करता येते तेल एवजी आणिक उपवास ला पण चालते .

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चवीला छान लागत असेल.
तिखटाबद्दल मात्र लिहायला हवे.

छान रेसिपी.
थोड्या वेगळ्या पद्धतिने आमच्याकडे नियमितपणे ही भाजी आवडीने केली जाते.
[ केळ्याच्या सालीत अनेक सत्वगुण असतात. पी.व्ही. पॉलीटेकनिक, एसएनडीटी, यानी त्यावर संशोधन प्रकल्प केला असून केळ्याच्या सालांपासून [कच्च्या व पिक्या ] अनेक पदार्थ बनवता येतात हें दाखवून दिलं आहे. कच्च्या केळ्याच्या भाजीपुरतंच बोलायचं तर मला वाटतं केळीं सोलताना जर गाभ्यालगतचा सालीचा कांही भाग तसाच राहूं दिला तर केळ्याच्या फोडी/चकत्या शिजल्यावर पिठूळ न होतां कांहीशा कुरकुरीत रहातात, अधिक चविष्टही लागतात व त्यामुळे अधिक सत्वगुणही मिळूं शकतात. आमच्या घरीं हा प्रयोग यशस्वी झाला आहे.]

हि मी सालासकट उपासाच्या बटाट्याच्या भाजीसारखी करते तूप,जिरे आणि हिरव्या मिरच्याची फोडणी करून (मो यांनी सांगितली तशी).

भाऊ, अन्जू मी साला सकट केली नाही नक्की करेन पण हो जर शिजत न लक्ष्य ठेवले तर भाजी आगदी मऊ किवा चिकट होत नाही . हो चकत्या पण छान होतात .

prady Happy

केळ्याच्या सालांपासून [कच्च्या व पिक्या ] अनेक पदार्थ बनवता येतात हें दाखवून दिलं आह.

Do you have recipes? Where can I find the info?

<< Where can I find the info?>> - "A Waste to Wealth Project- Utilisation of Raw Banana Peel ", sponsored by Minex Foundation, Mumbai & developed by P.V. Polytechnic, SNDT, Mumbai. हल्लीच माझ्या एका मित्राने मला हा छापील प्रॉजेक्ट रिपोर्ट दाखवला होता. एसएनडीटीच्या पी.व्ही.पॉलिटेक्निक, मुंबई, इथें उपलब्ध असावा. नक्की माहित नाही. मित्राकडे चौकशी करतो.