काल केलि आणिक नवरा ला जाम आवडली , रेसिपी टाक किवा लिहून ठेव सांगितले . आणि हो परत लवकर करावे लागणार मग फोटो पन टाकते नक्की . या खेपे ला सोर्री.
साहित्य : दोन - तीन केळ , दही एक वाटी किवा ताक , जिरे , हिंग, चिमुट भर साखर , मीठ, कढी पत्ता, कोथिम्बिर ,
कृती
१ केळी सोलून त्याचे गॊल चकत्या करावे
२ पन मधे तेल गरम करून हिंग जिरे आणिक कढी पत्ता ची फोडणी करावी
३ आता केळी, मीठ घालून भाजी परतावी आणिक किंचित पाणी घालून झाकण ठेऊन बारीक गस वर शिजू द्यावी (१०-१२ मीन )
४ अधून मधून केळी शिजत आहे का बघावे आणिक हवे असेल तसे पाणी घालावे पन आकडी मऊ नाही झाले पाहिजे .
५ दही पाणी घालून पातळ करावे आणिक भाजी मधे घालून एक उकडी काढावी
६ आता साखर घालून ए मीन ठेवावे वर कोथिम्बिर घालावी
अगदी आधी पासून केळी चिरून नाही ठेवायची जेवा भाजी करायची आहे तेवा १० मीन पूर्वी चिरले तर चालतील नाहीतर ते काळे पडतात . भाजी तुपात पण करता येते तेल एवजी आणिक उपवास ला पण चालते .
आणि तिखट? हिरवी मिरची की लाल
आणि तिखट?
हिरवी मिरची की लाल तिखट
चवीला छान लागत
चवीला छान लागत असेल.
तिखटाबद्दल मात्र लिहायला हवे.
छान रेसिपी. थोड्या वेगळ्या
छान रेसिपी.
थोड्या वेगळ्या पद्धतिने आमच्याकडे नियमितपणे ही भाजी आवडीने केली जाते.
[ केळ्याच्या सालीत अनेक सत्वगुण असतात. पी.व्ही. पॉलीटेकनिक, एसएनडीटी, यानी त्यावर संशोधन प्रकल्प केला असून केळ्याच्या सालांपासून [कच्च्या व पिक्या ] अनेक पदार्थ बनवता येतात हें दाखवून दिलं आहे. कच्च्या केळ्याच्या भाजीपुरतंच बोलायचं तर मला वाटतं केळीं सोलताना जर गाभ्यालगतचा सालीचा कांही भाग तसाच राहूं दिला तर केळ्याच्या फोडी/चकत्या शिजल्यावर पिठूळ न होतां कांहीशा कुरकुरीत रहातात, अधिक चविष्टही लागतात व त्यामुळे अधिक सत्वगुणही मिळूं शकतात. आमच्या घरीं हा प्रयोग यशस्वी झाला आहे.]
छान होते ही भाजी. आम्ही
छान होते ही भाजी.
आम्ही करताना तूप जिर्याच्या फोडणीत फोडणीत हिरवी मिरची घालतो.
हि मी सालासकट उपासाच्या
हि मी सालासकट उपासाच्या बटाट्याच्या भाजीसारखी करते तूप,जिरे आणि हिरव्या मिरच्याची फोडणी करून (मो यांनी सांगितली तशी).
अशी ताकातली पातळ भाजी केल्यास
अशी ताकातली पातळ भाजी केल्यास त्यात दाण्याचा कूट पण छान लागतो.
पिन्कि मी हिरवी मिरची वापरते
पिन्कि मी हिरवी मिरची वापरते तिखटा ला
भाऊ, अन्जू मी साला सकट केली
भाऊ, अन्जू मी साला सकट केली नाही नक्की करेन पण हो जर शिजत न लक्ष्य ठेवले तर भाजी आगदी मऊ किवा चिकट होत नाही . हो चकत्या पण छान होतात .
prady
prady
केळ्याच्या सालांपासून
केळ्याच्या सालांपासून [कच्च्या व पिक्या ] अनेक पदार्थ बनवता येतात हें दाखवून दिलं आह.
Do you have recipes? Where can I find the info?
भा 'जी' मस्त पण भा 'षा' अशी
भा 'जी' मस्त पण भा 'षा' अशी का?
<< Where can I find the
<< Where can I find the info?>> - "A Waste to Wealth Project- Utilisation of Raw Banana Peel ", sponsored by Minex Foundation, Mumbai & developed by P.V. Polytechnic, SNDT, Mumbai. हल्लीच माझ्या एका मित्राने मला हा छापील प्रॉजेक्ट रिपोर्ट दाखवला होता. एसएनडीटीच्या पी.व्ही.पॉलिटेक्निक, मुंबई, इथें उपलब्ध असावा. नक्की माहित नाही. मित्राकडे चौकशी करतो.