डाळीचं पीठ
हळद
तिखट
मीठ
हिंगं
सावजी मटण मसाला किंवा मराठा दरबारचा 'काळं' मटण मसाला किंवा कुठलाही मराठी पध्दतीचा तिखट मसाला
कांदे
सुक्या खोबर्याचा कीस
आलं
लसूण
खसखस
तेल
पाणी
कोथिंबीर
सांबारं (रस्सा) :
-कांदा उभा आणि पातळ चिरून घ्यावा.
-खोबरं कीस मंद आचेवर परतून घ्यावा.
-तेलावर कांदा परतायला ठेवावा. यात किंचित मीठ घालावं. म्हणजे पाणी सुटून कांदा शिजायला मदत होईल.
-कांदा परतत असतानाच आता यात परतलेला खोबरंकीस घालावा.
-पाण्याचे शिपके देऊन कांदा-खोबरं व्यवस्थीत परतून घ्यावं. (कांदा गळायला हवा.)
-मिक्सरमधून शक्य तितकं बारीक वाटून घ्यावं.
-कांदा-खोबरं परतताना एकीकडे आलं-लसूण वाटून घ्यावं.
-दोन्ही वाटणं थोडीशी वेगळी काढून ठेवावी. ही वड्यांना वापरायची आहेत.
-तेल गरम करून त्यात हिंग घालावा.
-यावर आलं-लसणाचं वाटण, तसंच कांदा-खोबर्याचं वाटण घालून परतावं.
-व्यवस्थीत परतून, सगळ्या वाटणांचा गोळा तेल सोडायला लागला की यात हळद, तिखट, मीठ आणि मसाला घालून परतावं.
-उकळीचं पाणी घालून पातळ रस्सा करावा.
वड्या:
-जाड बुडाच्या भांड्यात तेल घालून त्यात वेगळी काढून ठेवलेली वाटणं परतून घ्यावी.
-यात हळद-तिखट-मीठ घालून परतावं.
-डाळीचं पीठ घालून पुन्हा खमंग परतून घ्यावं.
-पाण्याचे शिपके देऊन शिजवावं.
-पाणी घालताना एक गोळा तयार होईल, त्याला दणदणीत वाफ येऊ द्यावी.
-गरम गोळ्याला बोटांनी (जपून) चिमटा काढावा.
-बोटांना चिकटला नाही म्हणजे शिजला असं समजावं.
-हे शिजत असताना एकीकडे ताटात खोबरं, खसखस आणि कोथिंबीर पसरून ठेवावी.
-शिजलेला गोळा यावर घालून, थापून, जाडसर वड्या पाडाव्या.
-कापून वेगळ्या ठेवाव्या.
-जेवायला बसताना वाटीत वड्या घेऊन त्यावर रस्सा घालावा.
-सढळ हातानं तेल आणि तिखट घातल्यावर गडद्-काळपट लाल असा तवंग येतो. खाण्याची तब्बेत नसलेल्यांच्या डोळ्यांसमोर झिलमिल तारे चमकतात. पोटाची औकात नसल्यास आपण पुचाट रस्सा करावा.
-वड्या आणि रस्सा एकत्र उकळवू नये.
-काहीही आंबट घालू नये. अगदीच न राहवल्यास सावजी आणि कोकमं एकाच वाक्यात आल्याबद्दल आश्चर्य न वाटू देता कोकमं घालावी.
-ही पध्दत पारंपारीक 'सावजी स्टाइल' आहे असं कळलं. एरवी वड्यांचं सांबारं वेगळ्या पध्दतीनं होतं.
व्वा, काय भारी तोंपासु आहे हे
व्वा, काय भारी तोंपासु आहे हे प्रकरण. पण आयते खायला जास्त मजा येईल
झिलमिल केलं , खाल्ल. डा.पिठ
झिलमिल केलं , खाल्ल. डा.पिठ थोडस करपल्याने, वड्यांचा रंग खास नाही आला. बाकी मजा आली.
धन्यवाद मृण्मयी
वॉव!! आरतीचा फोटोही जबरी
वॉव!!
आरतीचा फोटोही जबरी दिसतोय... तोंपासु!
मृण्मयी, मस्तच रेसिपी. फोटो
मृण्मयी, मस्तच रेसिपी. फोटो तोंपासु.
नलिनी, आरती तुमच्या दोघींचे फोटोसुद्धा सही आहेत.
मला बनवण शक्य नाही, हे सुद्धा तुमच्याकडून खाण्याच्या लिस्ट मध्ये.
पहिल पुडाच्या वड्या लक्षात आहेत न.
वा एकदम तोंपासु. यात
वा एकदम तोंपासु. यात वड्याऐवजी गोळे केले तर गोळ्याचे सांबारं होईल. जबरी आहे एकुणच.
मी केलं होतं रविवारी. बाहेर
मी केलं होतं रविवारी. बाहेर धो धो पाऊस आणि हा गर्रम तिखट रस्सा. मजा आली. एकदम करैक्ट रेसिपी आहे.
तोंपासु फोटो आहेत अगदी....
तोंपासु फोटो आहेत अगदी.... करुन पाहणेबल.
माझेही झिलमिल. मला आवडते
माझेही झिलमिल. मला आवडते म्हणुन पाटोड्यामध्ये कोथिंबीर घातलीय. खाताना वाटले की जिभेला चटका बसवणरे तिखट केले असते तर अजुन मस्त लागले असते. पण आमच्याकडे पुचाट खायची पद्दत आहे.
जेवायलाच या आता...
साधना, तोंपासु! खरंच जेवायला
साधना, तोंपासु! खरंच जेवायला यावसं वाटतंय... बाजुच्या वाटीत खीर का?
हो. ये की.
हो. ये की.
वाह.. काय स्लर्पी
वाह.. काय स्लर्पी रेस्पीये..
आवडत्या दहात टाकून ठेवलीये.. म्हंजे साधना कडे जाऊन काय काय खायचेय त्या दहात
पण मला पुचाट रस्सा अज्जिब्बात चालणार नै हाँ.. साध>>ना.. सुन रही है ना तू ..!!!
मसाला डाल रही हु मै.. डर
मसाला डाल रही हु मै.. डर मत....
आरती आणि साधना, फोटो अप्रतिम
आरती आणि साधना, फोटो अप्रतिम आलेत.
आरती, करीचा रंग भारी आहे.
साधना, शेवटल्या वाढलेल्या पानाच्या फोटोकडे बघून रस्सा पुचाट वाटत नाही. वड्या मस्तं खुटखुटीत झाल्या आहेत.
आवर्जून करून बघणार्या आणि प्रतिसाद देणार्या सगळ्यंना धन्यवाद!
आरती आणि साधना, फोटो जबरी!!
आरती आणि साधना, फोटो जबरी!!
साधना, एकदम तोंपासु फोटो
साधना, एकदम तोंपासु फोटो आहेत.
साधनातै.. तोंपासु फोटो! खीर
साधनातै.. तोंपासु फोटो!
खीर कशाची आहे?
अगं आपल्या शेवया असताना ना
अगं आपल्या शेवया असताना ना हाथी ब्रंडवाल्या. त्या आहेत. गॅस बंद करुन नंतर गुळ घातला तरी खीर जराशी फाटली. त्यामुळे ओळ्खता येत नसावी
भाहारीही!!!
भाहारीही!!!
या रेसिपीनं सांबारं केलं
या रेसिपीनं सांबारं केलं पहिल्यांदाच. इतर काही पदार्थ होते आणि शेवटी कंटाळा आला म्हणून पाटवड्या न करता जाडसर तिखट शेव दिली रश्यासोबत. फारच आवडला हा प्रकार सगळ्यांना.
Pages