Submitted by अनघा कुलकर्णी on 4 August, 2013 - 07:16
बाबा
चंदना सारखा झिजतो तो, कुटुंबासाठी घाम गाळतो ,
स्वकष्टाचे चीज करतो. चिमुकल्यांना आसरा मिळावाम्हणून घरटे बांधतो तो ।
असेल त्या परीस्थितीत स्वत:ला झोकून देतो,
उनपावसाचा मारा झेलीत संकटांशी हात मिळवणी करतो तो।
माया ,ममतेचे पाश जरा दूर ढकलतो ,
आद्य कर्तव्याची कास धरतो ।
घराच्या सुखा साठी स्वत: नव्याने रोज उभा राहतो तो,
दिसत नाही त्याचे कष्ट ,संयम ,शांतता,
सहन शिलतेचा मंत्र सतत जपत असतो तो।
उच्च अधिकारी होतो तो,
गर्व नाही ,अभिमान बाळगतो तो I
कल्परुक्षाचे झाड लावतो,पुढील पिढीच्या सुखासाठी आज मात्र झोकून देतो।
जाणीव असावी मुलांना असा कष्टकरी बाबा आपला असतो।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनघा, खूपच सुंदर निरुपण केलेत
अनघा,
खूपच सुंदर निरुपण केलेत पितारुपी देवाचे.
छान वाटले वाचुन, माझे बाबा आठवलेच, माता पित्याची खर्या अर्थाने जाण राखत आहात, धन्य आहात.
नमस्कार |
ध्यन्यवाद.
ध्यन्यवाद.
कित्ती खरं