नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे " ऑगस्ट " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
यंदाचा विषय आहे... "रात्र" ..
मनोगत :-
ज्युरींचे मनोगतः
सर्व स्पर्धकांचे मनापासुन आभार. जुलै महिन्यात आलेल्या अल्प प्रतिसादामुळे माबोकरांचा या स्पर्धेतिल उत्साह मावळला की काय अशी शंका येऊ लागली होती. पण ऑगस्ट महिन्यात मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे ती शंका पार धुळिला मिळाली. थोड चिंतन केल्या वर आम्हाला जाणवलं की विषय योग्य असेल तर माबोकारांच्या उत्सहाला उधाण येतं. म्हणुनच या पुढेचे विषय विचारपुर्वक निवडले जातील याची काळजी आम्ही घेऊ.सर्वोकृष्ट फोटो निवडणे हे प्रत्येक महिन्याला एक आव्हान बनत चालले आहे. खुप सारे सुंदर आणि टेक्निकली करेक्ट फोटो स्पर्धेत येत आहेत. या महिन्यात तर आम्हा तिघा ज्युरींमधेच जुंपली होती नंबर देण्या वरुन ..... पण तेच आम्हाला अपेक्षित आहे... माबोकरंकडुन असे फोटो यावेत की आमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा कस लागावा.... शेवटी एकच म्हणावसं वाटतं की ... स्पर्धका लोभ असाच राहु दे...!!!
ह्या वेळेला चांगले फोटोज् निवडणं फार मुश्कील होतं. एक फोटो निवडावा तर दुसर्यावर अन्याय होतोय असं वाटत होतं. खरतर "माझी भटकंती : संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा... " व "इन्ना: कोकणातला संधीकाल" तसेच आशुचँप चा दैवी प्रकाश हे ३ फोटोज् ही आम्हाला आवडले होते पण हे फोटोज् night photography ह्या भागात न येता twilight photography ह्या भागात येतात म्हणुन त्यांना निवड होउ शकली नाही
प्रथम क्रमांक :- मामी ..लास वेगास
दिवस हा रात्रीचा या नावानुसार फोटो आहे... एका बाजुला रात्र आकाशात आहे तर दुसर्या बाजुला शहर दिवसासारखे उजळुन निघालेले आहे.. अतिशय सुंदर फोटो आणि योग्य सेटींग्स .
द्वितिय क्रमांक :
अ) यशस्विनी :- गार्डन बाय द बे
पर्फेक्ट फ्रेम, पर्फेक्ट अँगल आणि पर्फेक्ट आएसओ यामुळे फोटो खुप उठावदार झले आहेत.
ब) RMD :- तारे जमीं पर
पर्फेक्ट फ्रेम, पर्फेक्ट अँगल आणि पर्फेक्ट आएसओ यामुळे फोटो खुप उठावदार झले आहेत.
तृतीय क्रमांक :- रंगासेठ "स्टार ट्रेल"
उत्कृष्ट फ्रेम आणि करेक्ट एक्स्पोजरने तार्यांचा अल्मोस्ट १८० डिगरी प्रवास कॅप्चर केला आहे.
उत्तेजनार्थ :-
१) सविरा :- लासवेगास मधली रोषणाई
२) स्वरुप :- लाईट आर्ट
जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
चला तर करुया सुरुवात
***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.
प्रवेशीका १ : लास वेगास
प्रवेशीका १ :
लास वेगास
मस्त विषय स्टॉक मधे रात्रीचे
मस्त विषय
स्टॉक मधे रात्रीचे विशेष असे काढलेले फोटो फारच कमी आहेत, शोधावे लागतील तेव्हा नविन काढणे उत्तम, पाऊसही उघडीप देतोय, तर क्यामेरा बाहेर काढायला हरकत नाही.
पर्यटक माबोकरांकडून मात्र भरपुर ठिकाणे पहायला मिळतील असे वाटते.
शागं हा फोटो जर्सी सिटी मधला
शागं हा फोटो जर्सी सिटी मधला आहे ना, इंडिया स्ट्रीटवरचा
१. अथक धावणारी मुंबापुरी
१. अथक धावणारी मुंबापुरी ...
१. वेग ..
मामी, क्लास! प्रसन्न, फोटो
मामी, क्लास!
प्रसन्न, फोटो दिसत नाहीये
यावेळी आपल्याला शक्य असल्यास
यावेळी आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....
व्वा! छान फोटो.
व्वा! छान फोटो.
रिया आता दिसतोय का? @उदयन :
रिया आता दिसतोय का?
@उदयन : माझ्याकडे डीजी क्याम असल्याने सेटिंग काय कपाळ सांगणार
प्रसन्न नाही... तू कुठुन
प्रसन्न नाही...
तू कुठुन उपलोड करतोयेस?
(ते माझ्या हापिसात ब्लॉक असावं बहुदा )
मस्त फोटो आलेत. थीम छान आहे
मस्त फोटो आलेत. थीम छान आहे
मस्त थीम! मामी फोटो सही आलाय
मस्त थीम! मामी फोटो सही आलाय
प्रसन्न, फोटो दिसला छाने
प्रसन्न, फोटो दिसला छाने
रिया, रिफ्रेश करुन बघ बर.
मामे.........फोटो जबरदस्तच!
मामे.........फोटो जबरदस्तच!
(No subject)
(No subject)
मला फोटो कसे अपलोड करायचे हे
मला फोटो कसे अपलोड करायचे हे सांगाल काय कोणी?
मी_केदार, छान प्रचि आहेत. ती
मी_केदार,
छान प्रचि आहेत. ती पहिल्या प्रचि मध्ये फुलांची रास कशाबद्दल आहे? काही विशेष पूजा?
ती पहिल्या प्रचि मध्ये
ती पहिल्या प्रचि मध्ये फुलांची रास कशाबद्दल आहे? काही विशेष पूजा? >>> सौ. च्या मंगळागौरीची पूजा
१. त्रिपिरी पौर्णीमेला एका ७१
१. त्रिपिरी पौर्णीमेला एका ७१ वर्षांच्या काकांनी मंदिरात काढलेले चित्र.
२ पिंजोर गार्डन.
३.काशीला गंगेची आरती सुरू असताना पाण्यात दिसलेले दृष्य. (हा दोन वर एक फ्री)
माझा ही एक प्रयत्न
माझा ही एक प्रयत्न
अजुन एक मान्सून ऑफर 2 वर 1
अजुन एक
मान्सून ऑफर 2 वर 1 फ्री
फोटोग्राफीचे तंत्र अवगत
फोटोग्राफीचे तंत्र अवगत नाही..आणि मेगा पिक्सेल कॅम ही नाही....तरी प्रयत्न करुन पाहिला......
१. काळोखात प्रकाशाचा वेग
२. मुंबई मधे रात्र दिवस हा फरक उरलाय कुठे????
३.रात्री ११.३० वाजता नवर्याबरोबर भटकत असताना आइसक्रीम खायचा मोह आवरला नाही..... ( हा मात्र असाच....स्पर्धेसाठी वरचे दोन फोटो... तरी पण हा असाच टाकलाय )
छान आले आहेत फोटो . . . कृपया
छान आले आहेत फोटो
.
.
.
कृपया २ फोटोच देणे ..:)
केदारदादा, दुसरा फोटो मस्त!
केदारदादा, दुसरा फोटो मस्त!
लिंबूदादा, नाही दिसतेय तरीही
अनिष्का पहिला फोटो क्लास...
बाकीही सगळ्यांचे फोटोज मस्त!
सर्वांनी मस्त फोटो टाकलेत, आज
सर्वांनी मस्त फोटो टाकलेत, आज दीप-अमावस्या त्यामुळे दिव्यांचे फोटो आजच्या दिवसासाठी दीपपूजन केल्यासारखे वाटले आणि स्पर्धेसाठीपण छान.
मामी, लास वेगासचा फोटो
मामी, लास वेगासचा फोटो अप्रतिम
धन्यवाद. मलाही आवडलाय! एकदम
धन्यवाद. मलाही आवडलाय!
एकदम प्रोफेशनल का कायसा म्हणतात ना तसा आलाय!
लाइट आर्ट: आतषबाजी असाच एक
लाइट आर्ट:
आतषबाजी
असाच एक हुकलेला फोटो:
हुकला तरी चांगला आला आहे
हुकला तरी चांगला आला आहे
मामी, शोभा मस्त आहेत फोटो.
मामी, शोभा मस्त आहेत फोटो.
Pages