अर्जंट वैद्यकीय उपचारांकरता मदत हवी आहे

Submitted by रचु on 1 August, 2013 - 11:50

माझ्या भारतातल्या शेजार्‍यांच्या फॅमेली मधे अर्जंट बायपास करायची आहे, १-१.५ लाख खर्च आहे.
मेडीकल साठी पैशाची मदत करणारी एखादी संस्था माहीती आहे का कुणाला?

पियु परी | 7 August, 2013 - 14:44

माझ्या एका ओळखिच्या आजोबांना ब्लड कॅन्सर झाला आहे. त्यांची महीन्याची औषधे ६५,००० पर्यंत जातात.

काही मदत मिळेल का?

ती औषधे जरी त्यांना कोणी कमी किमतीत किंवा मोफत देऊ शकले तरी खुप झाले. पैसेच हवे आहेत असे नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शत्रक्रिया कुठे करायची आहे? तेथील स्थानिक वृत्तपत्रात आवाहनपर बातमी द्या (मुंबईत मिड-डे हे दैनिक अशी आवाहने छापते). मदत नक्की मिळते.

शुभेच्छा.

(शेजारी उंदराचा बाफ ओसंडून वाहत असताना इथे कुणाचे लक्षच नाही!)

रचु,
सर्व रुग्णालयांमध्ये अशा संस्थांच्या याद्या असतात. ज्या रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे, तिथेच कृपया चौकशी करा.
वृत्तपत्रांमधून आवाहन करणं हा एक मार्ग आहे. काही रोटरी क्लबही अशी मदत करतात.

तुमच्या शेजार्‍यांची फॅमिली कुठे राहते? शस्त्रक्रिया कुठल्या गावात, कुठल्या हॉस्पिटलात करायची आहे ही माहिती देखिल लिहा.

रचु, हॉस्पिटल्समध्ये सोशल वर्कर्स नेमलेले असतात. ते मदत करतात ह्या कामी. जिथे शस्त्रक्रिया होणार आहे तिथे ताबडतोब चौकशी करायला सांगा. माझी एक मैत्रिण पश्चिम उपनगरात असलेल्या एका प्रसिद्ध मंदिराची ट्रस्टी आहे. त्या मंदिरातर्फे रेग्युलर बेसिस वर वैद्यकिय कारणासाठी मदत, फुकट तपासणी, उपचार मिळतात. तुम्ही इथे काही अजून डिटेल्स दिलेत तर तिला विचारु शकेन काही मदत मिळू शकते का ते.

बादवे, हल्ली बायपासला प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये १-१.५ लाखांपेक्षा खूप जास्त खर्च येतो. हा खर्च जनरल हॉस्पिटल्स किंवा ट्रस्ट्सनी चालवलेल्या हॉस्पिटल्समधला असेल तर तिथे सोशल वर्कर्स असतातच असतात.

रचु कोणत्या भागात मदत हवी आहे? तिथल्या हॉस्पिटल्स मध्ये चौकशी करा. वैदयकीय मदत करणारे डॉ. व संस्था यांची माहीती तिथे मिळेल.

रोटरी क्लब्स वगैरे मदत करतात पण त्यांना लिमिट असते.

धन्यवाद सगळ्यांना,
माझ्या भारतातल्या शेजार्‍यांनाच मदत हवी होती, त्यांना आम्ही सगळ्यांनी थोडी मदत केली आणि दवा़खान्यात राजीव गाधी का नेहरू स्किम मधुन पण मदत मिळवुन दिली.
हॉस्पिटल्समध्ये सोशल वर्कर्स नेमलेले असतात>>> अश्या सोशल वर्कर्सचीच मदत घेवुन ऑपरेशनचा खर्च १ ते १.५ लाख झाला.
या संदर्भात अजुन एक माहीती अशी मिळाली की जर आमदार कोट्यातुन पण मदत मिळते पण किती खरं ते नाही माहीती.

माझ्या एका ओळखिच्या आजोबांना ब्लड कॅन्सर झाला आहे. त्यांची महीन्याची औषधे ६५,००० पर्यंत जातात.
काही मदत मिळेल का?
ती औषधे जरी त्यांना कोणी कमी किमतीत किंवा मोफत देऊ शकले तरी खुप झाले. पैसेच हवे आहेत असे नाही.
रचु प्लीज हे पण हेडर मध्ये घालतेस? माझी पर्सनल विनंती आहे.

>> ते आजोबा आता हयात नाहीत. Sad

मी काय म्हणतो...कोण काय करतं याचा हिशोब देण्यापेक्शा..आपण जर होईल तशी मदत केली तर....we are in hundreds on Maayboli.....जर पुण्यात गरज असेल तर I pledge 1000 rs. NOW.

फक्त कोणि ह्या गोष्टी coordinate karat असेल तर सान्गा....मी पल्याडला असतो पण आत्ता माझी बायको India मधे आहे....she can send the money wherever u say.

I understand that there will be problems about who will coordinate and how etc.

रचु let me know..

नानांशी पूर्ण सहमत आहे.. मा-बो वरच्या प्रत्येकाने १०० रुपये दिले तरी काम भागेल … फक्त त्याची सवय लागून जाऊ नये एवढीच अपेक्षा … कारण साधू आणि संधी साधू यातला फरक आजकाल खूपच विरळ झालाय

राजीव गांधी योजनेत पैसे भरावे लागतात का महाराष्ट्रात?
इकडे कर्नाटकात वाजपेयी किंवा आंध्रात राजीव गांधी आरोग्यश्री योजनेत एकही पैसा भरावा लागत नाही.
बीपीएल कार्डधारकांना मी स्वतः या अंतर्गत ऑपरेट करून घेतलं आहे.
सी ए बी जी(बायपास) शस्त्रक्रीया किमान २०-२५ जणांच्या एकही पैसा भरावा न लागता(त्याचबरोबर एका नातेवाईकाच्या जेवणखाण्यासकट मोफत ) मी स्वतः करून घेतल्यात. (आंध्र आणि कर्नाटक मिळून)
त्यामुळे महाराष्ट्रात याला पैसे लागतात वाचून मला आश्चर्य वाटतंय.

नाना फडणवीस, धन्यवाद Happy
तुम्ही द्यायची तयारी दाखवलीत हे पण खुप आहे, त्या काकांच्या वतीने मी सगळ्यांना धन्यवाद देते Happy
ह्या काकांच ऑपरेशन नेक्स्ड वीकला केम मधे आहे.
साती या राजीव गांधी योजने बाबद पुर्ण माहीती नाही पण रेशन कार्डाच्या कलर नुसार पण काही योजना आहेत. प्रत्येक हॉस्पिटल मधे वेगवेगळी माहीती मिळाली.

या संदर्भात माहीती काढताना अजुन एक माहीती मिळाली,पुढे कुणालातरी उपयोगी पडेल.
Narayana Hrudayalaya नावच एक चांगलं हॉस्पिटल आहे, ईथे बर्‍याच गरजू लोकांवर मोफत / कमी किमती मधे शस्त्रक्रिया केली जाते. फक्त हे हॉस्पिटल महाराष्ट्रात नाही.