हिंदु धर्म आणि शाप

Submitted by वेडा राघू on 30 July, 2013 - 11:27

हिंदु धर्म आणि शाप

हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. Happy शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित.

प्रचंड तिरस्कार मनात घेऊन शाप दिल्यास तो कदाचित फळाला येत असावा की काय असे वाटते. पण मग याने शाप देणार्‍याला काही त्रास नसेल का होत? प्रत्येकालाच कुणाचा ना कुणाचा शाप आहे. हिंदु धर्मात तशी एकंदरच क्षमा केल्याची उदाहरणे क्वचितच दिसतील. मग आपण स्वतःला क्षमाशील / सहिष्णू वगैरे का समजतो ? शापाला उ:शापही असतात का? ते नेमके कुणाकडून घ्यावेत ? ज्याने शाप दिले त्याच्याचकडून ? की कोणाकडूनही?

अशा शापांच्या मनोरंजक कथा / प्रसंग / तात्पर्य एकत्र करण्यासाठी हा धागा आहे. इतर धार्मिक माहितीही चालेल.

१. सर्वात भीषण शाप. वाल्मिकीनी व्याधाला दिला. पक्ष्याला मारल्याबद्दल.

२. दशरथाला श्रावणाच्या पिताजींचा शाप.

३. कर्णाला परशुरामाचा शाप ( तुझी विद्या विफल होईल .)

४. अर्जुनाला उर्वशीचा शाप. ( तिची कामवासना पूर्ण न केल्याने तिने शाप दिला तू नपुंसक होशील. मग तो बृहन्नडा झाला.)

५. वेदवतीचा रावणाला शाप. ( तुला मुलगी होईल, ती तुझा नाश करेल. ती मुलगी म्हणजे सीता.)

६. रामाला वालीचा शाप. ( तू बाण लागून मरशील. तो कृष्णावतारात खरा ठरला.)

७. रामाला वालीची पत्नी तारा हिचा शाप. ( तुझी बायको तुला मिळेल, पण अल्पकाळात ती पुन्हा दुरावेल.)

८. गणपतीचा चंद्राला शाप. ( क्षय)

९. अर्जुनाचा समस्त स्त्रीजातीला शाप. ( तुमच्या मनात कोणतेही रहस्य लपून रहाणार नाही. )

१०. कृष्णाला गांधारीचा शाप. ( निर्वंश होशील.)

११. यादव कुळाला कुण्या ऋषीचा शाप. ( नष्ट व्हाल. ऋषीची चेष्टा केल्यामुळे.)

१२. जय विजय याना कुणा अप्सरेचा शाप की तुम्ही प्रत्येक जन्मात राक्षस व्हाल.

१३. ब्रह्मदेवाला शंकराचा शाप. तुझी कुणी पूजा करणार नाही. ( कारण काय?)

१४. अश्वत्थाम्याला कृष्णाचा / द्रौपदीचा शाप . ( डिटेल्स ?)

१५. कुणला तरी शाप . तू साप चाउन मरशील. मग बोराच्या बीतून अळी येऊन त्याचा साप होतो.

१६. अंबेचा भीष्माला शाप. अंबेला शिखंडीचा जन्म मिळाला त्यातही आणखी कुठला तरी एक शाप आहे.

१७. इंद्राला सहस्त्र भोकं पडतील असा शाप. ( अहिल्या )

अँड सो ऑन ............

शाप घेण्यात पुरुष आघाडीवर दिसतात, तर शाप देण्यात स्त्रीया. Proud

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

शाप दिला असला तरी त्या शापानेही काहिंचे भलेच झाले.....
राजा दशरथाला पुत्र होत नव्हते... कोणीतरी त्याला शाप दिला की तुला चार मुले होतील... पण तुझ्या मरणावेळी तुझ्याजवळ एकही हजर नसेल....
Lol

खुप चांगले कलेक्शन आहे.
प्रत्येकाच्या वाणी मध्ये एक शक्ति असते, तिचा चांगला उपयोग करुन आपण सर्वांचे कल्याण साधु शकतो.
व तिचा दुरुपयोग करुन नुकसान ही करु शकतो, असे वाचलेले आहे.
वाणी ची ही शक्ति कशी वाढवावी हे कोणी सांगु शकेल काय?

<< वाणी ची ही शक्ति कशी वाढवावी हे कोणी सांगु शकेल काय? >> याबाबतच्या तांत्रिक उपायांविषयीं मीं अनभिज्ञ आहे. पण या संबंधी मला बराचसा पटलेला खुलासा असा आहे -' जर तुम्हीं नेहमीं फक्त सत्यच बोललात, तर कालांतराने तुम्ही जें बोलाल तें सत्य होते !'. मला वाटतं एखाद्याचा शाप [किंवा आशिर्वाद] खरा होण्यासाठी वाणीला किमान इतकं तरी नैतिक पाठबळ आवश्यक असावं.

मला शाप वै. माहित नाही.
पण "पेराल ते उगवेल" या न्यायावर बराच विश्वास आहे.
म्हणजे आपण जे चांगले/ वाईट कृत्य केले ते फिरुन आपल्याकडे येते यावर विश्वास आहे.

कित्येक प्रसंगात मी एखाद्याला ज्या प्रकारची मदत केली होती तश्याच प्रकारची मदत मला मिळाल्याचे आठवते आहे.

उदा. मी जुनी पुस्तके खालच्या इयत्तेच्या मुलांना दिल्यावर मी शोधत असलेली वरच्या वर्गातली पुस्तके मला कोणीतरी येऊन देणे किंवा मी कोणाचातरी रस्त्यात पडलेला मोबाईल परत केल्यावर मलाही माझा मोबाईल असाच कोणीतरी परत करणे इ.

माझा "because kindness keeps the world afloat" या तत्वावर आणि http://www.youtube.com/watch?v=ePWUeVWy3Sw या व्हिडिओवर अतिप्रचंड विश्वास आहे.

@ सपना हरिनामे, आपले फार फार आभार. आपण हा धागा वर आणल्याने मला 'शाप' ह्या विषयावर सर्वांचे मौलिक विचार वाचायला मिळाले. माबोवरील इतक्या ज्ञानी लोकांच्या सहवासात मी आलोय, ह्याकरिता मी स्वतःला पुण्यवान समजतो.

बॉम्बे टू गोवा आठवला,
ललिता पवार मेहमूदला म्हणतात "मैं तुम्हे श्राप देती हूँ"
मे. : मैं शराब नही पीता (बहुतेक त्याने श्राब ऐकले असावे)
ल. : तुम अगले जनममें मुर्गा बनोगे
मे. : लेकिन ज्योतषीने तो कहा हैं की मैं अगले जनममे कुत्ता बनुन्गा, काट के खा लेना

जर तुम्हीं नेहमीं फक्त सत्यच बोललात, तर कालांतराने तुम्ही जें बोलाल तें सत्य होते !'.>>> +१११
(पण ह्या सत्याला १२ वर्षांची तपस्या लागते, १२ वर्षापर्यंत एकही खोटा शब्द बोलू नये.)

Pages