Submitted by समीर चव्हाण on 29 July, 2013 - 02:49
संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जीव आटवुन मिळेल ह्याची आहे का
जीव आटवुन मिळेल ह्याची आहे का खात्री
मिळेस्तोवरी जगू कुणाच्या बापाला ठाउक
एकसारखी प्रश्नांची सरबत्ती चालू
सुटका नाही तर नाही, पण उसंत लाभो
उन्मादाच्या टोकाला साधूपण स्थिरावते
आणि विरक्ती फिरून येते भोगाच्या दारी
वेगळेपणाची बाधा दुनियेला झालेली
काय नेमके करायचे ठाऊक कुणाला
कुठवर देइल साथ देह हा, मेंदू हा
कधीतरी परवड मित्रा होणारच की
बरेच जाते डोक्यावरून पण मुंडी हालवते
वाईट फार ही सवय कशाने अपुल्याला जडली
हे शेर फार आवडले
व्वा व्वा व्वा! कोट करायच्या
व्वा व्वा व्वा!
कोट करायच्या म्हंटल्या तर ८० % कोट कराव्या लागतील.
उत्तम द्विपदींची मालिका
धन्यवाद
सुंदरच
सुंदरच
मस्तच पुन्हा एकदा उत्तमोत्तम
मस्तच पुन्हा एकदा उत्तमोत्तम शेरांची मेजवानी दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार
मलाही मोअर दॅन ८० % शेर कोट करण्याइतपत आवडले उरलेल्या शेरात एखादी ओळ कमी आवडली असेल पण सगळेच शेर आवडले
किती राहीले कोणाला माहीत
किती राहीले कोणाला माहीत तसेही . . . . .
व्व्व्वा ! ! !
उसंत, विरक्ती, मार्ग नागमोडी,
उसंत, विरक्ती, मार्ग नागमोडी, परवड, प्रवासातला तास
हे सर्वात विशेष वाटले.
भन्नाट......
भन्नाट......
धन्यवाद मित्रांनो. समीर
धन्यवाद मित्रांनो.
समीर
बढिया आहेत सर्वच व्दीपदी.
बढिया आहेत सर्वच व्दीपदी.
मुटेजी, मनापासून धन्यवाद.
मुटेजी, मनापासून धन्यवाद.
अरे कसे लिहून गेलास? वास्तव
अरे कसे लिहून गेलास?
वास्तव आहे.. मिष्कीलता आहे.. कोपरखळ्या आहेत.. आश्चर्य आणि तत्वज्ञानही...
वाह गुरू, मजा आ गया...!
बादवे, हा फॉर्म अभ्यासायला
बादवे,
हा फॉर्म अभ्यासायला आवडेल... जरा माहिती देतोस का
सुर्रेखच ....
सुर्रेखच ....
धन्यवाद, बागेश्री आणि
धन्यवाद, बागेश्री आणि शशांकजी.
अरे कसे लिहून गेलास?
गेल्या दोन महिन्यांत प्रचंड प्रवास केला:
मिलान-गार्नेनो, नैनीताल-मुक्तेश्वर-भीमताल, पुणे-बंगलोर, कोलकत्ता, त्याचेच आउटकम.
हा फॉर्म अभ्यासायला आवडेल... जरा माहिती देतोस का
विशेष काही नाही. ही रचना अनेक शेरांची शृंखला आहे. शेर मात्रा वृत्तात आहे. बहुतेक शेर २४, २६, २८ मात्रांमध्ये आहेत. ह्याचा फायदा असा की रदीफ-काफिया ह्यांची बंधने सुटतात, आणि स्वतःला छान एक्सप्रेस करता येतं. तोटा असा की गझलेचं स्ट्रक्चरल सौंदर्य राहत नाही.
धन्यवाद.