मरगळलेल्या मनात आनंदाच्या सरी बरसु लागतात......................जेव्हा मी तुला पाहतो
आजवर पाहिलेली सगळी स्वप्ने खरी वाटु लागतात......................जेव्हा मी तुला पाहतो
निराशेच्या अंधारात आशेचे नंदादिप उजळु लागतात.....................जेव्हा मी तुला पाहतो
मिटलेल्या डोळ्यांतही तुझ्याच अदा रेंगाळु लागतात......................जेव्हा मी तुला पाहतो
चांदणरातीतली सारी नक्षत्रे तुझीच छबी दिसु लागतात...................जेव्हा मी तुला पाहतो
तुझवर रुसायची सारी कारणे पुढे बालिश वाटु लागतात...................जेव्हा मी तुला पाहतो
सुखांची हरवलेली सारी गाठोडी अवचित हाती लागतात..................जेव्हा मी तुला पाहतो
तुझवीन जगण्याच्या सार्या कल्पना नकोश्या वाटु लागतात............. जेव्हा मी तुला पाहतो
आता
माझ्या स्वः च्या खुणा तुझ्या आस्तित्वात दिसु लागतात..................जेव्हा मी तुला पाहतो
कविता सहज आणि एकदम थेट आहे
कविता सहज आणि एकदम थेट आहे
दिसु वाटु असे र्ह्स्व करायची
दिसु वाटु असे र्ह्स्व करायची आवश्यकता नव्हती ..
"............" याचीही नव्हती फारशी
असो
शुभेच्छा
धन्यवाद........
धन्यवाद........

छान आहे कविता . आवडली .
छान आहे कविता .
आवडली .