मागच्या वर्षी कॅनडा मध्ये क्युबेक राज्यात एका मोठ्या university मध्ये मी (engineering )research intern होतो तेंव्हाची गोष्ट. एकदा देवाच्या कृपेने त्या दिवसाचे experiments लवकर उरकले आणि मी घरी येउन, जर फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळच्या (झकास ) हवेत फेर-फटका मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. अथांग पसरलेल्या हिरवळीतून नागमोडी गेलेल्या पायवाटेवरून मी चालत होतो. बाजूला काही ठराविक अंतराने बेंचेस होती आणि त्यावर काही तरुण तर काही आजूबाजूचे (फिरायला आलेले )वृध्द गप्पा मारत बसले होते. माझ्या समोरुन एक भारतीय मुलगा ( किंवा रंगावरून पाकिस्तानी असावा ) हातात काहीतरी खात खात चालत होता. चालता चालता त्याने खाऊन झालेला तो कागद तिथेच भिरकावला आणि बेफिरीने पुढे निघून गेला. मला स्वतालाच त्याचा राग आला ( पण मीही पुढे होऊन तो कागद उचलला नाही ! ). तर तिथे बसलेले एक आजोबा ( साठी उलटली असेल) उठून त्या ठिकाणी आले, त्यांनी तो कचरा स्वताहून उचलला आणि शेजारच्या कचराकुंडीत नेउन टाकला . मी जवळ आल्यावर माझ्या लक्षात आलं कि ह्यांचाच फोटो आमच्या तिथल्या departmentच्या " researcher's hall of fame " मध्ये आहे...! माझ्याकडे बघून ते इतक्या प्रसन्नपणे हसले ( कधीतरी बिल्डिंगमध्ये जा ये करताना मी त्यांना "good morning" मारला होता ! ) कि मला मेल्याहून मेल्यासारख झालं . इतका मोठा माणूस आणि इतका साधेपणा आणि काय तो "सिविक सेन्स " !!
आपण म्हणतो कि आपल्याकडे सगळ आहे… त्यांची संस्कृती वाईट आहे…वगैरे वगैरे…! पण जोपर्यंत हा "civic sense" आपल्याकडे येत नाही… तोपर्यंत आपली खरच प्रगती होऊ शकेल का ?
"civic sense"
Submitted by Omkar Deshmukh on 20 July, 2013 - 01:13
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सार्वजनिक अस्वच्छता ही
सार्वजनिक अस्वच्छता ही भारताची परंपरा, संस्कृती वगैरे आहे. ती धुडकवायची म्हणता?
छे छे काहीतरीच...
छान आठवण आहे. एक भारतीय मुलगा
छान आठवण आहे.
एक भारतीय मुलगा ( किंवा रंगावरून पाकिस्तानी असावा ) > तो मुलगा हिरव्या रंगाचा होता का?
नीधप +10000
नीधप +10000
आपल्याकडे आता इतके विविध
आपल्याकडे आता इतके विविध सामाजिक सांस्कृतिक प्रवाह असताना अश्या चांगल्या गोष्टी संस्कृती म्हणून रुजणे केवळ अशक्य आहे... इथे कायदाच हवा... तोही कडक अणि अंमलबजावणी त्याहुन कडक!
या सगळ्याची जाण असणारे, मुळात इच्छाशक्ती असणारे राजकीय नेतृत्व जोपर्यंत लाभत नाही तोपर्यंत हे सगळे होणे निव्वळ अवघड
सिव्हिक सेन्स येण्यासाठी
सिव्हिक सेन्स येण्यासाठी आपल्याकडे काय जाणीपुर्वक प्रयत्न होतात? हा खरा प्रश्न आहे.
धार्मिक विचारांच्या बाबतीत
धार्मिक विचारांच्या बाबतीत युरोपमधील एखादा मोठा पंडितही हिंदुस्थानातील एखाद्या शेतकऱ्यापुढे पोरकट ठरेल; याच्या उलट युरोपमधील झाडूवाल्यासही सार्वजनिक कर्तव्याची व हक्काची जी जाणीव असते, ती आमच्याकडील मोठमोठ्या पुढारयांस व मुत्सद्यांसाही नसते.
आज ध्येयाची देवाणघेवाण करण्याची वेळ आली आहे. मानव जातीस आपल्या मुलांना तेच तेच धडे शिकवावयास अवसर नाही. मानवजातीची अशी अपेक्ष्या आहे की, पृथ्वीच्या एका भागात जो धडा तिने शिकविला तो जगातील इतर लोकांनी घ्यावा व आपलासा करावा. पौर्वात्य विचार पाश्चिमात्य जगाला लवकरच जिंकून घेणार यात शंका नाही; आणि पौवात्यांच्या विकासाला पाश्चिमात्य ध्येये व पद्धती येथे येऊन हातभार लावतील, ही गोष्टसुद्धा तितकीच खरी आहे. एकमेकांनी एकमेकांस पूर्ण व्हावयास मदत करायची आहे. एकमेकांचे विशिष्टत्व नाहीसे करावयाचे नाही. पूर्व पश्चिमेस हात देईल व पश्चिम पूर्वेच्या मदतीस येईल. ईश्वराच्या या विश्वामंदिरात पूर्व व पश्चिम एकमेकांचे हात धरून प्रेमाने फुगडी घालतील.
भगिनी निवेदिता
जन्म - २४ ऑक्टोबर १८६७ (आयर्लंड)
हिंदुस्थानात आगमन - २८ जानेवारी १८९८
मृत्यू - १३ ऑक्टोबर १९११
हे २०१३सालीपण लागू आहे!