नासा - एम्स स्पेस सेटलमेंट डिझाइन काँटेस्ट
दर वर्षी नासा एम्स आणि नॅशनल स्पेस सोसायटी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेली ही स्पर्धा जगभरातल्या बारावी (वय मर्यादा १८ वर्षांपर्यंत) पर्यंतच्या वर्गांसाठी खुली असते. वैयक्तिक, दोन ते सहा विद्यार्थ्यांचा छोटा गट आणि सात किंवा त्याहून जास्त विद्यार्थ्यांचा मोठा गट अशी स्वतंत्र विभागणी असून त्या प्रत्येक गटातून सर्वोत्तम प्रवेशिका निवडली जाते. प्रत्येक गटाने मांडलेली कल्पना ही त्यांची स्वतःचीच असून कोणतेही लिखाण हे मायाजालातून कॉपी/पेस्ट च्या आधारे केलेले नाही ह्याची चाचपणी जजेस करत असतात.
अंतराळातील वसाहत ही संकल्पना उतरवत असताना गणित, भौतिकशास्त्र, सजीवशास्त्र, अंतराळविज्ञान आणि असेच इतर विषय अभ्यासण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळते. चित्रं, निबंध, मॉडेल्स, गोष्टी तसेच इतर कलाविष्कार ह्यांच्या सहाय्याने स्पर्धक आपली कल्पना साकारू शकतात. एक स्वतंत्र कॉलनी किंवा अंतराळ निवासाचं फक्त एखादच अंग ह्यावर स्पर्धक आपले लक्ष केंद्रित करू शकतात.
गोवेकरांसाठी खुषखबर अशी की, मुष्टिफंड हाय स्कूल, गोवा ह्या शाळेचे तीन विद्यार्थी, अक्षय ए. एस. रेगे, सुयोग कामत आणि माधव क्षिरसागर ह्या तिघांनी चक्क अंदाजे गोव्याची जनसंख्या सामावून घेऊ शकेल अशा वसाहतीची कल्पना चित्र आणि लिखाणातून माडली. असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ अॅस्ट्रॉनॉमी ह्या पणजीतील संस्थेचे हे सदस्य अवकाशातील ग्रह, तारे, वातावरण, हवामान ह्याच्या कूतुहलातून पार अंतराळ विश्वाची माहिती शोधण्यामागे लागले. जगभरातल्या २० देशांतून आलेल्या १५३२ विद्यार्थ्याच्या ५९२ प्रवेशिकांमधून ह्या त्रयीने जेव्हा २०१३ साठीचं अकरावी च्या वर्गासाठीच, छोट्या गटातील तिसरं पारितोषिक पटकावलं तेव्हा कुठे अशा प्रकारची सुद्धा काही स्पर्धा असते हे माझ्यासारखीला कळलं.
जवळजवळ महिन्यापूर्वी निकाल लागून, नासाचं सर्टिफिकेट घरी येऊन सुद्धा आम्हाला मात्र अगदी काल परवाच ह्या गोष्टीची बातमी देणारा माझा पुतण्या सुयोग ह्याने माझ्याकडून योग्य तो ओरडा खाल्लाच परंतु मला नव्याने मिळालेली ही स्पर्धेबद्दलची माहिती जर मी पुढे पाठवली नाही तर मात्र पुढच्या विद्यार्थ्यांचं किती नुकसान होईल हा विचार मनात येऊन मी हा लेखनप्रपंच केला. मायाजालावर ह्या स्पर्धेची विस्तृत माहिती उपलब्ध असून २०१४ साठीची स्पर्धा जाहीर झालेली आहे. वरील काँटेस्ट च्या नावाने गुगलमध्ये शोध घेतल्यास सर्व माहिती मिळू शकेल. इच्छुकांनी त्वरा करा. भारतीयांची हुशारी जगापुढे येउद्या.
तुमच्या पुतण्याचे आणि
तुमच्या पुतण्याचे आणि त्याच्या सहकार्यांचे अभिनंदन!
स्वती२ +१. वाचून बरे
स्वती२ +१.
वाचून बरे वाटले.
भारतीयांची हुशारी जगापुढे येउद्या +१००.
नाहीतर इथे नुसतेच भ्रष्टाचार नि भारतातले वाईट काय याचीच चर्चा होते. वीट आला त्याचा.
अर्रे वा, अभिनंदन!!
अर्रे वा, अभिनंदन!!
खूपच छान ... अभिनंदन
खूपच छान ... अभिनंदन
स्वाती२, झक्की,
स्वाती२, झक्की, स्वाती_आंबोळे, विजय........ धन्यवाद !
झक्की,
तुमच्या पुतण्याचे आणि
तुमच्या पुतण्याचे आणि त्याच्या सहकार्यांचे अभिनंदन!+१
सुयोग आणि त्याच्या टीमचे
सुयोग आणि त्याच्या टीमचे अभिनंदन...
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
चैत्राली, हिम्स्कुल, बिनु,
चैत्राली, हिम्स्कुल, बिनु, अखी, धन्यवाद !
सोनचाफा अभिनंदन सुयोग आणी
सोनचाफा अभिनंदन सुयोग आणी टिमचे. आणी तुम्हालाही धन्यवाद, ह्या अनोख्या स्पर्धेची माहीती इथे दिल्याबद्दल्.
अभिनंदन
अभिनंदन
तुमच्या पुतण्याचे आणि
तुमच्या पुतण्याचे आणि त्याच्या सहकार्यांचे अभिनंदन!
सुयोग अन सहकार्यांचे
सुयोग अन सहकार्यांचे अभिनंदन.
यानिमित्ताने हा विषय तरी कळला, धन्यवाद.
टुनटुन, थमी,मी नताशा आणि
टुनटुन, थमी,मी नताशा आणि लिंबूटिंबू, सर्वांचे आभार..
वा मस्तच. सुयोग आणि त्याच्या
वा मस्तच. सुयोग आणि त्याच्या टीमचे हार्दिक अभिनंदन.
मस्त. सुयोग आणि त्याच्या
मस्त. सुयोग आणि त्याच्या टीमचे हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन.. ऐरोली येथिल
अभिनंदन..
ऐरोली येथिल डि.ए.व्ही. स्कुल ने २००८ साली या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मिळवीले होते.. तेव्हा त्या पुर्ण चमुस washington DC येथिल International Space Development Conference मध्ये project presentation साठी आमंत्रीत केलं गेलं होतं..
सुयोग आणि त्याच्या टीमचे
सुयोग आणि त्याच्या टीमचे अभिनंदन...
मला नव्याने मिळालेली ही स्पर्धेबद्दलची माहिती जर मी पुढे पाठवली नाही तर मात्र पुढच्या विद्यार्थ्यांचं किती नुकसान होईल हा विचार मनात येऊन मी हा लेखनप्रपंच केला>> हे आवडलंच
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार
मस्तच. सुयोग आणि टीमचे
मस्तच. सुयोग आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन
ह्यावर्षी मुलाच्या शाळेला ( विद्या व्हॅली स्कूल ) आठवीच्या गटात दुसरे बक्षीस मिळाले त्यामुळे ह्या स्पर्धेबद्दल खूप ऐकतो आहोत
वा, सुयोगचे अभिनंदन. अन
वा, सुयोगचे अभिनंदन.
अन तुम्ही या स्पर्धेची माहिती इथे दिल्याबद्दल तुमचे आभार
सुयोग आणि त्याच्या टीमचे
सुयोग आणि त्याच्या टीमचे हार्दिक अभिनंदन!!!
माहितीबद्दल धन्यवाद.
अगो, खूप छान.. विद्या व्हॅली
अगो, खूप छान.. विद्या व्हॅली स्कूलचे अभिनंदन:)
सांगण्यासारखे म्हणजे, सुयोगच्या शाळेकडून ह्या सगळ्यांना काहीच माहिती मिळाली नव्हती.. ह्याच मुलांनी नेटवरून शोधून परस्पर हे उद्योग केले होते.. बक्षीस मिळून, पेपरमध्ये बातम्या/मुलाखती आल्यावर शाळा जागी झाली आणि तेव्हा कुठे ह्या तिघांचे अभिनंदन शाळेत केले गेले..
म्हणुनच हा विषय इथे लिहावासा वाटला..
मेधा, मामी धन्यवाद
वा छान. मुलांचे खुप अभिनंदन व
वा छान. मुलांचे खुप अभिनंदन व स्पर्धेबद्दल स्वतः शोधुन ह्यात भाग घेउन दाखवला त्यासाठी खुप कौतुक.
सुयोग आणि त्याच्या टीमचे
सुयोग आणि त्याच्या टीमचे हार्दिक अभिनंदन!!!
सुयोग आणि त्याच्या टीमचे
सुयोग आणि त्याच्या टीमचे अभिनंदन. प्रोजेक्टबद्दल अजून माहिती वाचायला आवडेल. शक्य झाल्यास सुयोगला स्वतः लिहायला सांगा.