निवडणुका नि राममंदिर

Submitted by गणपतराव on 6 July, 2013 - 11:46

२०१४ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्यात कॉंग्रेस ने अन्नसुरक्षा विधेयकाचा अध्यादेश काढलाय. कॉंग्रेस ला याचा राजकीय लाभ होवू शकतो हे लक्षात आल्यावर भाजपने पुन्हा राम मंदिराचा विषय काढला आहे.

फक्त मोदींच्या करिष्म्यावर निवडणुका जिंकू शकतो ह्याबद्दल भाजपाला शंका असावी . परंतु एक मात्र नक्की कि भाजपला निवडणुका आल्या कीच राम आठवतो. सत्तेवर आल्यावर भाजपा राम मंदिर बांधेल का ? कि हा मुद्दा फक्त ते निवडणुकी करता वापरतायत?

मंदिर मस्जिद वादात देशाचे बरेच नुकसान झालेय. मागेच देशभरातून मंदिर बांधण्यासाठी विटा गोळा केल्या कोट्यावधी रुपये हि जमा झाले त्याचे पुढे काय झाले ह्या बाबतीत सर्वत्र शुकशुकाट आहे.मस्जिद पडली गेल्यानंतर दंगली झाल्या त्याचा प्रतिशोध म्हणून बॉम्बस्फोट घडवले गेले. आपल्या देशातील अंतर्गत धार्मिक वादाचा फायदा परक्या देशांनी उठवला.

ह्या वादापुर्वी बॉम्बस्फोटांच्या घटना फक्त काश्मीर सारख्या प्रांतात घडायच्या त्या मुंबई, पुणे सारख्या शहरात येउन पोहोचल्या. आज प्रत्येक शहराला धोका आहे . धर्म हा विषय अध्यात्मापुरता मर्यादित ठेवायचा कि राजकारणात आणायचा याला काही ताळतंत्रच उरले नाही.

पण भविष्यात एक धोका स्पष्ट दिसतोय कि धर्मसत्ता हि राजसत्तेच्या वरचढ होवू शकेल. हा दिवस ज्या दिवशी येईल त्या दिवशी भारत हा पाकीस्तानच्या वाटेने चालायला लागेल ह्यात काही शन्का नसावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राम मंदिर व्हावे असे भाजपाचीच इच्छा नाही....निवडणुका आल्या की चांगला वापर होतो अशा मुद्द्यांचा....३७० कलम्,राममंदिर,समान नागरी कायदा वगैरे..

राममंदिर वही बनाएंगे,लेकिन तारीख नहीं बताएंगे.

सौगंध राम की खाते है , हम मंदिर वही बनाएंगे

मंदिर भव्य बनाएंगे ,हम मंदिर वही बनाएंगे

जय श्रीराम

आज ही आहेच.....मग आज पण का बोलत आहे Biggrin

सत्तेवर आल्या बरोबर न्यायप्रविष्ठ ...आणि निवडणुक जवळ आल्यावर न्यायप्रविष्ठ नाही Biggrin
.
.चिट भी मेरी पट भी मेरी Happy

आतातरी भाजपाने जागे व्हावे. त्याच मुद्द्यावर किती वेळा निवडणुक लढवणार. आता कॉगोविरोधी वातावरण आहे पण यांच्यातील सुंदोपसुंदी कायम आहे.

मागील जनगणनेच्या आकड्यानुसार हे स्पष्ट झाले होते की भारतात ८०.५% लोक हिंदू असून १३ टक्के मुस्लिम, २.३ ख्रिश्चन, १.९ शिख, ०.९ बौध्द आणि ०.४ जैन अशी ढोबळ वर्गवारी आहे. साहजिकच ८० टक्के लोकांचे धर्माबाबतचे जे म्हणणे आहे तेच नित्यनेमाने पटलावर येत राहणार. ही बाब अलग आहे की धर्मप्रसारणाच्याबाबतीत हिंदू मुस्लिमांइतके अग्रेसर कधीच दिसून आले नाहीत. आपल्या धर्माची वाटचाल केवळ आपल्या अनुयायांपुरतीच ठेवणे आणि अन्य धर्मीयांना आपल्या सोबतीने राहू देणे ही तत्वप्रणाली जवळपास सार्‍याच राज्यकर्त्यांनी अवलंबिल्याचा इतिहासाचा दाखला आहे.

'राममंदिर' ही एका विशिष्ट पक्षाची राजकीय खेळी आहे की सामाजिक गरज आहे हे ओळखण्याइतपत 'मतदार' नामक प्राणी सक्षम होणे काळाची गरज आहे. मंदिर रामाचे की कृष्णाचे हा मुळातील प्रश्न नसून अन्यधर्मीयांचे प्रार्थनास्थळ गाडून तिथे ते मंदिर उभे करण्यामागे भाजपाची नेतेमंडळी जो काही राजकीय स्वार्थ साधू इच्छितात त्यापासून त्याना दूर ठेवण्यासाठी कॉन्ग्रेस हालचाल करणार हे तर उघडच आहे. या दोन रेड्यांच्या टकरीत सर्वसामान्य मतदार रक्तबंबाळ होत जाणार ते लोकसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान. नशा पसरविण्याचे काम दोन्ही बाजूंनी होत जाते, प्रत्येक निवडणुकीच्या आगेमागे आणि एकदा का सत्ता प्रस्थापित झाली की सारे विषय गाडले जातात.

त्यामुळे श्री.गणपतराव आपल्या लेखात म्हणतात "भविष्यात एक धोका स्पष्ट दिसतोय कि धर्मसत्ता हि राजसत्तेच्या वरचढ होवू शकेल...." अशी परिस्थिती ह्या महाकाय अशा १+ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात कधी घडू शकेल असे वाटत नाही. राजसत्ताच या देशाचा रथ ठीक तर्‍हेने हाकलू शकते, मग तिचा सारथी धर्मप्रिय असो वा नसो.

अशोक पाटील

इजिप्तपासून कंबोडियापर्यंत सगळेच देश ठासून सांगतात राम आमच्याच देशात झाला. कुठं कुठं मंदिर बांधणार?

कुठं कुठं मंदिर बांधणार? >>> लवकरच अमित शहा भाजपाचा प्रसार करण्यासाठी वरील देशांमधे जाणार आहेत..

अशी नविन बातमी आली तर चुकीची नाही ठरणार Biggrin

भाजपा ने आता निवडणुका जवळ आल्याबरोबर रंग दाखवायला सुरुवात केली
मंदिर चा मुद्दा उपस्थित करुन हिंदुत्वला जवळ करण्याचा प्रयत्न केला
मोदीने बिहार मधे संदेश दिल्याबरोबर ५ वर्ष ज्या बिहार मधे कोणता आतंकवादी हमला झाला नाही त्या बिहार मधे लगेच सकाळी सकाळी झाला.? Uhoh
अच्छा अतिरेकी हमला का करतात ? लोक मारली जावीत , दहशद निर्माण करण्यासाठी , इत्यादी.
परंतु एक तर हा बॉम्बस्फोट कमी क्षमतेचा होता. वर एकदम सकाळी सकाळी पहाटे जेव्हा लोक अत्यंत कमी असतात अश्यावेळेला हमला करुन काय उपयोग होणार होता ?
जिथे कमी क्षमतेचा बॉम्ब ठेउ शकतात तिथे मोठ्या क्षमतेचा सुध्दा ठेउ शकतातच ना ?
गरीब होते का आतंकवादी ? Biggrin

इजिप्तपासून कंबोडियापर्यंत सगळेच देश ठासून सांगतात राम आमच्याच देशात झाला. कुठं कुठं मंदिर बांधणार?

हाऊ नाईस ? किती सोपं ? सगळीकडेच बांधू ! नेकी और पूछ-पूछ ?

फक्त त्यांना हे सांगावं कि तुमचं मंदिर हे जगातलं सगळ्यात मोठ्ठ मंदिर असायला हवंच, त्यासाठी सुरुवात करायला तारीख द्यावी, पूर्ण केव्हा करणार हे त्यांच्यावरच अवलंबून राहु देत, पण सगळ्यात मोठ्ठ हवं हं ?
होईल का चढा - ओढित पूर्ण ?
------------------------

@अशोक
राजसत्ताच या देशाचा रथ ठीक तर्‍हेने हाकलू शकते, मग तिचा सारथी धर्मप्रिय असो वा नसो.
<<
अगदी खरे. कारण प्रबळ राजसत्तेपुढे (कोणत्याही रंगाचे) धर्मवेडे देखील नमून राहातील.
त्यामुळेच मोदी यदाकदाचित सारथी झाले तरी या देशाचा रथ ठीक तर्‍हेने हाकलू शकतील कारण सर्वांनाच बरोबर घेऊनच त्यांना विकास साधणे शक्य होईल.
गुजरातमध्ये त्यांनी तसे केलेले आहे.

आधी शाळा आणि स्वच्छतागृह बांधा आणि ते स्वच्छ ठेवा. मंदिरात काही रोज कोणि जात नाही.

राम-मंदिराचं राम बघुन घेईल, तो काही मत द्यायला येत नाही, मतं आम्ही देतो, आमच्या priorities चा विचार करा....

दणके बसले की भाजपाला राम अन काँग्रेसला गांधी आठवतात... बाकी वेळेस ते अडगळितच असतात.

म्हणजे भाजपला संशयाच्या कटघर्यात उभे करताहात आपण..???
.
इथेच तर माती खातो आपण..!!
.
.
Alert follow झाला नसल्यामूळेच अतिरेकी हल्ला झाला
&
म्यानमार चा दाखला अतिरेक्यांनी दिला आहेच...
.
त्या दिग्गी Proud ने पण पहाटेच बांग दिली twitter हून Wink
.
नमोंचे नाव गुंफुन राजकीय फायदा उचलण्याचेच प्रयत्न सत्ताधार्यांनी चालवले आहेत...
.

कारण प्रबळ राजसत्तेपुढे (कोणत्याही रंगाचे) धर्मवेडे देखील नमून राहातील. >> मग गोध्रानंतर दंगल कशी काय उसळली बुवा?? की त्यामुळेच आणि त्यानंतरच राजसत्त प्रबळ झाली??

@ मी_भास्कर....

श्री.नरेन्द्र मोदी, त्यांची गुजराथवरील पकड, त्यांचे मुख्यमंत्री पदापेक्षाही 'सी.ई.ओ.' भूमिकेतून होत असलेले कार्य ह्या गोष्टी सकारात्मक चर्चेचा विषय होत असल्या तरी त्या जशाच्यातशा अखंड भारतीय राजकारणाला लागू होणे अवघड आहे. शेवटी जगातील सर्वात मोठी लोकशाही प्रणालीची ही भूमी असल्याने मतदार नामक जादूगार राजकारण कसे होऊ शकेल हे ठरवित असतो. गुजराथमध्ये मोदींचा पक्ष प्रचंड बहुमताने असला तरी याच मतदारांनी दिल्लीत मात्र २६ पैकी १७ खासदार भाजपाच्या तिकिटाचे पाठविले. केन्द्रात सत्तास्थानी असलेल्या प्रमुख पक्षापैकी कॉन्ग्रेसचे २०३ खासदार आहेत तर विरोधी पक्षातील प्रमुख पक्ष म्हणून बसणार्‍या भाजपचे ११८; म्हणजेच दोन प्रमुखांत जवळपास १०० चे अंतर आहे. हे अंतर संपुष्टात आणण्यासाठी भाजपने 'राममंदिर' ची आरती ओवाळून चालणार नाही हे तर उघडच पण उठसूट नरेन्द्र मोदींची प्रतिमाही गल्लीबोळातून झळकविणे परवडण्यासारखे नाही....त्याचे उलटे प्रत्यंतर परवाच्या कर्नाटक विधानसौध निवडणुकात दिसून आले आहेच.

शिवाय या देशातील दलित मतदार संघ नावाचा जो एक प्रकार आहे तो "इन टोटो" भा.ज.प. कमळाच्या सावलीत एकत्र येईल याची शक्यताही वर्तविता येणार नाही, आणि हाच एक प्रबल घटक आहे मतदानात जो कॉन्ग्रेस आपल्या बाजूने वळवू शकतो. त्यामुळे तुम्ही म्हणता त्यानुसार मोदी सारथी झालेच तर ते या देशाचा रथ कुशलतेने चालविण्यात पुढाकार घेऊ शकतील.... पण ही शक्यता स्वप्नच राहील.

अशोक पाटील

श्री.नरेन्द्र मोदी, यांना भाजपाने प्रचारप्रमुख बनविल्यापासून बर्‍याच "काँगी" ज Proud समर्थकांचा प्रचंड जळफळाट झालेला दिसतो.

अशोक पाटील,

सद्द स्थितीत भारताची काय पोझीशन आहे ? काय पॉलिटीकल पॉसिबिलिटिज आहेत हे जाणण्यापेक्षा, कुठली

पार्टी सत्तास्थानी येईल हे कळण्यापेक्षा भारताला कश्याची गरज आहे हे कळणे तितकेच महत्वाचे आहे.

गेल्या ७० वर्षे काँग्रेसने सत्ता उपभोगलीच आहे. भाजप सत्तेवर येण्यासाठी योग्य आहे का हे माहीती नाही.

ह्या दोन्ही बा़जुने भारत देश्याचे नुकसानच झाले आहे.

भारताला कश्याची गरज आहे हे कळल्याशिवाय त्या दृष्टीने विचार करता येणार नाही.

उ दा, भारताला डिक्टेटर ची गरज असेल तर ते सद्द्या शक्य नाही म्हणुन शक्यता टाळता येणार नाही.

श्री.नरेन्द्र मोदी, यांना भाजपाने प्रचारप्रमुख
बनविल्यापासून बर्याच "काँगी" ज
समर्थकांचा प्रचंड जळफळाट झालेला दिसतो.>> Proud

<श्री.नरेन्द्र मोदी, यांना भाजपाने प्रचारप्रमुख बनविल्यापासून बर्याच "काँगी" ज समर्थकांचा प्रचंड जळफळाट झालेला दिसतो"
हे माहीत नाही. पण काहीतरी जळल्याचा वास भाजपच्या गोटातूनच येत होता. तसंच नमो या अक्षरांची अ‍ॅलर्जी असलेल्या भाजपच्या आत्ताआत्तापर्यंतच्या काही मित्रांनीही टाटा केला.
२००४ साली सत्तेवर असताना एन्डीएमधल्या घटक पक्षांची संख्या आणि आताची संख्या यात किती फरक पडला? आणि कशाने?

Pages