उपयोगी चकटफू सॉफ्टवेअर्स

Submitted by सदानंद कुलकर्णी on 6 July, 2013 - 10:48

व्यवसायानिमित्त मला आर्किटेक्चरल डिझायनिंग, थ्रीडी मॉडेलिंग, ऑडीओ-व्हिडीओ एडिटिंग, इमेज एडिटिंग, ग्राफिक्स डिझायनिंग, फोटोग्राफी, व्हिडीओ रेकोर्डिंग अशा विविध आघाड्यांवर काम करावे लागते. यासाठी मला अनेक वेगवेगळी software applications वापरावी लागतात. पायरसी करायची नाही आणि उजळ माथ्याने बिनधास्त व्यवसाय करायचा हे धोरण असल्याने मी आधी दर्जेदार freeware applications उपलब्ध आहेत का याचा शोध घेतो आणि ती वापरून पाहतो अगदीच पर्याय सापडला नाही तर मग commercial application विकत घेतो. मला गवसलेल्या काही दर्जेदार freeware software applications ची माहिती खाली देत आहे.

1: Engineering/architectural drawings करण्यासाठी ऑटोकॅड हे जगप्रसिध्द सॉफ्टवेअर वापरले जाते. त्याचे लायसन्स तीस हजारापासून दीड लाख रुपयापर्यंत आहे. ज्यांना ऑटोकॅडला मजबूत पण फ्रीवेयर पर्याय हवा आहे ते draftsight हे सॉफ्टवेअर वापरू शकतात. draftsight हे Dassualt Systems या कंपनीने विकसित केलेले सॉफ्टवेअर आहे. त्यांचे CATIA हे CAD CAM मध्ये वापरले जाणारे अत्यंत लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. ऑटोकॅड ला स्पर्धा करण्यासाठी त्यांनी draftsight हे सॉफ्टवेअर चक्क फ्री उपलब्ध केले आहे. draftsight ही ऑटोकॅड ची सहीसही नक्कल आहे. त्याचा इंटरफेस, टूल्स, कमांड अगदी ऑटोकॅड सारख्याच आहेत. draftsight साठी ही लिंक पहा http://www.3ds.com/products/draftsight/download-draftsight/?xtor=SEC-6-G...

2: Civil engineering, Architecture, Interior designing या क्षेत्रात 3D Modeling ला खूप महत्वाचे स्थान आहे. त्यासाठी अनेक महागडी सॉफ्टवेअर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षात यासाठी Sketchup या नावाचे सॉफ्टवेअर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. Sketchup हे Google ने विकसित केलेले सॉफ्टवेअर आहे. Sketchup फ्रीवेयर आणि कमर्शियल अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहे. याची फ्रीवेयर व्हर्जन सुद्धा अत्यंत शक्तिशाली आहे (शेवटी ते गुगलचे आहे ना!) Sketchup वापरणे खूप सोपे आहे. त्याची video tutorials सुद्धा त्यांच्या साईट वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. मुलांची 3D Visualization क्षमता वाढविण्यासाठी सुद्धा हे सॉफ्टवेअर मुलांना 'खेळायला' देता येईल. Sketchup मध्ये काम करणे म्हणजे अक्षरशः धमाल आहे. बघता बघता मुले त्याच्या आसपास दिसणाऱ्या अनेक वस्तूंचे थ्रीडी मोडेल करू शकतात. Sketchup Make साठी या लिंकवर जा http://www.sketchup.com/products/sketchup-make

3: सध्या व्हिडीओ शूट करणे सहज शक्य आहे. पण शूट केलेल्या व्हिडीओला एडिट करून त्यात निवेदन, संगीत, टायटल यांचा समावेश करून एक छोटी अर्थपूर्ण फिल्म तयार करता येते. घरघुती व्हिडीओ एडिटिंग साठी Pinnacle Videospin हे फ्री सॉफ्टवेअर वापरता येईल. घरघुती समारंभ, व्यावसायिक छोटे व्हिडीओ प्रेझेन्टेशन यातून सहज करता येतील. सुट्टीत दिवसभर गेम बडवत बसलेल्या मुलांना हा नवीन खुराक नक्की आवडेल. Pinnacle Videospin हे सॉफ्टवेअर Pinnacle कंपनीने त्यांच्या वेबसाईट वरून काढून टाकले असले तरी ते या ठिकाणी उपलब्ध आहे. http://videospin.en.softonic.com/

4: Audio शिवाय Video म्हणजे मिठाशिवाय जेवण! Audio recording, editing, conversion या कामांसाठी Audacity हे दमदार freeware सॉफ्टवेअर आहे. audacity डाउनलोड करण्यासाठी पहा. http://audacity.sourceforge.net/ मदतीसाठी इथे जा http://wiki.audacityteam.org/wiki/Audacity_Wiki_Home_Page

5: डिजिटल कॅमेराने काढलेले फोटो एडिट करण्यासाठी अडोबी फोटोशॉप हे व्यावसायिक सॉफ्टवेअर खूप प्रसिद्ध आहे. photoshop मधील फिचर्स, समान इंटरफेस आणि समान कार्यपद्धती चकटफू हवी असेल तर GIMP हे सॉफ्टवेअर वापरा. कलर करेक्शन, इमेज रीटचिंग, मल्टी लेयर काम्पोजीशन ही सर्व कामे जी photoshop मध्ये केली जातात ती सर्व GIMP मध्ये करता येतात. GIMP साठी ही वेबसाईट पहा http://www.gimp.org/

GIMP ला आणखी एक सशक्त पर्याय म्हणून Paint.net हे सॉफ्टवेअर वापरता येईल. त्याची लिंक आहे: http://www.getpaint.net/index.html

5: Audio आणि Video convert करण्यासाठी Freemake Video Converter हे माझे आवडते सॉफ्टवेअर आहे. यात अक्षरशः कोणताही Video format कोणत्याही Video format मध्ये convert करता येतो. Output quality एकदम प्रोफेशनल! एवढेच काय हा Video DVD Author सुद्धा आहे. DVD मध्ये मेनू सुद्धा तयार करता येतात. तसेच तुमच्या कडे असलेल्या mobile handset साठी अनुकूल असलेया format मध्ये हा Video convert करून देतो. Youtube video डाउनलोड आणि convert सुद्धा यात करता येतात, video पासून audio वेगळा करता येतो. Freemake Video Converter हे अष्टपैलू सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी ही लिंक पहा. http://www.freemake.com/

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा मित्र वास्तुविशारद आहे, , त्याला Revit शिकायचे आहे. अगदी फुकट नाही तरी वाजवी किमतीचे पर्यायी software उपलब्ध आहे का ? कोणाला माहित असल्यास कृपया कळवा . धन्यवाद

छान माहिती. मी खूप वर्षापासून ऑडिओ ग्र्याबर हे सॉफ्टवेअर वापरतो. एम्पी३ एडीट करायला छान आहे. एखाद्या गाण्यातला भाग रिंगटोन म्हणून वापरायला बरा आहे. Happy