नांदा सौख्यभरे !

Submitted by विशाल कुलकर्णी on 10 November, 2008 - 06:42

गेले चार पाच दिवस पाहातोय मी त्याला. तिथेच ३१ नं. च्या बसस्टॉप समोर रस्त्याच्या त्या बाजुला उभा असतो तो. सकाळी साधारण सव्वा नऊच्या सुमारास आणि संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास येतो.
समोरच्या बाजुला आपली बाइक पार्क करतो आणि बसस्टॉपला येवुन रांगेत उभा राहतो. का कोण जाणे?
ओ हो sssss अच्छा तर तिच्यासाठी येतेय स्वारी. आज ति सुबक ठेंगणी ही दिसली....
पुढे काही दिवस नुसतेच तिच्या पाठीमागे उभे राहणे..
मग हळु - हळु बहुदा त्यांचे बोलणे सुरु झाले असावे...
लांबुन काही कळणे शक्यच नव्हते, पण अविर्भावावरुन जाणवायचं थोडं थोडं...
मग काही दिवसांनी ते एकत्रच यायला लागले...

काल खिडकीपाशी उभा असताना एकदम लक्षात आलं..अरे खुप दिवस झाले, तो दिसलाच नाही. ती मात्र नेहमी दिसायची. बसच्या रांगेत एकटीच उभी असायची....
वाटलं, खाली जावं आणि विचारावं तिला, " पोरी, भांडला - बिंडला तर नाहीत ना ? पण पुन्हा वाटलं हा उगाचच आगावुपणा होइल. ओळख ना पाळख, हा कोण विचारणारा..असं वाटलं तर ?
आणि कोण जाणे तसं काही नसेलही...
तीही थोडीशी कावरी बावरी झाल्यासारखी वाटत होती आजकाल...
दररोज दोन बस सोडुन द्यायच्या म्हणजे काय?
......
.........
आणि तो आला. बराच अशक्त वाटत होता. अधुन मधुन खोकतही होता. आजारी होता बहुधा..
तिची कळी खुलल्यासारखी वाटली....

आज बसला दोघेही नाहीत.
माझी चलबिचल व्हायला लागली. संध्याकाळी तरी येतील म्हटले तर पावणे सात वाजता वाजेनात.
साडे आठ वाजता आले. त्याच्या बाईकवरुन. मी चाट !
त्याने गाडी पार्क केली आणि ........
हातात हात घालुन ते चालत निघाले. बहुदा ती कुठेतरी जवळपासच राहात असावी.
ते त्या वळणावरुन नाहिसे झाल्यानंतरदेखिल मी खिडकीतच उभा होतो.
बराच वेळ.....
तुझी खुप आठवण येत होती. ते दिवस आठवत होते.
साडे नऊच्या दरम्यान तो झपाझप पावले टाकत आला...आणि...
जाता जाता चक्क त्याने माझ्याकडे पाहुन दोन बोटे उंचावत " V " ची खुण केली.
माझा सहभाग लपुन राहीला नव्हता तर. मी ही हसुन हात केला.

आज काल ते दोघेही फार खुशीत असतात. तो हळुच खाली वाकुन तिला काहीतरी सांगतो..ती लाजते.
काल तिनेही वळुन वर पाहिले. नाजुकशी हसली. ..
आमच्या दोघांचे अघोषित गुपित बहुतेक तिलाही कळले असावे...मग मीही हसलो.
त्या नंतर दोघे एकदम दोन महिन्यांनीच दिसले...
तिने मान वर करुन माझ्याकडे पाहिले. हळुच गळ्यातले मंगळसुत्र उचलुन दाखवीले.
आज मात्र तिच्या ऐवजी तोच लाजत होता.
मी ही दोन्ही हात वर उंचावुन मनापासुन आशिर्वाद दिला....
"नांदा सौख्यभरे !"

अलिकडे ते दोघे फारसे दिसत नाहीत. बहुदा त्याच्या बाईकनेच जात असतील.
कदाचित तिने नोकरी सोडलीही असेल...
पण आजकाल मीच थोडासा सैरभैर झालोय खरा.
तुझी पुन्हा पुन्हा आठवण येतेय.
त्या बसमधल्या चोरट्या भेटी, ते तुझं जाता जाता हळुच कटाक्ष टाकणं...
आणि मग लग्नानंतरच्या त्या सगळ्या कडु-गोड आठवणी..
दिवस खायला उठतो आजकाल. काही म्हणता काही सुचत नाही.
वाचत तरी किती वेळ बसायचे...?

आज ते दोघे पुन्हा दिसले. जवळ जवळ वर्ष उलटुन गेलं, त्याला पहिल्यांदा पाहिलं त्या दिवसाला.
अहं... दोघं नाही आज ते तिघे होते. ती बर्‍यापैकी गुटगुटीत झाली होती.
मला बघितल्यानंतर तिने बाळाला वर उचलुन दाखवलं.
मी पण लगेच त्याला लांबुनच एक गोड पी दिली.
किती आनंदात होते दोघेही.
अगदी हसत खिदळत चालले होते.
मला त्यांची दृष्ट काढाविशी वाटली.
मी त्या जगतपित्याकडे त्यांच्यासाठी हात जोडले...
परमेश्वरा जे माझ्या वाट्याला आले ते त्याच्या वाट्याला येवु देवु नको.
त्यांना सुखात ठेव....

असेच दिवस चाललेत. अधुन मधुन ते दिसतात.
आजकाल पहिल्या सारखे वाटत नाहीत. पहिल्या सारखे बोलतानाही दिसत नाहीत.
मला पाहिले की हात करतात पण पहिल्यासारखा उत्साह दिसत नाही त्यांच्या वागण्या-बोलण्यात.
..........
,..............
काल नक्कीच काहीतरी बिनसले होते त्यांचे.
ती सारखी रडत होती. तो तावा तावाने काहीतरी बोलत होता.
तसेच बोलत... किं भांडत दोघेही निघुन गेले. वळताना तिने एक ओझरती नजर टाकली माझ्याकडे.
खुप केविलवाणी वाटली गं मला ती..........!

काल मी खाली उतरलो होतो. ती एकटीच भेटली. कोमेजुन गेली होती...भेदरली होती...
रडत रडतच सांगितलं तिने...
.......................................................
ते घटस्फोट घेणार होते..
मी सुन्न...
उद्या त्याला घेवुन घरी ये....
एवढंच सांगितलं आणि परत फिरलो..

काय वाटलं, तुम्हाला संसार म्हणजे खेळ आहे भातुकलीचा. मनाला वाटलं तेव्हा मांडला कंटाळा आला किं मोडुन टाकला.
घटस्फोटानंतर काय अवस्था होतेय माहितेय तुला.
जुन्या एकेक आठवणी खायला उठतात. तिचं रुसणं, तिचं हसणं, तिचं बोलणं....
मला विचार घटस्फोट काय असतो ते....
वेडं पिसं होतं रे मन, खायला उठतात रे दिवस अन रात्री.
एकेक क्षण जाता जात नाही. आपल्याच चुका फेर धरुन बसतात आपल्याभोवती..
अन तु गं, असं याला सोडुन गेल्यावर त्याची काय अवस्था होईल याचा विचार केलाहेस का कधी?
पुर्ण विचार करा, पुढे तुमची मर्जी आणि तुमचे नशिब...
दोघेही निघुन गेले.
दोन दिवस पुन्हा असेच वाट पाहण्यात गेले...
आज पुन्हा ते दोघे , अहं तिघे दिसले...तसेच...
पुर्वीसारखे आनंदी, उत्साहित...
बहुतेक त्यांची चुक त्यांच्या लक्षात आली असावी.

..................!
रागावलीस?, मी त्यांच्याशी खोटं बोललो म्हणुन.
त्यांना तुझ्याबद्दल खोटंच सांगितलं म्हणुन.....
माफ कर राणी, पण दुसरा पर्यायच नव्हता गं. त्यांच्या निर्णयाची भिषणता त्यांच्या लक्षात आणुन देण्यासाठी मी तुला दोष दिला. आपल्या न झालेल्या घटस्फोटाची वर्णने करुन सांगितली.
पण काय करु गं, गेल्या वर्षी साध्या तापाचे निमित्त होवुन तु गेलीस...
त्या नंतर गेल्या वर्षभरात तुझ्या विरहात मी जे काही भोगलंय ते त्यांच्या वाटेला येवु नये असं प्रामाणिकपणे वाटलं म्हणुन बोललो खोटं.
आता सॉरी, म्हणतोय ना, किती रुसायचं ते...
एकदा रुसलीस अन कायमची निघुन गेलीस...आता माझ्यात नाहीये गं ती ताकद.

चल तुझा फोटो आता आतल्या कपाटात हलवतोय.
ते दोघे त्यांच्या बाळाला घेवुन येताहेत. मला त्याच्याशी खेळायचंय....
त्यांच्यासमोर खोटं खोटं का होईना मनसोक्त हसायचंय...
त्या छोटुल्यासाठी घोडा बनायचय.
रात्री भेटुच पुन्हा आपण, तुला सांगेन बाळाच्या गमती जमती.

विशाल.  

 

 

गुलमोहर: 

विशाल आणखी एक मस्त कथा. थोडी ऊशिरा वाचली. असो. खूप आवडली.

क्या बात है... कथा खूप आवडली.

विशाल दा आणखी एक मस्त कथा. थोडी ऊशिरा वाचली. असो. खूप आवडली.>>>>

ग्रेट !!!
Happy

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

विशाल, आवडली, जाम आवडली कथा आणि मांडणी सुद्धा.

सुंदर कथा, आवडली.

अवांतर : आम्ही इथे पडीक असतो ! Happy

-दिलीप बिरुटे

सही हा विशाल........................

आत्ताच आपण पर्वा बोललो ना , मी म्हणल भावाच्या लग्नात आहे, त्याचा पण
( बस मधल प्रेम ) ..........विवाह..............

----------------------------------
If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....

विनय तुझ्या भावाला भावी वैवाहिक आयुष्यासाठी मनापासुन शुभेच्छा !
सगळ्यांचे आभार.
____________________________________________

मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/

विशाल खुपच छान कथा!!!!!!!!!!! मनाला खुपच भावली......
शेवटपर्यंत खिळवुन ठेवलंस.....
Wish You all the BEST forever....
अशाच छान छान कथा येउदे......

विशाल खुप सुंदर...वेगाळं आणि छान...

खुप छान Happy

Pages