ढोलकीच्या तालावर - वग अमेरिकेचा - महाराष्ट्र मंडळ लॉस अँजलीस

Submitted by समीर on 1 July, 2013 - 12:38

ढोलकीच्या तालावर .. घुंगराच्या बोलावर रंगणार 'वग अमेरिकेचा' फक्त बी.एम.एम. २०१३मध्ये - सादरकर्ते 'महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलीस'

रेशमाच्या रेघांनी, मला लागली कुणाची उचकी, लोणावळा-खंडाळा, अप्सरा आली, आणि आता वाजले की बारा - अशा एकापेक्षा एक धडाकेबाज लावण्यांचा नजराणा !

असा झणझणीत मराठी मेवा अजिबात चुकवू नका...

DT.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बृ म अधिवेशनात स्थानिक कलाकारांचेही दर्जेदार कार्यक्रम आहेत हे एक मस्त..
शुभेच्छा..

आत्ताच ग्रीड पाहिलं.. आमच्या मागोमाग हा कार्यक्रम आहे. आणि समांतर 'मानापमान' .. काय करणार ह्या बृममवाल्यांचे Angry
मानापमान Online बघा आणि आमच्या कार्यक्रमाला या.. Happy

BMM अधिवेशनाची अधिक्रुत dvd काढुन मायबोलिवर विकायला ठेवा, म्हणजे आमच्या सारख्या इछा असुन न जाता आलेल्या लोका.न्ना कार्यक्रम बघता येइल.

.. काय करणार ह्या बृममवाल्यांचे >> ही काय आजची रडकथा आहे? जवळ जवळ ५०% कार्यक्रम मिस होतात हा माझा दोन अधिवेशनांचा अनुभव आहे. ज्या वेळेला प्रत्येक कार्यक्रम मेन हॉलमध्ये( साईड्चे कार्यक्रम आजिबात बंद) ही पद्धत चालू होईल तेव्हा अधिवेशनाला जायचे असं ठरवलं आहे.

आत्ताच ग्रीड पाहिलं.. आमच्या मागोमाग हा कार्यक्रम आहे. आणि समांतर 'मानापमान' .. काय करणार ह्या बृममवाल्यांचे > >देसायांनु, संगीत नाटकामधे interest नसलेले येतील हो सगळे. चिंता कशाला करता. सिर्फ नामही काफी है Happy

इथे येऊन तुमची जाहीरात करू नका. शोनाहो! >> आमची जाहिरात ? देसायांचा किंवा LA चा कार्यक्रम माझा आहे हे मला नव्हते माहित. Wink

सुंदर कार्यक्रम. त्याबरोबरची बतावणीही छान होती. काही संवाद अगदी खटकेबाज वाटले.
पण...
पण...
पण...

गेली काही वर्षे लावणी वरचे बरेच कार्यक्रम महाराष्ट्रातही आणि अमेरिकेतही झाले. डॉ. मीना नेरूरकर यानी अमेरिकेमधे आणि नंतर भारतातही १०० कार्यक्रम केले. मग भारतातही लावणीचे बरेच कार्यक्रम चालू झाले.
मग जवळजवळ प्रत्येक बीएमएमला एकादा लावणी कार्यक्रम दिसायला लागला.
मग नटरंग आला, आणि लावणी अजूनच मोठ्ठी झाली.
आता 'अप्सरा आली', 'आली ठूमकत' , 'वाजलेही बारा...' हे जवळपास प्रत्येक कार्यक्रमात असतात.
'युवांकूर'ने ही 'बुगडी माझी...', आणि 'उचकी' केलीच.
गाजलेल्या १५/२० लावण्यातून कुठल्याही १० तुम्ही निवडल्यात तर त्यातल्या ५ प्रत्येक कार्यक्रमात दिसायला लागल्या आहेत.
नाविन्य होतं ते संवादांचं. सादर करणारे कलाकारही पट्टीचे होते. (मी गद्य कलाकार असल्यामुळे कदाचित माझं लक्ष तिथे जास्त गेलं असेल)....
कार्यक्रम एकंदरीत छान...
अनिलभाईंनी त्यातही ढोलकीवाला होऊन अजून रंगत आणली हे विशेष.. Happy

गोगा, मला वाटतं लावणीशिवाय (आणि पुपो आणि भि(?)रड्याशिवाय :P) 'मराठी' कार्यक्रम झाल्यासारखं संयोजक आणि प्रेक्षक दोघांनाही वाटत नसावं. Happy

तुमच्या फडात आमच्या फडाची 'कुणीतरी बोलवा दाजीबाला' गेली होती, त्या बरोबर भाई..
(मानसी करंदीकर न्यूयॉर्क)

भाईंनी तीन तीन कार्यक्रमात काम करून BMM रेकॉर्ड मोडला म्हणे Proud
'स्वरगंगेच्या काठावरती.... ', 'वस्त्रहरण', आणि 'ढोलकीच्या तालावर..'

अरे वा भाईंची हॅट्रिक Proud
मला वाटल ' कुठ कुठं जायचं हनीमुन ला लावणीतल्या साथीदार डान्सर ला रिप्लेस केलं कि काय भाईंनी :).
फोटो टाका !

Rofl
अगदी अगदी.
स्वर गंगेच्या काठावरती च्या कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे ते सरप्राईज झाले होते. त्यादिवशी आम्हाला लंच मिळाल नव्हत. त्यामुळे बिय्मय्म च्या स्वयंसेवकानी जेवणाची ताटं आणुन ठेवली होती. स्वर गंगेच्या प्रोग्राम झाल्यावर जेवणासाठी. पण ते नाटक संपल्यावर आम्हाला अगदी धावत पळत A+B+C हॉलमधे वस्त्रहरण साठी जाव लागल. त्यामुळे त्या दिवशी लंच हुकल. दुसर्‍या दिवशी LA च्या प्रोग्राम मधे मला परत बघुन 'तु ह्यात पण' म्हणुन डोळे मोठे करुन बघत होते. Happy . पण सगळ्यानी खुप कौतुक केल. 'तुम्ही लावणी अगदी जिवंत केली' अस झारा म्हणाली. मानसी ची एक मैत्रीण जी लावणी गाते. ती म्हणाली 'मला तुमच्या बरोबर लावणी चा प्रोग्राम (गाण्याचा) करायचा आहे. खुप छान वाटल. सगळ्याना मनापासुन धन्यवाद. Happy

भाईंनी तीन तीन कार्यक्रमात काम करून BMM रेकॉर्ड मोडला म्हणे >> लिम्का बुक मधे गेलय ना नाव. Lol

़कसला काय Proud ?
"लावणीच्या प्रोग्रॅम मधे भाईंंचा दंगा" अशा बातमीला साजेसा फोटो टाका Biggrin

Pages