जागू यांच्या या पाककृतीवरून सुचलेली ही पाककृती एकदा करून बघा.
==========================
लागणारा वेळ:
४३ मिनिटे
लागणारे जिन्नस:
आळस - दोन ते तीन दिवसांचा
पाऊस - घराबाहेर खच्चून
पाव कप देशीची झिंग
आकाश काळे गडद
२ तक्के उशाला
सगळ्या लोकल ट्रेन्स फेल
प्रत्येक रस्त्यावर पाणी साठून घोळ
पांघरूण गरजेनुसार
हाताची बोटे कडाकडा मोडून
मोठी जांभई जबडा चिरून
क्रमवार पाककृती:
चेंगट म्हणजे उत्साही माणसापासून गल्हट माणूस तयार करणे! प्रथम खिडकीतून १३ मिनिटे बाहेर पाहावे. विरार फास्ट, बोरिवली स्लो वगैरे सर्व गाड्या अजगरासारख्या सुस्तावलेल्या दिसल्या की पडदा ओढून घ्यावा. दुसर्या खिडकीतून २० मिनिटे बाहेर पाहावे. खालच्या रस्त्यावर एकमेकांना शिव्या आणि हॉर्न्स देत आणि साठलेल्या पाण्यात गाडी जागच्याजागी थडथडा उडवत असलेली माणसे बघावीत. तिसर्या, मोकळ्या प्लॉटकडे उघडणार्या खिडकीतून दहा मिनिटे आभाळाकडे पाहून घराबाहेर खच्चून पाऊस पडत असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच आकाश अजून कित्येक तास काळे गडद राहील याचीही खात्री करून घ्यावी. मग आत येऊन आरश्यात पाहून एक मोठा आळस द्यावा. हाताची बोटे कडाकडा मोडून जबडा फाटेल अशी जांभई द्यावी. चांगली दोन जाड ब्लँकेट्स बेडवर अस्ताव्यस्तपणे पसरावीत. पाव कप देशी घशात ढकलावी. दोन जाडजूड तक्के उशाला घेऊन सरळ पडी टाकावी.
झाला ४३ मिनिटांत एक चेंगट माणूस तयार!
दुसरी पद्धत - स्वतः चेंगट होण्यास तयार नसलेली व दुसर्याला सुखासुखी चेंगट होऊ न देणारी अशी माणसे वेगळी काढून ती घरातून हाकलून द्यावीत. ह्या पद्धतीने चेंगट लवकर तयार होऊ शकतो.
अप्रतिम झोप लागते. चेंगट अगदी रोज बनायचे म्हंटले तरी कंटाळा येत नाही.
माहितीचा स्त्रोत - ऑफीस
(No subject)
ते बाळ कसलं गोड आहे.!
ते बाळ कसलं गोड आहे.!
एक छोटी शंका.. सॉरी.. चेंगट
एक छोटी शंका.. सॉरी.. चेंगट म्हणजे कंजुष ना?
काही पडलेले भाप्र...... हि
काही पडलेले भाप्र......
हि रेशिपी फक्त मुंबईकडच्या लोकांसाठी आहे का?
पाव कप देशी घशात ढकलावी>>>देशी ऐवजी सात्विक पेय वापरले तर चालेल का?
चेंगट अगदी रोज बनायचे म्हंटले तरी कंटाळा येत नाही.>>मान्य पण तुमची चेंगट ची रेशिपी 'पावसाळी चेंगट' आहे असे दिसते. ईतर वेळेची पण रेशिपी येऊ द्या..
ता. क. : एक छोटी शंका.. सॉरी.. चेंगट म्हणजे कंजुष ना?>>>मी सुद्धा हाच प्रश्न विचारणार होते....पण त्यांनी लिहिले आहे कि...चेंगट म्हणजे उत्साही माणसापासून गल्हट माणूस तयार करणे!
पाकृ आवडली बरे
धन्यवाद मंडळी. मला चेंगट
धन्यवाद मंडळी. मला चेंगट म्हणजे आळशी असे वाटत होते.
विडंबन भारी है तेपण
विडंबन भारी है तेपण पाककृतीचे....
(No subject)
लय भारी पाकृ.
लय भारी पाकृ.
चेंगट म्हणजे आळशी नाही किंवा
चेंगट म्हणजे आळशी नाही किंवा कंजूषही नाही.
चेंगट म्हणजे काम हळूहळू करणारा.. खूप वेळ लावणारा..
धन्यवाद अनघा, मग ते बाळ तसंच
धन्यवाद अनघा, मग ते बाळ तसंच आहे असे समजूयात. झोपून उठायला खूप वेळ लावणारं.
पाकृ पाव कप वजा करून आवडली.
पाकृ पाव कप वजा करून आवडली.
(No subject)
अनघा +१०० पाक्-कृती अजमावली
अनघा +१००
पाक्-कृती अजमावली म्हणूनच प्रतिसाद द्यायला चेंगटपणा केला
वा!!!
<<प्रथम खिडकीतून १३ मिनिटे
<<प्रथम खिडकीतून १३ मिनिटे बाहेर पाहावे<<
<<खालच्या रस्त्यावर एकमेकांना शिव्या आणि हॉर्न्स देत आणि साठलेल्या पाण्यात गाडी जागच्याजागी थडथडा उडवत असलेली माणसे बघावीत<<
माहितीचा स्रोतः ऑफीस!
मजेशीर लिखाण आहे. चेंगट चे
मजेशीर लिखाण आहे.
चेंगट चे इथे अनेक अर्थ आहेतः
http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%82%...
धन्यवाद.
छान रेसीपि ...एखादी गोष्ट
छान रेसीपि ...एखादी गोष्ट सारखी- सारखी सा॑गुन ही न ऐकणार्याला "चे॑गट" म्हणतात...(उदा. न॑दिनी ...महीना होत आला आता अजुन मोरपीसे चा पुढचा आला नाहीये)