"आज तर तुम्ही खुप खुश दिसताय"
"हा. बऱ्याच वर्षांनी मित्रांची भेट होनार आहे न"
"मित्राम्ची की मैत्रिणीची? "
"तेच ते.... "
"अच्छा, म्हणजे कोणी स्पेशल होती वाटते"
"हा हा हा ... मला वाटून काय उपयोग होता, तिच्याकडून काहीच सिग्नल नव्हता. आणि एकाच पोरिवर मरणारे बरेच होते. "
"का? बाकिच्या मुली नव्हत्या का? "
"मेकॅनिकलला कसल्या आल्याय मुली... जाउ दे, चल आता लौकर"
************
"मी माने, शरद माने"
"हाय, मी संगीता चौधरी, अनिकेतची बायको, ते तिथे, ब्ल्यू शर्ट"
"अच्छा, आणि त्यांच्या शेजारी जी आहे ती माझी बायको, स्नेहल"
"हो का... हे सगळे मजेत आहेत अन मला बोअर होतय"
"मला पण... "
*********
"मिसेस चौधरी... "
"अरे तुम्ही? इथे? "
"हा... इकडे एका क्लायंटकडे आलो होतो, पण तुम्ही? "
"मी नक्षत्रला जात आहे"
"बापरे, हिरे घेणार की काय? "
"नाही हो, नक्षत्र मॉलला जातेय"
"अरे वा, चला की मी सोडतो तुम्हाला. मी पण तिकडेच चाललोय"
"मी. माने, कशाला उगाच तुम्हाला त्रास. मी जाईन की बसने"
"त्रास कसला हो. मार्केटींग म्हटलं की फिरणं आलच, अन कंपनीची गाडी आहे, खिश्यातून थोडीच जाणार आहेत पैसे"
"बरं"
****************
"आज माने भेटले होते"
"कोण माने"
"तुमच्या स्नेहलचे मिस्टर"
"माझी स्नेहल? तुला म्हणायचय काय? "
"तुमची मैत्रीण ना ती"
"हो पण मी तिच्यासोबत फिरत नाही मॉलमध्ये वगैरे"
"हो, तुम्हाला त्याची गरजही नाही ना आता? एकाच ऑफिसमध्ये असता, कशाला फिरावं लागेल? "
"हे बघ संगीता, तु उगाच... "
"मला माहीती आहे, तुमचं तिच्यावर प्रेम होतं ते"
"तो भुतकाळ झाला"
"हो पण ते भुत जिवंत व्हायला वेळ नाही लागणार"
"आणि तू मानेसोबत फिरते ते.... त्याचं तुला काहीच वाटत नाही. "
"मी काही वाईट केलेलं नाही, म्हणून स्पष्टपणे बोलू तरी शकते"
"मी सुद्धा काहिही केललं नाही "
"करून तर बघा, मग मी आहे अन .... "
"........... "
***************
"लागला का काही पत्ता.. "
"नाही"
"कुठे गेली असेल रे? तुमचं काही भांडण झालं होत का? सॉरी पण ... "
" माझ्यावर ती उगाच संशय घेत होती बरेच दिवस"
"कशाबद्दल? "
"हेच ... तुझं अन माझ काहीतरी अफेअर... "
"अनिकेत ! आपण आता कॉलेजमेट नाही"
"हे मला कळतं पण तिला नाही"
"म्हणजे ती घरातून निघून गेली याचं कारण मी आहे? "
"नाही नाही... तिचा संशयी स्वभाव... "
"आणि, तुझ्या हातात काय आहे ते? "
"घटस्फोटाची नोटिस. "
"काय? अरे पण .... "
"तिचा स्वभावच काही दिवसांपासून असा झालाय. आपण मागच्या वर्षी गेटटुगेदरला भेटलो तेन्हापासुन.... अन मग माझ्या कंपनीत तू जॉबला लागलिस, तेन्व्हापासुनतर .... "
"अनिकेत, सावर स्वतःला... "
"तुला सोपं वाटतं ग.. पण ... '
"सोपं... हम्म ... "
"तुझा नवरा खूप चांगला आहे"
"असं तुला वाटतं"
"म्हणजे? "
"तोही असाच झालाय इतक्यात.... म्हणजे ६-८ महिन्यांपासुन... "
"......... "
"सतत बाहेरचे दौरे... अन आला की खावखाव... "
"आता कुठे आहे? "
"असेल नागपुर नाहीतर यवतमाळला"
"यवतमाळला? "
"हो का? "
"यवतमाळला कशाला? कंपनीचं काम? "
"नाही. तिथे मित्रांसोबत पार्टी आहे म्हणे"
"पण तो तर नगरचा आहे ना? यवतमाळचे मित्र? "
"हो, या महाशयांनी बी. एड. केलय तिथुन... वर्षभर होता तिथे... "
"बी एड? पण तो मार्केटींग.... "
"ती लांबलचक स्टोरी आहे... जाउ दे, तू कोणत्या दुखात अन मी काय सांगतेय... "
"वेट.... तो बीएडला कोणत्या वर्षी होता? "
"अरे जाउ दे ना त्याचं बीएड... तू काय घेउन बसलाहेस... आधी संगीताला शोधायचं कसं त्याचा विचार कर. तिच्या घरी फोन केलास? "
"हो. ती तिथे नाही... पण मला सांग तुझ्या नवऱ्याने बीएड केंव्हा केलं"
"अनिकेत, आर यु ओके? "
"हो, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे"
"हं बघते त्याचा सिव्ही .........२००८-०९"
"तरीच... "
"तरिच काय? "
"त्याने इतक्यात त्याला संगीता बरेचदा भेटली हे सांगीतलं होतं? "
"हा... एक दोनदा म्हणाला होता खरा ... पण ... "
"तुला कळलं का? संगीता आणि शरद एकाच वर्षी यवतमाळला बीएड करत होते.... "
"हो असेलही... पण कॉलेज एकच असेल कशावरुन? "
"असणारच ... बघ त्याच्या सिव्हीमध्ये, गव्हर्मेंट कॉलेज असणार... "
"हो... म्हणजे.... "
"म्हणजे ते पार्टी करताय अन ...."
हे कॉय???
हे कॉय???:अओ:
छान विजय! सुरुवात केली
छान विजय!
सुरुवात केली वाचायला आणि कधी लेख संपला समजलाच नाही. ड्रामा डोळ्यासमोर उभा राहीला...
खरं तर अनिश्का, डोक्यात ४-५
खरं तर अनिश्का, डोक्यात ४-५ पानांच्या कथेचा प्लॉट होता, पण ती पूर्ण करायला वर्ष गेलं असतं. (आरंभशुर !), म्हणुन थोडक्यात...
धन्यवाद नितिन
पूर्वी प्रेमाच्या त्रिकोणावर
पूर्वी प्रेमाच्या त्रिकोणावर सिनेमे यायचे. आता चोविशीच्या काळात काय होईल याची चिंता आपण सोडवलीत. छान कल्पनाविलास आहे. कीप इट अप !! येऊद्यात अशा आणखी कथा..
किरण हा चौकोन झाला , भारी आहे
किरण हा चौकोन झाला , भारी आहे कथा !
आता मला लग्न करायचीच भीती
आता मला लग्न करायचीच भीती वाटू लागली आहे...
हाहाहा...
खरच खुप छान आहे....
मस्तच
मस्तच
<<आता मला लग्न करायचीच भीती
<<आता मला लग्न करायचीच भीती वाटू लागली आहे...>>>
करुन टाका... नंतर कोणतीच भीती उअरत नाही कारण मेलेलं कोंबड आगीला भीत नाही
करुन टाका... नंतर कोणतीच भीती
करुन टाका... नंतर कोणतीच भीती उअरत नाही कारण मेलेलं कोंबड आगीला भीत नाही>>>>>> १०० % अनुमोदन
... छान कथा
करुन टाका... नंतर कोणतीच भीती
करुन टाका... नंतर कोणतीच भीती उअरत नाही कारण मेलेलं कोंबड आगीला भीत नाही...............+१००
Too much...मस्त जमवलं....
Too much...मस्त जमवलं....
भावुक झालं मन.
भावुक झालं मन.
कल्पनाविलास चांगला आहे...
कल्पनाविलास चांगला आहे... प्रत्यक्षात असला तर धडकीच भरेल.
छान आहे ष्टोरी
छान आहे ष्टोरी
कथा मस्त आहे.
कथा मस्त आहे.
जबराट!
जबराट!
(No subject)
मस्तेय हे
मस्तेय हे
मी आधी वाचलेली दिसतेय 2013
मी आधी वाचलेली दिसतेय 2013 मध्ये ... आज परत वाचली... मस्त आहे... आणि खरंच आपले कॉलेज मधले
प्रेम आपल्याच ऑफिस मध्ये आले तर काय काय घडेल...
मस्त आहे रे कथा विजय
मस्त आहे रे कथा विजय