मे महिन्याच्या अखेरीस हवापालट म्हणून महाबळेश्वरला ४ दिवसांसाठी गेलो. तसे आधीही ८ वर्षांपुर्वी २-३ वेळा गेले होते. तेंव्हाही तिथला निसर्ग आवडला होताच पण हल्ली निसर्गाच्या गप्पांमुळे निसर्गाच्या घटकांचा आस्वाद घेण्याचा, त्यातील बारकावे टिपण्याची नजर तिक्षण होऊन निसर्गाची अधीक गोडी लागली आहे त्यामुळे हे ४ दिवस महाबळेश्वरच्या सौंदर्याला दृष्टीत मावण्यास कमीच पडले. अगदी उगाच पॉइंट पहायची धावपळ न करता जिथे राहीलो तिथले सौंदर्य न्याहाळले व एक दिवस शेरबागेत घालवला.
१) सकाळी उठल्यावर स्वर्ग जमिनीवर उतरल्यासारखे वाटले. डोंगराला पुर्ण ढगांनी अच्छादले होते. ढग अगदी आमच्या बाल्कनीतून सुद्धा जात होते.
३) हे पहाटेचे सूर्यदर्शन.
५) सुर्योदयानंतर आमच्या हॉटेलच्या बाहेरील नजारा.
७) ही हिरवाई जमिनीवर वाढलेय हे ओळखायला जमीनच दिसत नाही इतके घनदाट जंगल आहे.
८) आमचा सगळ्यात जास्त वेळ गेला तो हॉटेलवरच कारण आम्ही डिस्कव्हरी चॅनेलवर जसे सिन असतात तसे अनुभवत होतो पहिले दोन दिवस शेकरूंसोबत तर पुढचे दोन दिवस शेकरू + वानरांसोबत.
पहिल्या दिवशी अचानक बाल्कनीतून प्रथमच शेकरूची जोडी दिसली पण एकालापण कॅमेर्यात कैद करणे मुश्किल होते त्यांच्या चपळपणामुळे.
१०) ही शेकरू आणि वानरे इतका धुमाकुळ घालत होती की फांद्यांवरून जांभळे टपाटप खाली पडायची त्याचा आवाज झाड वादळात हलल्याप्रमाणे भास व्हायचा. एक गंमत पाहीली ती म्हणजे शेकरूच्या मागेही साळूंख्या त्यांना मारायला धावत होत्या. बहुतेक ते शेकरू साळूंख्यांची अंडी खात असणार.
११) डिस्कव्हरी चॅनेल मध्ये पाहतो तसे आम्ही माकडांच्या बाबत इथे अनुभवले मोठे मोठे वानर इकडून तिकडून नुसते उड्या मारत होते. एक तर आमच्या बाल्कनीत येणार होता तेवढ्यात मी दरवाजा लाऊन घेतला.
१५) ज्या झाडांवर ही सेना होती त्या झाडाला लगडलेली ही जांभळे. जांभळे आकाराने लहान होती.
१७) त्याच्याच बाजूला वेगळ्या फळांचे झाड होते. त्या फळांना सगळे जांभळाचेच झाड म्हणत होते. पण शोधक नजर व कॅमेर्याने त्या दोघांतील फरक ओळखला ती फळे पिकून फक्त लाल होत होती.
१८) येथील सगळ्या झाडांवर मॉस आहे.
२०) हे काय आहे ते ओळखा.
महाबळेश्वरमधील थंड वातावरणामुळे तिथे फुलांच्या विविध जाती व रंग अगदी मन मोहून घेतात. प्रत्येक हॉटेलच्या समोर विविध आकर्षक फुलझाडे फुलांनी बहरलेली दिसतात. ती पुढील भागात टाकते.
छान फोटो. मला महाबळेश्वरला
छान फोटो. मला महाबळेश्वरला जाऊन ४० वर्षे झाली जायला हवं आता परत. जंगल बर्यापैकी राखलंय म्हणायचं.
मस्तच!
मस्तच!
Pages