साहेबाची व्हिजीट

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 June, 2013 - 09:59

साहेब येणार उद्या दौरयावर
व्हिजिट देणार
ऑफिसला
काढा जळमट करा झाडलोट
कंपाऊंड गेट
रंगवून घ्या
उचला ढिगारे मातीचे सारे
जुनी अवजारे
लपवा ती
देण्यास सलामी प्यादे युनिफोर्मी
जरी कुचकामी
उभी करा
साबण आणावा संडास रंगवावा
टेबली ठेवावा
पुष्प गुच्छ
नवे पायपोस कपबश्या ग्लास
तत्पर दास
लावा कामी
शेलक्या फायली कामे झालेली
समोर ठेवली
पाहिजे तया
एकच दिवस सोसायचा त्रास
नंतर उदास
सर्व काही
येतील साहेब जातील साहेब
होतील गायब
पेन्शनात
दरसाली पण येईल फर्मान
करण्या दाटून
सरबराई
जग भित्रयांचे रोजी नि रोटीचे
तयास सत्तेचे
सदा भय

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहेब येणार | उद्या दौरयावर |
व्हिजिट देणार | ऑफिसला || >>> असे लिहिले तर वाचायला बरे पडेल, कविता ठीक ठाक.