कैरी व खजुराची चटणी [चटक-मटक तो. पा. सु. ]

Submitted by प्रभा on 22 June, 2013 - 13:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एका कैरीच्या फोडी, १०-१२ खजुर, गुळ , साखर, तिखट मीठ, जिरे व हिंगाची फोडणी.

क्रमवार पाककृती: 

कैरी सोलुन फोडी करुन कुकर मधे वाफवुन घ्याव्या. खजुरातील बिया काढुन मा. वे .त ३० सेकंद गरम करुन घ्या.. त्यात अंदाजाने तिखट मिठ ,जिरे २-३ चमचे साखर, व थोडा गुळ घालून एकत्र करा व मिक्सर मधे छान बारीक करा. बाउल मधे काढुन त्यावर हिंगाची फोडणी घाला. चटक मटक चविष्ट अशी चटणी तयार.

वाढणी/प्रमाण: 
खाण्यावर अवलंबुन
अधिक टिपा: 

आपण चिंच-खजुर करतो. त्या ऐवजी कैरी- खजुर वापरुन केली. खुपच छान लागते. फ्रीझमधे बरेच दिवस टिकते. आज भाजणीच्या वड्याची रेसीपी वाचली. म्हणुन या चटणीची आठवण झाली. त्या वड्याबरोबर खुप छान लागेल. मी एप्रिल मधे केली. अजुनहि चांगली आहे.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users