Submitted by सुधाकर कदम on 21 June, 2013 - 23:45
हा असा,की तो तसा,की तो तसा
मीच आहे फक्त येथे पारसा
झेलुनी आतावरी सार्या सरी
जाळण्याचा घेतला रे मी वसा
भोवती सारे महात्मे वंद्य ते
लक्तरे लेवून मी लाचारसा
ना कधी जमलेच खोटे हासणे
पण तरी लोकांमधे परिवारसा
चोरुनी नेती पुरावे साव हे
वाव ना ठेवी लढाया फारसा
मंदिरे ताब्यात घेता भामटे
देव,देवी आत रडती ढसढसा
नेहमी घेवून येतो खिन्नता
वर्तमानाचा जरी तू आरसा
घेरतो अंधार मजला नेहमी
काजव्यांचा मीच असुनी वारसा
वाहणार्या निर्झराचे पाय मी
वृक्षवल्ली वाढवी हा भरवसा
बोलक्या मौनातुनी संवादता
चुंबण्या अधरास,होई अधिरसा
वेढलेली वेदना गाऊ न दे
वाटतो हा सूर बघ बेसूरसा
सुधाकर कदम
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगल्या द्विपदी... खयालही
चांगल्या द्विपदी... खयालही सुंदर
मा.बो.वर स्वागत आहे काका!!!
पु.ले.शु!
छान... आवडली
छान...
आवडली
चोरुनी नेती पुरावे साव हे वाव
चोरुनी नेती पुरावे साव हे
वाव ना ठेवी लढाया फारसा
.
मंदिरे ताब्यात घेता भामटे
देव,देवी आत रडती ढसढसा
सुरेख शेर. आवडले.
अनेक शेर आवडले अनेक चांगले
अनेक शेर आवडले
अनेक चांगले असल्याचे जाणवले पण व्यक्तिशः माझ्या मनाला नीटसे भिडले नाहीत
आपण गझल गाता तेच सुधाकर कदम का ?
.......लिहिताही हे माहीत नव्हते आनंद झाला
धन्यवाद व स्वागत !!
श्री वैभव वसंतराव
श्री वैभव वसंतराव कुलकर्णी,
स.न.वि.वि.
आपल्या अभिप्रयाबद्दलद धन्यवाद !
मी गझल गाणारा सुधाकर कदमच आहे.
अधिक माहितीसाठी www.gazalgazal.blogspot.com या ब्लॉग ला भेट द्यावी.ही विनंती.
सुधाकर कदम
माबोवर स्वागत.. भोवती सारे
माबोवर स्वागत..:)
भोवती सारे महात्मे वंद्य ते
लक्तरे लेवून मी लाचारसा
ना कधी जमलेच खोटे हासणे
पण तरी लोकांमधे परिवारसा
>>वा!!