अनपेक्षित चित्रकला.

Submitted by शोभा१ on 19 June, 2013 - 06:31

माझी एक भाची, जिला चित्रकलेची आवड आहे. कधी मनात आलं तर छान चित्र काढते. तिची काही स्केच मी
इथे दिली होती.
http://www.maayboli.com/node/35331
http://www.maayboli.com/node/35269?

तिची धाकटी बहीण. जिचा चित्रकलेशी ३६ चा आकडा. १ ली पासून ११वी पर्यंत (घरच्या अभ्यासातील)सर्व चित्रे आणि शास्त्रातल्या आकृत्या तिने बहिणीकडून आणि आई कडून काढून घेतल्या. तिला जमतच नव्हत्या आणि आवड नव्हतीच.
मा. बाळासाहेब ठाकरे गेल्याच्या २/३ दिवशी तिच्या मैत्रिणीने क्लास मधे बसल्या बसल्या बाळासाहेबांच स्केच काढलं. हिनेही सहज म्हणून प्रयत्न केला आणि ते असं जमलं.
१.

नंतर तिने बहिणीने काढलेला कृष्ण बघून काढला. तो असा.
२.

हळू हळू तिला आवड निर्माण झाली आणि मनात आलं की ती चित्र काढू लागली. अशीच ही काही.
३.

४.
a>

५.

रविवारी तिने आईच्या मोबाईलवरून हे चित्र संगणकावर कॉपी करून त्याचाही प्रयत्न केला. जे मला सर्वात जास्त आवडलं.

६.

तिचा इतका छान प्रयत्न बघून, मलाही सुरसुरी आली आणि तिच्या शेजारी बसून, तिला अनंत प्रश्न विचारून, आणि तिने न कंटाळता नीट समजावून सांगून मी हे चित्र काढले. पण एवढे काही जमले नाही.(हसू नका. :स्मित:)

७.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभे... तु आणि चक्क चित्र???
चेहरा मस्त जमलाय पण तुझे 'महाराज' प्रकृतीने एकदम गुटगुटीत दिसतायत. Happy

निसर्गचित्र.... त्यातले शेडींग खुपच सुंदर जमलय. अशी श्वेत्-शाम नि.चि. नॉस्टॅल्जिक करतात. Happy

धन्यवाद सर्वांना! Happy
शोभे... तु आणि चक्क चित्र???
चेहरा मस्त जमलाय पण तुझे 'महाराज' प्रकृतीने एकदम गुटगुटीत दिसतायत. स्मित>>>>>>>आर्ये, धन्यवाद! आणि हसतमुख.(फक्त तूमाखमै. बाकी कुणीच माझ्या चित्राबद्दल सांगितले नाही. Sad ) मी भाचीला म्हणाले, " तू काढलेले त्यांचे छान चित्र पाहून, ते खूष होऊन, माझ्या चित्रात हसतायत." Happy
तुझ्या भाचीने छान काढलीत चित्रे गं शोभा. माझ्यातर्फे एक कॅडबरी सिल्क दे तिला....>>>>>>>>साधने, नक्कीच.

बाळासाहेब सोडुन सर्वच चांगले आलेत>>>>>>>>>>>>>>>मुकु, तिने काढलेले पहिलेच चित्र आहे ते. त्या दृष्टीने बघ. Happy
म्हणुनच अनपेक्षीत लिहीलेकाय शोभा !>>>>>नाही. जिला चित्रकला अजिबात जमत नव्हती, तिने इतकी छान चित्र काढली (ही अपेक्षाच नव्हती) म्हणून अनपेक्षीत. Happy