
'राहुल वयात येतोय' हे लक्षात आल्यावर राहुलचे आई-बाबा काय करतात? त्याची मानसीताई जशी त्यावेळी जरा बावरली होती तश्या राहुललापण काही शंका, प्रश्न असतील का असा विचार एका मुलाचे पालक म्हणून त्याचे आई-बाबा करतात का ?
आपल्या सगळ्यात जास्त जवळच्या, हक्काच्या माणसांना 'मला आजकाल असं का होतंय?' हे विचारायचा मोकळेपणा, विश्वास आपल्या किशोरवयीन मुलाच्या मनात निर्माण करणं ही प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. एकीकडे या वयात मुलांची एकूण विचारप्रक्रिया विकसित होत असते, ठाम मतं तयार होत असतात अन दुसरीकडे हळूहळू होणारे शारीरिक बदल, घडामोडी गोंधळात टाकत असतात. या अडनिड्या वयात असलेल्या मुलांना आपल्या शरीरात घडणार्या बदलांबाबत थोडीफार माहिती असली तरी या बदलांना, त्याबद्दलच्या उत्सुकतेला कसं सामोरं जावं याबाबत बर्याचदा खात्री नसते. या काळात काय काळजी घ्यावी, सावधगिरी बाळगावी, मित्रमैत्रिणींमध्ये निर्माण होणार्या आकर्षणाला नक्की कसं हाताळावं या सगळ्या नाजूक गोष्टींबद्दल सकारात्मकरीत्या आपल्याला पालकांच्या भूमिकेतून समजून घेता आलं तर नंतर पश्चात्ताप करायला लागण्याची शक्यता कमीच.
योग्य वेळी योग्य ते प्रश्न विचारणं, चर्चा करणं, मन मोकळं करणं याकरता जे अवकाश लागतं ते एक पालक म्हणून आपण कसं निर्माण करू शकतो? कसोटीच्या क्षणी मुलांना आपला आधार वाटावा म्हणून मुलांना मानसिक अन नैतिक बळ देणारा सुसंवाद कसा साधू शकतो? प्रत्येक कुटुंबासाठी ही वाटचाल वेगवेगळी असणार. काहींना मुलासोबत प्रत्यक्ष बसून गप्पांमधून समजावणं पटेल तर काही ठिकाणी माहितीपट, पुस्तकांचा आधार घेतला जाईल. कदाचित एखादी विश्वासातली त्रयस्थ व्यक्ती अथवा कौंसेलरची मदतही योग्य ठरेल. पद्धत कोणतीही असो, शेवटी मुलाच्या मनात नैसर्गिक प्रक्रिया सुस्पष्ट झाली तर शरीरसंबंधांबद्दलचे चुकीचे समज, दिवास्वप्नांचे इमले, स्वतःचे 'पौरुषत्व' सिद्ध करण्याची धडपड, मित्रमैत्रिणींमध्ये स्वीकारले जाण्याविषयीची चिंता, 'पियर प्रेशर' ह्या भरकटवणार्या गोष्टी आपोआपच कमी होतील.
मुलाचा अभ्यास, आवडी, छंद हे जसे आपण इतके दिवस जोपासले, मिरवले तसेच मुलाचे वयात येणे समंजसपणे, आश्वासकपणे हाताळले तर त्याच्या आयुष्यातला हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा त्याच्याकरता नक्की सुलभ होईल. त्याच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची योग्य जपणूक होईल. म्हणूनच आज पितृदिनाच्या निमित्ताने आपण या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहितीची देवाण-घेवाण करणार आहोत. मायबोलीकरांना स्वतःच्या बाबतीत आलेले किंवा मुलांना, नात्यातल्या लहानग्यांना वाढवताना, मित्रपरिवारातील अडनिड्या वयाच्या मुलांना मार्ग दाखवताना आलेले अनुभव या धाग्यावर लिहिणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने येणार्या गोष्टींबाबत आपण चर्चा सुद्धा करू शकतो. तेव्हा चला एका महत्त्वाच्या विषयावरील उपक्रमात भाग घेऊन आपले योगदान देऊयात.
अगं पण हाता तोंडाशी आ लेली
अगं पण हाता तोंडाशी आ लेली मुलं गमावायची का अशी. मुलग्यांना खरेच फार अव घड जात असणारे.
सारे आद र्श माचो मॅन नाहीतर सुपर मॅन चे. आई एकतर डोक्यावर तरी बसवणार नाहीतर देवघरात. चांगल्या मैत्रिणी मिळ वाय च्या क श्या हे माहीत नाही. भार तात तर थेट जिवाशीच गाठ. मुलींशी बोलायचे तर कसे?
एखाद्याला स्व तःचा कल तपासून पाहण्यासाठी समलिंगी मित्र हवा असेल तर तो मुलगा काय करत असेल.
का थेट गैर मार्गालाच लागावे त्याने? परत करि अर करण्याचे मोठे द् ड पण. त ड फड होत असेल जिवाची !आणि घरचे को णी समजावूनही घेत नाही. हवे तेवढे पॉर्न डाउन लोड करता येते नाहीतर स्वस्तात मिळते त्यामुळे ही जिवाचा भडका होत असेल. वया त येण्याची प्र क्रिया सोपी नाही. पुरुष शेअर करतानाही एकमेकांशी स्पर्धा करतात.
>>अगं पण हाता तोंडाशी आ लेली
>>अगं पण हाता तोंडाशी आ लेली मुलं गमावायची का अशी.>>
असं मी कधी म्हटले ?
पण मुळातच समाजात इतके टॅबू असतात की कुणी तोंडच उघडत नाही. कितीतरी वेळा काहीतरी बिनसले आहे हे उघड उघड दिसत असते पण एरवी साधी शिंक आली तरी लगेच विक्स पुढे करणारे आईबाबा याबाबत काही करत नाहीत. ही कसली नवी थेरं म्हणून बरेचदा उडवून लावतात. 'आम्ही नाही ती केली असली थेरं, झालोच ना मोठे?' वगैरे नेहमीचे डायलॉग असतातच. दुसरे म्हणजे मुल वयात येते आहे तेव्हा आता त्याच्याशी बोलूया असे म्हणून संवाद नाही साधता येत. तो मुल लहान असल्या पासूनच असावा लागतो. मुल काय बोलत आहे आणि काय न बोलता सांगायचा प्रयत्न करत आहे ते ऐकायची सवय सुरुवातीपासूनच हवी.
अहो ते तुम्हाला उद्देशून
अहो ते तुम्हाला उद्देशून नाही. सॉरी. त्रिवार. त्या पालकांना काय वाट्त असेल त्या वरून लिहीले. ८ - १० - १२ वयाची मुले आजकाल थेरपी, काउन्सेलिन्ग मध्ये असतात.
मुलग्यांना बोलते करणे,
मुलग्यांना बोलते करणे, त्यांच्या मनात काय चालले आहे ते कौशल्याने काढून घेणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांना आपण आपल्या आईबाबांजवळ मनातले हवे ते बोलू शकतो इतपत विश्वास निर्माण करणे, त्यांच्या मित्रमैत्रिणींबद्दल माहिती असणे, आपली मुलं नेटवर काय बघत आहेत, कोणाशी चॅट करत आहेत, कुठे वेळ घालवत आहेत याबद्दल थोडीफार तरी कल्पना असणे हे सध्याच्या काळात खूप जरूरी आहे हे अशा प्रकारच्या न्यूज ऐकल्या की जाणवते. तसेच कोणत्याही डेस्परेट परिस्थितीत आईबाबांजवळ आपण मदत मागितली तर ते देतील इतपत खात्री मुलांना हवी. पण त्यासाठी आपण मुलांशी बोलते राहिले पाहिजे व मुलांनाही बोलते केले पाहिजे. तसेच ज्या गोष्टी ते सांगत नाहीत ते त्या का सांगत नाहीत, यावरही विचार व्हायला हवाय. काय आड येते नक्की? आपल्याला कुणी समजून घेणार नाही असे जर त्यांना वाटत असेल तर तो समज त्यांच्या मनातून काढायला हवा... आणि हे सर्व मुलींसाठीही लागू आहे.
योग्य वयात मुलाला / मुलीला
योग्य वयात मुलाला / मुलीला देण्यासाठी चांगले संस्कार
http://www.mahans.co.in/index.php?option=com_content&view=article&id=67:...
http://www.mahans.co.in/index.php?option=com_content&view=article&id=19:...
http://www.mahans.co.in/index.php?option=com_content&view=article&id=18:...
सुसुकुची बरीचशी वाक्य पटली. आजपासून दहा वर्षांनी मुलाला गृहीत धरणे कितपत योग्य होईल याचा विचार करायला हवा. गूगलच्या जमान्यात मुलाला काय काय माहीत असेल ते आज सांगता येत नाही. प्रचंड माहितीचा स्त्रोत आजूबाजूला आहे, ज्यात भर पडत जाणार आहे. चांगलं काय नि वाईट काय याची जाण मुलांमधे उत्पन्न करणे हे कदाचित करू शकू. मात्र, प्रत्येक खेळात कोचची जी भूमिका असते ती निभावावी असं वाटतंय. सामन्याआधी खेळाडूला खेळाच्या खाचाखोचा, अनुभवाचे बोल हे नक्कीच सांगता येतं.
( कोचने काय कानगोष्टी सांगायच्या याबद्दल निरनिराळी आणि उपयुक्त मतं या आणि ब-याचशा बाफवर वाचनात येत असतात, तसंच इतरही ठिकाणाहूनही. धन्यवाद )
बाकी चर्चा चागली चालु आहे पण
बाकी चर्चा चागली चालु आहे पण "मुलगे" , " मुलग्यांना" हे फार खट्कतय वाचताना !
एक मुलगी (अनेक वचन: अनेक मुली).
एक मुलगा चं अनेक वचन अनेक "मुलं" असं पाहिजे ना ?
काही आशेचे किरणही आहेत. एक
काही आशेचे किरणही आहेत.
एक बिहार मधला १३ वर्शे वयाचा मुलगा आहे त्याने दुसृयांदा आय आयटी परीक्षा उत्तीर्ण होउन
मार्क्स वाढवले. शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे.
तसेच ऑटो ड्रायवर वडील असणार्या मुलाने आयटी मधला मोठा जॉब सोडून आर्मी मध्ये प्रवेश घेतला आहे ऑफिसर म्हणून. दोन्ही बातम्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये वाचण्यास येतील.
समबडी इज गेटिन्ग द पेरेंटिंग राइट. सर्व चॉइसेस त्यांनीच करायचे आपण फक्त करेक्ट
व्हॅल्यू सिस्टिम देऊ शकतो. मग ते समर्थ व्यक्तिमत्त्व बनून पुढे जाऊ शकतील.
या वर्षीचा पितृदिन होऊन ८-१०
या वर्षीचा पितृदिन होऊन ८-१० दिवस झाले देखील! आपल्यापैकी काहींनी या दिवसाच्या निमित्ताने वडिलांना शुभेच्छा दिल्या असतील, खास संवाद साधला असेल किंवा एकत्र येऊन एखादी आवडीची गोष्ट केली असेल. बर्याच मायबोलीकर बाबांना त्यांच्या चिमुकल्यांकडून गोड पत्रे, शुभेच्छा, फुले असेही मिळाले असेल. यंदा मायबोलीवर आपण पितृदिनाच्या निमित्ताने 'बाबाच्या राज्यात' व 'मुलगा वयात येताना' या विषयांवर चर्चा केली.
आपापल्या बाबांच्या राज्यातले अनुभव लिहिताना मायबोलीकरांनी अगदी मनापासून बाबांबद्दलच्या, त्या काळातल्या हृद्य आठवणी लिहिल्या. त्या निमित्ताने वडील-मुलांमधले गहिरे नाते अधोरेखीत झाले. हा उपक्रम सादर करताना सध्या वडिलांच्या भूमिकेत असलेल्या मायबोलीकरांकडून त्यांच्या स्वतःच्या राज्यातले अनुभव, मुलांबरोबर एक दिवस किंवा जास्त काळ घालवताना आलेल्या अडचणी, गमती याबद्दल लिहिणे अपेक्षित होते. तसे अनुभव मात्र वाचायला मिळाले नाहीत.
मुलगा वयात येताना या विषयावर चांगली चर्चा झाली, बरेच महत्त्वाचे मुद्दे समोर आले. मुलांकरता या अडनिड्या वयात लैंगिक शिक्षणाचे महत्त्व, आईवडीलांशी सुसंवाद असण्याचे महत्त्व व योग्य वेळी योग्य माहिती योग्य प्रकारे मुलापर्यंत पोचण्याचे महत्त्व हे सर्व मुद्दे चर्चेत आले. ज्यांची मुले आता या वयोगटात आहेत / जाणार आहेत त्यांना त्या दिशेने पाऊल उचलणे किती आवश्यक आहे याची जाणीव होणे किंवा जाणीव असेलच ती अधोरेखीत होणे हा या उपक्रमामागचा विचार होता.
या दोन्ही विषयांवर आपण अजूनही चर्चा करू शकतो, नवे व आवश्यक मुद्दे जितके येतील तितके हवेच आहेत व त्यावर सांगोपांग चर्चा होणेही आपल्या सर्वांच्या हिताचेच आहे. आतापर्यंत या उपक्रमामध्ये आपले विचार मांडणार्या, प्रतिक्रिया देणार्या सर्व मायबोलीकरांचे आभार!
ह्या वयात काही मानसिक आजार
ह्या वयात काही मानसिक आजार जसे की schizophrenia व्हायचे प्रमाण वाढत आहे. अभ्यासातील अपयश,कोवळे प्रेमभंग ,मित्राम्मुळे येणारे न्युन गंड अशी त्याची मुख्य कारणे असतात.
मुलगा खुप वेगळा वागत असेल तर दुर्लक्ष करु नका. उप्चारांना उशीर झालेले पेशंट पाहिले किई खुप वाइट वाटते.जितक्या लवकर उप्चार तितकी मुलगा लवकर आणि पुर्ण बरा व्ह्यायची शक्यता वाढते.
दुर्देवाने लोक आधी पत्रिका, अंगारे धुपारे, सगळे करतात मग पाणी गळ्याशी आले कि doctor कदे जातात.
शिकलेल्या लोकांनाही तुमच्या मुलाला antisychotic drug ची गरज आहे साम्गितले की राग येतो तिथे अडाण्याम्ची काय गत?
काही लोक चक्क पेशंटला रेल्वेत बसुवुन वार्यावर सोडुन देतात.
काही लोक घरातल्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न जम्नार नाही म्हनुन treatment सुरु करत नाहीत्.लपवुन ठेवतात.
टीपः schizophrenia मुलींनाही होउ शकतो, म्हातारपणीपण,प्रौढपनी होउ शकतो.पण सर्वात जास्त प्रमाण teanage boys मधेवाढतय.
सार्वजनिक ठिकाणी दिसनार्या वेड्या-भिकार्यांनाअ मुख्य्त्वे schizophrenia झालेला असतो. पोलिसांच्या मदतीने त्यांना सरकारी इस्पितळात दाखल केल्या उप्चार होउ शकतात. गरज आहे awareness ची.
Pages