
आपण लहान असताना जेव्हा आई बाहेर जायची आणि थोडावेळ घरावर आपलं आणि बाबांचं राज्य असायचं तेव्हा काय धमाल यायची आठवतंय? कधी घरीच मनसोक्त खेळणं, कधी बाबांच्या हातचे मस्त पदार्थ खाणं, कधी बाहेर जाऊन भेळ पुरी नाही तर आइसक्रीमवर ताव मारणं! अगदी वाट पाहायचो आपण त्या बाबांबरोबरच्या मजेची!
आता आपल्यातले बरेच लोक स्वतः बाबाच्या भूमिकेत गेलेत. हे बाबा-बच्चे पण आई नसताना एकत्र राहत असतील. कधी एक-दोन दिवस, तर कधी चक्क एखादा आठवडा किंवा महिनाही! कसे असतात हे दिवस? ही जबाबदारी उचलताना मुलांची रोजची कामं, अभ्यास, जेवण वेळेवर होतं की क्वचित धांदल उडते? मुलांसोबत घरात आरामात वेळ घालवणं आवडतं की बाहेर जाऊन मस्ती, भटकंती आवडते? मुलांना काही खेळाच्या कॢप्त्या सांगायचं ठरतं की त्यांचंच एखादं 'सीक्रेट' बोलता बोलता काढून घेतलं जातं? एक मात्र नक्की की बाबा मुलांना काही नवीन शिकवत असो किंवा मुलांसोबत स्वतःच एखादी नवी गोष्ट शिकत असो, बाबा आणि मुलं मिळून त्यांचं एक वेगळं विश्व तयार करत असतात. एकमेकांना आयुष्यभर आनंद देतील, समृद्ध करतील अश्या आठवणी निर्माण करत असतात. या गोड-कडू आठवणी आज पितृदिनाच्या निमित्ताने इथे लिहून या पिता-पुत्र/पुत्री नात्याची वीण आणखी घट्ट करूया का?
कोणत्याही बाबासाठी एक पूर्ण दिवस किंवा त्यापेक्षा जास्त वेळ आईच्या अनुपस्थितीत मुलांना सांभाळायचा अनुभव कसा असतो, काय शिकवतो, काय देऊन जातो याबद्दल लिहायला पितृदिनापेक्षा आणखी चांगला मुहूर्त कुठला असणार, नाही का?
मायबोलीकर बाबांचे अनुभव ऐकायला आम्ही उत्सुक आहोत.
छान लिहीलत रेव्यु!
छान लिहीलत रेव्यु!
श्यामराव तुमच्या वडिलांचा गुण
श्यामराव तुमच्या वडिलांचा गुण फार मोठा आहे आचरणात आणायला तेवढाच कठिण.
श्यामराव, रेव्यू तुमच्या
श्यामराव, रेव्यू तुमच्या पोस्टी आवडल्या.
श्यामराव, पोस्ट आवडली. इब्लिस
श्यामराव, पोस्ट आवडली.
इब्लिस
श्यामराव, खुप छान पोस्ट.
श्यामराव, खुप छान पोस्ट. निर्णय स्वातंत्र्य देणे, हा फार मोठा विचार आहे.
शामराव, सुंदर प्रामाणिक
शामराव, सुंदर प्रामाणिक पोस्ट.. खूप शिकण्यासारखं आहे तुमच्या वडिलांकडून. आमचा बाप आणि आम्ही आठवलं
श्यामराव, मला तुमची पोस्ट खुप
श्यामराव, मला तुमची पोस्ट खुप आवडली!
मी नाही देणार इतके
मी नाही देणार इतके स्वातंत्र्य ! आपला मुलगा काय अभ्यास करतोय आणि किती गुण मिळवतोय्/ग्रेड मिळवतोय हे जागृत पालक या नात्याने बघणे माझे कर्तव्य आहे. इतकेच नव्हे तर वयाच्या एका टप्प्यापर्यंत मुलाना आयुष्याविषयी सिरीयसनेस नसतो. काही वेळा काही ब्रँचेसचे फक्त आकर्षण असते ,क्षमता - उपयुक्तता असते असेच नाही. त्यामुळे मी तिथे लक्ष देणारच.
उद्या माझा मुलगा क्षमता नसताना मी मेडिकलला जातो म्हणाला तर खिशात पैसे आहेत म्हणून किंवा पैसे नसताना कर्ज काढून मी त्याला प्रायवेट सीट घेवू देणार नाही.
आणि क्षमता असल्याने मेरीटवर तिकडे गेला तरी प्रतिवर्षी पास होतोय ना हे तरी नक्कीच बघेन.
शाब्बास @ साती. एक
शाब्बास @ साती.
एक करोलरी.
क्षमता प्रत्येकात असते, ऑल मेन(ह्यूमन्स) आर बॉर्न इक्वल अशी एक कन्सेप्ट आहे.
ते गृहितक हीच सिद्धता धरून, जर मी लहानपणापासून त्याला मेडिकलला जाण्यासाठी परपजली ट्रेन केले तर ते आरामात जमेलच असे वाटते. हे कदाचित मुलांचा कल ओळखून मग त्यांना तसे वागू द्या, इत्यादी प्रचलित समजाच्या विरुद्ध विचार वाटू शकतील. म्हणजेच,त्याला ट्रेन करणे म्हणजेच, मी माझ्या अपत्यास "डॉक्टरच हो" असे "सांगत रहाणे" असे प्रतित होऊ शकते.
सबब, तुम्ही तुमच्या या मताचा विस्तार करून पोस्ट करणार काय?
मूळात प्रत्येकाचा ब्रेन इक्वल
मूळात प्रत्येकाचा ब्रेन इक्वल असतो हे गृहितक चुकीचे आहे.
मी खूप मुलांना लहानपणापासून शिकवले आहे त्यामुळे अगदी एकाच घरात वाढलेल्या सख्ख्या भावंडांच्या मेंदूची क्षमताही सारखी नसते हे ओळखून आहे. आखिर आय क्यू नामकी चीज है की नही.
दुसरं म्हणजे केवळ ब्रेनचा मुद्दा नसून शारिरीक अॅबिलिटीचाही आहे. खरं तर माझ्या मुलाला वयाच्या एका टप्प्यात समजा एअरफोर्स पायलट व्हायची क्रेझ झाली तर तो फ्लॅट फूट मुळे तिकडे जाऊ शकणार नाही हे मला त्याला समजवावेच लागेल.
त्याहून महत्त्वाचे म्हणजे आता मला पूर्वीचे हाय प्रोफाईल प्रोफेशनल एज्युकेशुनच मुलाला तारू शकते असे वाटत नाही. पूर्वी बी ए बी कॉमला कुणी विचारत नसे आत्ता ते शिकूनही माणूस कितीतरी पुढे जाऊ शकतो.
माझ्या मुलाच्या सगळ्या अॅबिलिटी वापरल्या जाब्यात मग साईड कुठलिही असो.
आणि लहानपणापासून त्याला क्रेझपासून लांब राहुन सारासार बिचार करण्याचि बुद्धी नसणार तेव्हा वयाच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत मी त्याला मार्गदर्शन करणारच.
हं ओके. "मैने ऐसा तो नही कहा
हं ओके.

"मैने ऐसा तो नही कहा था"
साती, श्यामरावांनी लिहिलंय ती
साती, श्यामरावांनी लिहिलंय ती परिस्थिती/काळ आणि तुमचीमाझी - यात खूप अंतर आहे. सगळं अगदी माशी टु माशी फॉलो करावं असं नाहीच. पण त्यातला भावार्थ - मुलांना सगळे/शक्य तितके ऑप्शन्स उपलब्ध करून देणं आणि आपण त्याचे निर्णय घेण्यापेक्षा योग्य निर्णय घेण्यासाठी जी मानसिक/बौद्धिक क्षमता (मी जन्मजात क्षमतेबद्दल बोलत नाही, डिसिप्लिनबद्दल बोलत आहे) आवश्यक असते त्याच्यात बाणवायचा प्रयत्न करणं - हे करण्याचा माझातरी प्रयत्न असतो.
स्वाती ,माझ्या म्हणण्याचा
स्वाती ,माझ्या म्हणण्याचा मतितार्थ पण तोच आहे.
शामरावांच्या पोस्टला उद्देशून त्या पोस्ट नाहीत तर काहिंनी आम्हाला पण मुलांना इतके स्वातंत्र्य देता येवो म्हटलंय त्यावर ती पोस्ट आहे.
शामरावांच्या वडिलांनी त्यांना जे शक्य ते सर्बोत्तम केलेच आहे यावर माझे दुमत नाही.
प्रतिसाद दिल्याबद्दल वरच्या
प्रतिसाद दिल्याबद्दल वरच्या सगळ्यांचे आभार....
Pages