कोणि मला सान्गेल का?

Submitted by shilpa mahajan on 13 June, 2013 - 12:22

वाचकहो, मी एका अडचणीत सापडले आहे . मी कथा गुगळच्या मेघ या निविष्ट साधनाचा वापर करून टाईप करते आणि मग वर्डस मध्ये सेव करते , नंतर ती मायबोलीवर टाकते . कथेचे आतापर्यंत चे भाग आधी टाईप करून ठेवलेले होते म्हणून सलग देता आले । गूगल ने 'मेघ ' सुरु करण्यापूर्वी जी साईट होती त्यात ट्रान्सलेट केलेला मजकूर वर्डस २ ० ० ३ मध्ये सेव होत असे . मेघ मध्ये
लिहिलेला मजकूर मात्र वर्डस २ ० ० ३ मध्ये दिसेना . मग मी वर्डस २ ० ० ७ टाकले . त्यात मजकूर सेव तर होतो पण त्यात काही बदल करू गेल्यास भलतेच काहीतरी होते . उदा . मला एखादा शब्द किंवा वाक्य खोडायचे असेल तर कर्सर त्या विशिष्ट शब्दाच्या पुढे नेला आणि बेक स्पेस चे बटन दाबले तर तो शब्द खोडला न जाता दुसराच कुठला तरी खोडला जातो . शब्द किंवा वाक्य सिलेक्ट होताच नाही . कधी तरी सिलेक्ट झाले तर डिलीट चे बटन दाबताच भलताच कुठला तरी मजकूर डिलीट होतो . एवढेच नव्हे तर पी . सी . च्या मर्जी नुसार कुठेतरी जोडला जातोय . याशिवाय मोठी कटकट म्हणजे मी सुधारणा करत नसलेल्या ठिकाणी तो असलेच काहीतरी , म्हणजे मजकूर कापणे किंवा कुठला तरी आणून जोडणे अशी कामे करतो . त्यामुळे मला दर मिनिटाला कथेची काय अवस्था आहे ते वाचून पहावे लागते आणि बिघडलेले दुरुस्त करायला जावे तर नवीनच समस्या उभी रहाते. त्यामुळे माझा पुढचा भाग पूर्ण होताच नाही आहे . या समस्या कशामुळे येतात व त्यावर उपाय काय हे कुणी सांगितले तर फार आभारी होईन
आमच्याकडे काही क्षण वीज जाण्याचे प्रमाण फार आहे . त्यामुळे डायरेक्ट मेघ मधून मायबोलीत टाकायची हिम्मत होत नाही . कोणत्याही क्षणी वीज जाइल आणि टाईप केलेले ट्रान्स्फर होण्यापूर्वी च उडून जाइल अशी धास्ती वाटते .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिल्पाताई,

या आधीच्या टंकलेखनाच्या दुरुस्तीसाठी काय हे मला नाही सांगता येणार पण यापुढे नविन टंकलेखन
http://marathi.changathi.com/ या टिकाणी करा अतिशय चांगले मोफत सोफ्टवेयर असून केवळ नोंदणी केल्यावर सहज टंकन करणे, सेव्ह करणे कॉपी करुन मायबोलीवर पेस्ट करणे फारच सुविधा जनक आहे.