सोबती
अंकुरले जीवन भूमातेच्या उदरी,
`सोबत' करूनी फेडू ऋण जन्मजन्मांतरी।
सोबतीशिवाय जीवन अशक्य आहे. प्रत्येकालाच सोबतीची गरज असते. अगदी जन्मल्या दिवसापासून ते जीवनाच्या सुंदर सोबती
अंकुरले जीवन भूमातेच्या उदरी,
`सोबत' करूनी फेडू ऋण जन्मजन्मांतरी।
सोबतीशिवाय जीवन अशक्य आहे. प्रत्येकालाच सोबतीची गरज असते. अगदी जन्मल्या दिवसापासून ते जीवनाच्या अंतापर्यंत. सूर्य, चंद्र, तारे, निसर्ग, झाडे, फुले, फUे, डोंगर, दNया, निसर्गाची साथ सगÈयांनाच मिUते. निसर्गच आपल्याला भरभरून आनंद देतो. प्राणी, पक्षी, पक्ष्यांची किलबिल, झाडांच्या पानांची सUसU, फुलांचे डुलणे, फुलपाखरांची मोहक हालचाल, पक्ष्यांचे निरीक्षण, त्यांचे विविध आकार, सुंदर रंग, माणसाला सतत खुणावत असतात. फुलांचे सुंदर रंग, आकार, सुवास प्रत्येकाच्या मनाला मोहून टाकतो. अशा वेUी शाUेत पाठ केलेल्या कितीतरी कविता, गाणी आठवतात. `छान किती दिसते `ते' फुलपाखरू.....', `श्रावणात घन निUा..........'
आपल्या गोष्टीतला `सोबती' हा आमच्याकडे पाUलेला `भू भू' आहे.
संध्याकाUचा फेरफटका मारून कॉफी करून आम्ही नेहमीप्रमाणे गच्चीवर आलो. बघतो तर काय.......
समोरच्या घरी अंगणात बसलेले छोटे, पांढरे, गुबगुबीत अंगाचे पिल्लू, जणू कापसाचाच बोUा!
कशीतरी कपातली कॉफी संपवून आम्ही धडधडत उतरून धावतच त्या पिल्लाकडे गेलो.
मऊ, पांढरे, गुबगुबीत शरीर, मोठे काUे डोUे, सतत टवकारणारे छोटे छोटे कान पाहून आम्ही खूपच खूश झालो. त्याच्याजवU गेलो; पण इतके हुशार होते की ओरडून ओरडून आम्हांला ते जवUही येऊ देत नव्हते. त्याला हात लावणे दूरच, जवU घेणे तर त्याहून अवघड।
मनात विचार आला, एवढे गोजीरवाणे पिल्लू कोणी बरे सोडून दिले? मी व माझी दोन्ही मुले, एक मुलगा व एक मुलगी, आम्ही शोधमोहीम करून त्या पिल्लाच्या मालकाला शोधून काढले ते एक सधन कुटुंब होते. आमची त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. माझी मुलगी त्याला रोज घरी आणत असे. ते फारच छोटे होते. त्याला रूमालात, दुपटयातील छोटया बाUाप्रमाणे सांभाUत घेऊन यावे लागे.
त्या वेUी ते पिल्लू, `शेरू' त्याचे नाव, अवघे वीस दिवसांचे होते. त्याचा जन्म हैद्राबादला झाला. ते खानदानी आहे. त्याला आई, बाबा, बहीण व आजी होती, ते सर्व हैद्राबादला व मालकिणीने येथे याला बरोबर आणले.
आमच्या घरातल्या सर्वांवर ते हक्क गाजवायचे. एकाच जागी स्थिर बसायला लावायचे. हलले की जोरजोरात ओरडायचे, राजेशाही थाटात राहायचे. मालकाच्या कारमधून हिंडायचे. त्याच्यासाठी सर्व रूमाल, अंथरूण-पांघरूण, श@म्पू, साबण वगैरेची व्यवस्था चोख ठेवली होती. मस्ती तर एवढी करायचे, की विचारूच नका. त्याच्या मस्तीमुUे, दुडुदुडु धावण्यामुUे ते एकदा रस्त्यावर आले व एक मोटार त्याच्या पायावरून गेली. पायाचे हाड मोडले. मालकाने त्याची चांगली काUजी घेतली. दैव बलवत्तर म्हणून ते पिल्लू वाचले. एवढे झाले तरी बसल्याबसल्या त्याची मस्ती चालूच असे. माझ्या मुलीला त्याचा फारच लUा लागला होता.
आमचे घर मोठे असल्याने ते पिल्लू आमच्याकडेच राहू लागले. ग@लरीत बसून येणाNया-जाणाNयांवर `भू भू' करत राही. अजूनही शेरूची आवडती जागा ग@लरी आहे. कबुतरे, कावUे यांच्यावर भुंकून भुंकून त्याला सUो की पUो करून सोडते.
घरच्या बगिच्याची सफर करायला, तेथील थंडगार गवतावर लोUायला त्याला फार आवडते. कोवÈया उन्हात गवतावर पहुडायला व बॉलशी खेUायला ते फारच आतुर असते.
आजूबाजूला घरे नव्हती तेव्हा बगिच्यात साप यायचे. आम्ही फार सांभाUून व घाबरूनच असायचो. एकदा बाबा झाडाला पाणी घालायला गेले तर वेटोUे केलेला साप फणा काढून होता. बाबांचे लक्ष नव्हते; पण शेरू फारच हुशार व तेज, दुरूनच स्वतःच्या जागेवर उडया मारत व ओरडत राहिला व हा का ओरडतो म्हणून लक्ष दिले तर काय, भला मोठा फणा काढलेला साप!
एकदा चुकून खिडकी उघडी राहिली, तर साप खिडकीतून घरात यायला बघत होता. शेरूचे लक्ष गेले. भुंकून भुंकून त्याने आमचे लक्ष वेधून घेतले व सापाला पिटाUून लावले, अशा कितीतरी गोष्टी आहेत. घराच्या लोखंडी दाराजवU ते कोणालाही फिरकू देत नाही. त्यामुUे चोरांची भीती राहत नाही. अतिशय कुशाग्र बुद्धीचा, प्रामाणिक, ब्रात्य, खेUकर असा हा शेरू आम्हांला फारच भावतो.
थकूनभागून बाहेरून घरी आल्यावर लडिवाUपणा करून भुंकतो, शेपटी हलवतो, अंगावर उडया मारतो, अंगावरची शाल किंवा ओढणी तर सोडतच नाही. ती घेऊन दुडूदुडू धावतो. वस्तू आणून देतो. आजीला पूजेसाठी फुले आणून देतो. आजीच्या मागे मागे जातो. तिच्या पायांशी गुंडाUी करून बसतो. तिच्या हातून दूधपोUी खातो. तिला शाल आणून देतो. कोणी ओUखीचे आले की हा पुन्हा घरात येऊन आम्हांला वर्दा देतो.
आम्ही सर्व 7-8 तास बाहेर जाऊ शकत नाही, तेवढया वेUात तो पाणीही पीत नाही व खातही नाही. मुलाच्या लग्नाला गेलो तर याने 3-4 दिवस शेजाNयांनी दिलेले दूध, उकडलेली अंडी, पोUी, लोणी काहीही घेतले नाही. आम्ही आल्यावर पाहिले तर त्याच्यात ताकदही नव्हती, ओरडताही येत नव्हते, जीभ पांढरी पडली होती; पण आम्ही आल्याचे समाधान होते व उडयाही मारणे चालूच होते.
मी पाणी दिल्यावर तो अक्षरशः ढसाढसा पाणी प्याला. शेजारील वहिन्ाने दूधपोUी करूनच ठेवली होती. ती खाऊ घातली तेव्हा कुठे आमच्या व त्याच्याही जिवात जीव आला.
त्याची बसणाची ऐट, दुडुदुडु धावणे, कान टवकारणे, मोठयामोठया काÈया डोÈयांनी बघत राहणे, पायाने तोंड पुसणे, तोंडावर एक पाय ठेवून झोपणे, जीभ काढून झोपणे त्याच्या सर्वच लकबी हव्याहव्याशा वाटतात. या छोटयाछोटया गोष्टींतून आनंद मिUतो. चिंता दूर राहतात, मन प्रसन्न व आनंदी राहते. घरात प्राणी असणे, फिश टँक असणे, पूर्वा पोपट असायचे, हे घराला आनंदी, उत्साही कामाला उत्स्फूर्त असे वातावरण ठेवते. शेरू हा आमचा असाच गोड सोबती आहे. तो नेहमीच, सदैव आम्हांला उत्तम साथ देतो, म्हणूनच तो `सोबती' म्हणून भावतो.
please read 'u' as 'ळ'
please read 'u' as 'ळ'
छान !
छान !
कृपया संपादन सुविधा वापरून ळ
कृपया संपादन सुविधा वापरून ळ = L टाइप करा.