आपली हक्काचा ट्रेनचा डब्बा १०/०६/२०१३

Submitted by मी दुर्गवीर on 10 June, 2013 - 13:43

आजचा दिवसा भलताच मस्त गेला …
पाऊसाने मस्त मज्जा घेतली आज…
परळ ते छत्रपती शिवाजी टर्मिनस फक्त दोन तास Proud
आज पाऊस प्रत्येकाला एक गारवा देत होता त्यात सुपर fast धावणारी आमची हक्काची ट्रेन….
एरवी मुबई रेल्वेचे भरभरून कौतुक करणारे व कोणत्याही प्रसंगाला हसत हसत सामोरे मुंबईकर या हि प्रसंगाला तोडगा म्हणून वेगळाच उपाय शोधला .
तोडगा : एक ओळख सत्र मुबईकराची होय एका आजोबांनी सुचवलेली एक भन्नाट कल्पना एकमेकांची ओळख करून घेणे . स्वतः पासून सुरवात करत जवळजवळ ४०,४५ नवीन मित्रांशी माझी आज मैत्री झाली मी माझी ओळखकरून देताना ….

सुरवात जय शिवराय या शब्दाने केली सगळ्यांच्या नजर माझ्या माथावरील "चंद्रकोर"कडे वळू लागले हळू हळू मी दुर्गवीर प्रतिष्टान च्या माध्यमातून करत असलेले कार्य सांगण्यास सुरवात केली …. मी किती बोललो याचे मलाच भान नाही पण धन्यवाद म्हणताच सगळ्यानी टाळ्यांचा गडगडाट केला.माझी छाती अभिमाने ताट झाली …
सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनद दिसत होता सगळ्यांनी दुर्गवीर च्या कार्याला भरभरून शुभेच्छा दिल्या मी सगळ्या मुंबई करांचे नाव नंबर माझ्या नोंद वहीत लिहून घेतले

जाताना ते आजोबा म्हणाले कि बाळा तुम्ही करत असलेले कार्य खूप महान आहे.
आणि माझ्या हातात 20 रुपये ठेऊन म्हणाले गडाखालील राहणाऱ्या गावातीतील लहान मुलांना चोकलेट वाट आणि बोल कि तुमच्या आजोबांनी दिलेत .… त्यांना प्रणाम करून मी त्यांचा निरोप घेतला . __/\__

धन्यवाद नितीन पाटोळे (8655823748)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ नमस्कर http://durgveer.com/ आपण एकदाही website पहावी आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल 8655823748