भोकsरूss
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
71
शेवाळी रंगाचं,
शेंबड्या अंगाचं,
मराठी ढंगाचं,
माझं भोकरूss
लोणची जायाचं,
पुरवून खायाचं,
सांभाळा रातीचं,
माझं भोकरूss
कैरीशी मैत्रीचं,
चवीच्या खात्रीचं,
तों.पा.सो, रुपाचं,
माझं भोकरूss
मुरल्या वाणाचं,
भेव गंss पाण्याचं,
रक्षण दाद्र्याचं
माझं भोकरूss
प्रेरणा: http://www.maayboli.com/node/43403 आणि http://www.maayboli.com/node/42775
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
शेंबड्या अंगाचं म्हटल्यावर
शेंबड्या अंगाचं म्हटल्यावर कुणी मुद्दाम भोकssरूsss खायला उताविळ होईलसं वाटत नाही.
(No subject)
(No subject)
सगळ्यांना खूप धन्यवाद! (आवडत
सगळ्यांना खूप धन्यवाद! (आवडत असल्यास 'ना' ऐवजी 'चे' वाचावं).
झकासराव, भारी काँप्लिमेंट! थँक्यू!
मला 'दादरा' शब्द माहिती असण्याचं मानुषीताई आणि शोभा यांना आश्चर्य का वाटलं असावं? त्यांना मी, बाजारची लोणची बारक्याश्या बाटल्यांमधून आणून खाणारी, फार 'अलिकडची' मुलगी वाटली असेन असं वाटून पाव सेकंद आनंद झाला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सशल, हो गंs हो. तू पण प्रेरणेचं रूटरू!
कुंकूच्या शीर्षकगीताची लिंक शोधते. त्याशिवाय अंदाज येणार नाही.
मूळ कवितेची लिंक देते. आधीच द्यायला हवी होती. उशीर झाल्याबद्दल माफ करा.
मरु गंss मरू... कित्ती मस्त
मरु गंss मरू... कित्ती मस्त केलेस गं विडंबरूss
मस्त जमलीये! प्रेरणा घेऊन एक
प्रेरणा घेऊन एक पाडतेच :
चिखल-आवडीचं
ठुसक्या बांध्याचं
चपट्या नाकाचं
माझं गं डुकSरूSSS
पिचक्या डोळ्यांचं
वाटोळ्या शेपटीचं
निमुळत्या तोंडाचं
माझं गं डुकSरूSSS
निरागस नजरेचं
पिल्लावळीचं
लडबडीत पायांचं
माझं गं डुकSरूSSS
चविष्ट चवीचं
हॅम-सलामीचं
पोर्क बेलीचं
माझं गं डुकSरूSSS
थँक्स हह, मामी. 'डुकरू'
थँक्स हह, मामी.
'डुकरू' अशक्य भारी!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मामी, अगदी फोटोसहीत विडंबन
मामी, अगदी फोटोसहीत विडंबन![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाय द वे, वरच्या घोळक्यातलं
बाय द वे, वरच्या घोळक्यातलं तुमचं कुठलं?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
ते जास्त(च) टॅन झालेलं. या
ते जास्त(च) टॅन झालेलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या कवितांची एकूण ठेवण (हुशार लोकं त्याला वृत्त म्हणतात बहुतेक) दृष्ट काढताना जे काही पुटपुटतात ना तशी आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मामी, तुमच्या डुकरूचा क्लोजप
मामी,
तुमच्या डुकरूचा क्लोजप लाव.
मामी,
मामी,![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
तुमच्या डुकरूचा क्लोजप लाव.
तुमच्या डुकरूचा क्लोजप लाव. >>> नको सायो, त्याला दृष्ट लागेल.
आक्का ही घे शीर्षक गीताची
आक्का ही घे शीर्षक गीताची लिंक www.youtube.com/watch?v=ceBlFja4fHk
मामी
मामी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मामी, अप्रतिम
मामी, अप्रतिम ____________/\____________
मृ आणि मामी दोघी भारी मामीचं
मृ आणि मामी दोघी भारी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मामीचं डुकरु शेवटचं कडवं वगळून फोटोसकट ललिताप्रीतिच्या डुक्कर लेखावर लावायला द्या![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मृ, ते शेंबडं अंगं का गं पण ? भोकरं बुळबुळीत असतात का ? :बाजारी बाटलीतून लोणचं आणणारी मुलगी:![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मृ मामी , गबरु ग गबरु तुझ
मृ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मामी ,
गबरु ग गबरु तुझ डुकरु.
मामी आता मला सांगा दादरा काय
मामी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आता मला सांगा दादरा काय असतं?
:बाबालोआमु:
(No subject)
धन्यवाद मॅक्स! 'माझं
धन्यवाद मॅक्स!
'काहीच्याकाही टायटलसाँग्ज' बाफ काढा.
'माझं कुंकूss'.
मामी "माझं डुकरू" गाताना सिनेमॅटोग्राफी (?) कशी असेल?
अगो, :बाजारी बाटलीतून लोणचं
अगो, :बाजारी बाटलीतून लोणचं आणणारी मुलगी: ह्यात "अलिकडची" असा महत्वाचा शब्द घालायला विसरलीस का? का?
रिया, पूर्वीपासून लोणची चिनी
रिया, पूर्वीपासून लोणची चिनी मातीच्या बरणीत ठेवतात. वरुन झाकण लावल्यावर त्याभिवती सुती कापड दोर्याने वगैरे बांधतात त्यालाच दादरा म्हणतात. लोणच्याला दमट हवा, पाणी वगैरे लागू नये म्हणून असेल.
सह्हिच.
सह्हिच.
पण तुझा आयडी मृssगssमृ असा
पण तुझा आयडी मृssगssमृ असा असायला हवा ना ?
डुकरू आत्ता वाचलं , मामी युटु
मामी, अशक्य! आता दुकानात हॅम
मामी, अशक्य!
आता दुकानात हॅम इत्यादी बघुन तुझं हे डुक$$$रु$$ आठवणार बघ!
)
(माबोवर येऊ साडेतीन+ वर्ष झाली पण तो 'एस' काही लिहीता येत नाहीये. मदत करा$$$!
मामी डुकSरूSS.... अशक्य
मामी
डुकSरूSS.... अशक्य आहे...
रुSS मातला मातला त्याला कशी आवSरुSS
अंगी गुलमोहSरूSS बहरला त्याला कशी सावSSरुSSS ??????
वत्सला, अग मराठी फोंट मध्य्न इंग्रजीत जा आणि S टाईप कर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो, पूर्ण करच तू हे
लाजो,
पूर्ण करच तू हे आता!
त्या 'एस' बद्द्ल धन्स. मराठीतच काही शॉर्टकट आहे का ते बघत होते!
अंगी गुलमोहSरूSS बहरला त्याला
अंगी गुलमोहSरूSS बहरला त्याला कशी सावSSरुSSS ???? >>> डायेट करा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages