सुमारे तीन वर्षापूर्वी कुठं कुठं जायचं "भिजायला".... हि थीम सादर केली होती. याच थीमचा पुढचा हा भाग.
सध्या उन्हाची काहिली सुरू आहे. याच उन्हात थोडासा गारवा मिळावा म्हणुन हा चित्रप्रपंच. चला तर पावसाची वाट पहात, भिजायला जाण्याची यादी तयार करत आणि सोबतीला मराठी "पाऊसगाणी" गुणगुणंत या सफरीचा आनंद लुटुया.
प्रचि ०१
आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग
आभाळात आले काळे काळे ढग,धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत ग, मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग....
प्रचि ०२
सुख पावसापरी यावे, आयुष्य अन् हे भिजावे,
स्पर्शून आसवांना ह्या मातीत ओल्या रुजावे
जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो...घन आज बरसे मनावर हो...
(ठोसेघर धबधबा)
प्रचि ०३
चिंब पावसानं रानं झालं आबादानी, झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी
झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी, रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी
प्रचि ०४
खुळ्या खुळ्या रे पावसा, किती भिजविसी मला
नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला
(विहिगाव धबधबा)
प्रचि ०५
घन ओथंबून येती, बनांत राघू फिरती
पंखावरती सर ओघळती, झाडांतून झडझडती
प्रचि ०६
आली आली सर ही ओली खुलवित धुंद अशी बरसात
छुम् छुम् पैंजण पायी बांधून सजले मी दिनरात
आली आली सर ही ओली
(इगतपुरी)
प्रचि ०७
अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले मेघ बरसू लागले
अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी
प्रचि ०८
घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा
प्रचि ०९
ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना
फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना गंध गेला रानावना
(माळशेज घाट)
प्रचि १०
आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा
दु:ख भिरकावुन येती शब्द माहेरपणाला
शब्द माहेरपणाला, नवा गांधार जिण्याला
मेघुटांच्या पालखीला, डोळे गेले आभाळाला
जाईजुईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला
प्रचि ११
बरस रे घना
तूच आज शमवी तृषीत माझिया मना
प्रचि १२
हा उनाड अवखळ वारा, या टपोर श्रावणधारा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा
प्रचि १३
ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
प्रचि १४
तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही
प्रचि १५
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
(लवासा)
प्रचि १६
सोसाट्याचा आला वारा सरसर आल्या धारा, भिजुनिया देह चिंब झाला गं
सजणीला भेटायाला साजनाने यावं तसा सांज वेळी पाऊस आला गं
प्रचि १७
पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना चाहूल विरत गेलेली
प्रचि १८
पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू
थेंब टपोरे गोरे गोरे, भर भर गारा वेचू
(भंडारदरा)
प्रचि १९
कधी रिमझीम झरणारा आला ऋतू आला
कधी टपोर्या थेंबांचा आला ऋतू आला
प्रचि २०
पावसात नाहती लता लता कळ्या फुले
सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले
प्रचि २१
उनाड पाऊस, अशांत पाऊस, अधीर भिरभिणारा पाऊस
निरोप घेऊन आभाळाचा भटके हा बंजारा पाऊस
प्रचि २२
गडद जांभळं भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ
प्रचि २३
आला आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
प्रचि २४
घन बरसत बरसत आले
वनि मोरांचा षड्ज लागला, झाडांतुन मल्हार जागला
मन चकित, सुगंधित झाले
प्रचि २५
या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे
प्रचि २६
जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता
आभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता
प्रचि २७
झुंजुर-मुंजुर पाउस मार्यानं अंग माझं ओलं चिंब झालं रं
टिपुर टिपुर पाण्याची घुंगरं हिरव्या हिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये, साजणा...
प्रचि २८
दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळेनिळे गारगार पावसाचे घरदार
सरीवर सर .... सरीवर सर ....
प्रचि २९
अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी न् थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार
(माळशेज घाट)
प्रचि ३०
पावसा ये रे पावसा, दे जिवाला दे भरवसा
देते कधीची तुला हाक माझी तृषा
प्रचि ३१
ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी जातात
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते ...... माझ्यात
जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख
सार्या आभाळाला देतो एक ओलसर रंग
शब्द भिजूनि जातात अर्थ थेंबांना येतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
(काहि प्रचि पूर्वप्रकाशित)
मस्तच रे जिप्स्या सुंदर फोटोज
मस्तच रे जिप्स्या
सुंदर फोटोज आहेत
आणि लग्न ठरल्याबद्दल हाबिणंदण
मस्त फोटो. कधी एकदा पाऊस सुरू
मस्त फोटो. कधी एकदा पाऊस सुरू होतोय असे झालेय.
सुंदर.. एखाद्या जागी तरी
सुंदर.. एखाद्या जागी तरी नक्कीच जाईन.. तूला न्यायला परवानगी घ्यावी लागेल ना आता ?
जिप्स्या.... जागा आधीच हेरुन
जिप्स्या.... जागा आधीच हेरुन ठेवल्यास ना लब्बाडा
चला, यंदाचा पावसाळा जिप्स्यासाठी अगदी संस्मरणीय ठरणार तर!!
(नेहमीसारखेच) मस्त फोटो.
(नेहमीसारखेच) मस्त फोटो. हिरवाई पाहुन शांत वाटले डोळ्यांना...
जिप्सी, एकाही फोटोवर
जिप्सी, एकाही फोटोवर वॉटरमार्क का नाही तुझ्या नावाचा? फोटो थोड्या दिवसांनी तुलाच ईमेलमधून फिरत फिरत सापडतील आता.
सर्वच फोटो अप्रतिम आहेत, डोळे सुखावले, वगैरे वगैरे वगैरे.
आता काय जिप्स्या, मौका भी है
आता काय जिप्स्या, मौका भी है और दस्तुर भी.. मज्जाय बाबा!! मस्त आलेत फोटो सगळेच.
धबाबा लोटल्या धारा धबाबा तोय
धबाबा लोटल्या धारा
धबाबा तोय आदळे
समर्थांच्या ओळी कॅमेर्यात बसवल्या आहेस. चिंब आहेत सगळेच फोटो.
पावसावरील सुंदर गाण्यांचे
पावसावरील सुंदर गाण्यांचे सुंदर शब्द.. सोबतीला सुंदर प्रकाशचित्र.. आणि जिप्सीची सुंदर थीम ! मस्त मस्त मस्त >> यो +१
सुंदर थीम जिप्सिभाऊ
हा पाऊस तुझ्या आयुष्यात हिरवा बहर घेऊन येऊ देत.
एक नंबर... पावसाळ्याची चाहूल
एक नंबर... पावसाळ्याची चाहूल लागलीच आहे, आत्तापासूनच 'कुठं कुठं जायचं भिजायला' ठरवायला पहिजे. जिप्सी आणखी एका मस्त सुखद थीम आणि फोटोज्. मन आणि डोळे शांत झाले..
मस्त फ़ोटो आणि त्याना सोबत
मस्त फ़ोटो आणि त्याना सोबत असणार्या कविता.
चला, यंदाचा पावसाळा जिप्स्यासाठी अगदी संस्मरणीय ठरणार तर!! फिदीफिदी>>>>>>>>>>>पण आपल्याला आता असे फोटो बघायला मिळणार का?
प्रतिसाद आणि शुभेच्छांबद्दल
प्रतिसाद आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद!!!!
धागा पाहिल्या पाहिल्याच ठरवले
धागा पाहिल्या पाहिल्याच ठरवले होते कामात / घाईत असताना उघडायचा नाही.. आता स्वतःलाच शाबासकी देतेय.. मस्त निवांत पाहिल्याबद्दल.
तुला __/\__ आणि धन्स
माझं नेहेमीचं आवडतं ठिकाण
माझं नेहेमीचं आवडतं ठिकाण फक्त आणि फक्त भंडारदरा
जिप्सी, केवळ अवर्णनीय
जिप्सी, केवळ अवर्णनीय !!!!!!!!!
मस्त आहेत सगळेच फोटो.
मस्त आहेत सगळेच फोटो.
सुंदर!
सुंदर!
Ka jalavatos re :'( baki
Ka jalavatos re :'(
baki maticha philya pavsane yenara sugandh ghet he photo pahayala majja aali.
Pages