राजीव गांधीना भावपूर्ण श्रद्धांजली

Submitted by सचिन पगारे on 21 May, 2013 - 12:19

भारताचे महान सुपुत्र भारतरत्न राजीवजी गांधी यांचा आज २२ वा स्मृतिदिन.आधुनिक भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा नेता.राजीवजी आज भारत तंत्रज्ञान क्षेत्रात जी प्रगती करत आहे त्याचे सारे श्रेय तुम्हालाच जाते. मोबाइल फोन, इंटरनेट, संगणक क्रांती, शिक्षणाचा प्रसार, १८ वर्षे वयाच्या तरुणांना मतदानाचा अधिकार, पंचायत राज योजना आणून तुम्ही जी दूरदृष्टी दाखवलीत त्याला सलाम.राजीवजी तुमच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.

f66ed653a4587652.jpgRajiv Gandhi in Rajghat 6.jpg.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजीव गांधी सरकारने मतदानाची वयोमर्यादा १८ वर आणली तेव्हा आश्चर्य वाटले होते - कारण जनमत काँग्रेसविरोधात होते हे तेव्हा उघड होते आणि सरकारलाही ते माहीत असणार.

आधुनिक भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा नेता.राजीवजी आज भारत तंत्रज्ञान क्षेत्रात जी प्रगती करत आहे त्याचे सारे श्रेय तुम्हालाच जाते.
<<
<<
Proud

श्रद्धांजली.

इच्छा नसतानाही अचानकपणे अंगावर येऊन पडलेली पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडताना राजीव गांधी यांनी तत्कालिन भ्रष्ट "राजकिय व प्रशासकीय" व्यवस्थेमधेही देशहिताची भुमिका निभावत काही उत्कृष्ट निर्णय निव्वळ पक्षहिताचा/सत्तेवर येण्याचा विचार न करता राबवले त्याबद्दल देश त्यांचा ऋणी राहिल. चूकीच्या वेळी व चूकीच्या व्यवस्थेत चूकीच्या पार्श्वभूमिवर अचानकपणे पंतप्रधानपद भूषवावे लागलेला व स्वतःच्या दूरदृष्टीचा उदारमतवादी धोरणांच्या मुळे "स्वपक्षियांनाच डोईजड/नकोसा झालेला" सुशिक्षित नेता म्हणुनच राजीव गांधी यांचे नाव स्मरणात राहील. त्यांना श्रद्धांजलि.