Submitted by रीया on 13 May, 2013 - 07:19
एकदा झाले काय
भाज्यांना फुटले पाय
टॉमॅटो लागला चालायला
बटाटा लागला पळायला
गाजराची लागली काकडीशी शर्यत
दोघेही निघाले धावत पळत
मिरच्यांनी पाहीली त्यांची गंमत
मटार आले उड्या मारत
विळीताईला पहाता मात्र
सगळे झाले गळित गात्र!
भा़ज्यांची अन मग फजिती झाली
जेवणात आमच्या कोशिंबिर आली.
____________
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
त.टी: ही माझी पहिली कविता! तिसरीत असताना केलेली. परवा सहज कपाटात आवरताना कुठल्याश्या वहीत सापडली. पोस्टताना अगदीच वाटतय पण तरीही शशांकदादांच्या पाठिंब्याने हिंमत करतेय पोस्टायची.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रि तिसरीत असताना इतकी गोड
रि तिसरीत असताना इतकी गोड कविता... क्या बात है..
भेटल्यावर तुला माझ्याकडुन एक चॉकी नक्की
व्वा व्वा!!
व्वा व्वा!!
अरे व्वा! ३रीत असतांना केलीस
अरे व्वा! ३रीत असतांना केलीस म्हणजे खरच तुझं कौतुक.

अतिशय क्यूऽट बालकविता आणि ती
अतिशय क्यूऽट बालकविता आणि ती ही "तिसरीतल्या रियाची" - क्या बात है .....
अशाच अजून बालकविता येउंदेत ....
तुला ३री मधे काय केलेले अजुन
तुला ३री मधे काय केलेले अजुन आठवते का ?
.
. छान आहे कविता...
आत्ताही थोडा बदल करून रिया
आत्ताही थोडा बदल करून रिया अशीच एक कविता करू शकेल.
कैलास लागले बागडायला
विदिपा लागले उडायला
भूषणदादा लागला नाचायला
वैवकु लागला उंडारायला
कर्दनकाळाला पाहून मात्रे सगळे गलितगात्र झाले
वगैरे!
आणि हे लिहून इश्य वगैरेही वाटणार नाही.
=========================
बाकी तिसरीतील कविता छान आहे.
तिसरीतील रियाची कविता खुपच
तिसरीतील रियाची कविता खुपच छान
ह्या दोनच वर्षात माबो वर बरीच प्रगती केलियेस की
पहिल्यांदा आपल्य लेखनाचा
पहिल्यांदा आपल्य लेखनाचा कुठला धागा वर आला तर आनंद होईचा
वाटतय 
आज मला जामच
चिमा
चॉकलेट नक्की दे हं! मी अजुन दहा बारा असल्या कविता लिहायला घेते.. मग तू चॉकलेटची संख्या +१ करत जा 
सगळ्यांना धन्स
उदय मला नाही आठवत तिसरीतलं फारसं काही

पण माझ्या आईने मी त्या वेळेला जे काही खरडलं त्याला छान छान म्हणत सगळं एका वहीत तारखेसहित लिहुन ठेवलंय...कितवीत असताना ही कविता लिहिली, वगैरे पण आहे त्यात
त्यादिवशी डायरी सापडली आणि आईचे एफर्ट्स पाहुन मन भरुन आलं
भूषणदादा

सचिनदादा
बालगीत छान आहे.
बालगीत छान आहे.
अरे व्वा.. रिया,आई ने तुलाच
अरे व्वा.. रिया,आई ने तुलाच मदर्स डे ची गिफ्ट दिली तर!!!
क्यूटी कविता..
अरे व्वा रीया, तिसरीत असताना
अरे व्वा रीया, तिसरीत असताना तू छान कविता करायचीस . (मग आताच काय झालं ? :-))
जोक अपार्ट . आवडली कविता.
मी अजुन दहा बारा असल्या कविता
मी अजुन दहा बारा असल्या कविता लिहायला घेते.. >>>>>> तु आता परत तिसरीत अॅडमिशन घेणारेस???????? घे हो घे.. भरपुर लिही.
चिमा आता तिसरीत आहे असं
चिमा

आता तिसरीत आहे असं समजलस तर नाही चालणार का???
येस वर्षूतै! आई नेहमीच ग्रेट असते
सामी
मस्त कविता रिया
मस्त कविता रिया
> तु आता परत तिसरीत अॅडमिशन
> तु आता परत तिसरीत अॅडमिशन घेणारेस????? >>>>>>>> सध्या तीने बालवाडीचा फॉर्म भरला आहे ४ वर्षांनी ३ रीत जाईल..
क्युट आणि गोड
क्युट आणि गोड
वा रियूडे वा आजवर मोठ्यांनी
वा रियूडे वा
आजवर मोठ्यांनी केलेली बालगीते खूप वाचलीत माबोवर पण आज प्रथमच ३ रीतल्या चिमुरडीने केलेले काव्य वाचतोय
त्या कपाटाला धन्स सांग तुझ्यातली तिसरीलली रिया त्याने इतकी वर्षे (महीने ...नाही नाही दिवस .....नाहीच तास ...मिनिटे) जपून ठेवली
मस्त लिहीली आहेस गं..आवडली
मस्त लिहीली आहेस गं..आवडली
रियुटले! आवडली
रियुटले! आवडली कोशिंबीर!
लेकीला उद्या वाचुन दाखवते!
मस्त!!! यमकं कसली छान
मस्त!!! यमकं कसली छान जमलीयेत.
क्यूट आहे कविता
क्यूट आहे कविता
मस्त!
मस्त!
धन्स लोक्स लेकीला उद्या
धन्स लोक्स
लेकीला उद्या वाचुन दाखवते!
>>
यासाठी विशेष धन्स
संपदा


त्यावेळेला मला यमक जुळली की कविता झाली अस वाटायचं
बर्याच आहेत अशा ट ला ट जोडलेल्या
त्यावेळेला मला यमक जुळली की
त्यावेळेला मला यमक जुळली की कविता झाली अस वाटायचं

बर्याच आहेत अशा ट ला ट जोडले >>>>>>>>>>>>>>>>>>>> काय सांगतेस..?
इथे तर गझलांमधे "ट" ला "ट" बरोबर "म" ब" "र" काहीही जोडुन तयार करतात
देवपूरकरांच्या
देवपूरकरांच्या कोशिंबीरीपेक्षा मस्त कोशिंबीर केलीस तू तेही तिसरीत असताना !!
उद्या गझलही त्यांच्यापेक्षा चांगली करशील असा विश्वास वाटतो !!!
ही पहा देवसरांची कोशिंबीर .........
पाहिजे होतेच तोंडी लावण्यासाठीच काही!
चोंचले मजला तरी झालीच कोशिंबीर नाही!!
<<<<<हाहाहा
मस्तच रिया,आवडली
मस्तच रिया,आवडली
मस्तय
मस्तय
क्यूट
क्यूट
(No subject)
मस्त
मस्त
Pages