बटाट्याची खरपूस भाजी

Submitted by तृप्ती आवटी on 7 May, 2013 - 22:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन मोठे बटाटे, एक मोठा टोमॅटो, अर्धी वाटी कोथिंबीर, १ टे स्पु धणे, १ टी स्पु जिरे, १/२ टी स्पु मेथ्या, १/२ टी स्पु आमचूर पावडर, तिखट, गरम मसाला, साखर, मीठ, फोडणीसाठी- तेल, हिंग, हळद.

क्रमवार पाककृती: 

बटाटे उकडून सालं काढून बारीक फोडी कराव्यात. टोमॅटोच्या पण बारीक फोडी कराव्यात. कोथिंबीर चिरून घ्यावी. धणे, जिरे आणि मेथ्या भरड वाटून घ्याव्यात. त्यात चवीप्रमाणे गरम मसाला, तिखट घालून नीट मिसळून घ्यावे. फोडणीसाठी जरा सढळ हाताने तेल गरम करून त्यात हिंग, हळद घालून धणे-जिरे इ.चे मिश्रण घालावे आणि भरभर हालवावे. सगळा मसाला नीट पोळला पाहिजे पण जळाला नाही पाहिजे. त्यात लगेच बटाट्याच्या फोडी, टोमॅटो, कोथिंबीर घालावे. न हालवता जरा वेळ तसेच राहू दिले की मसाला आणि बटाटे छान खरपूस होतात. मीठ, छोटा चमचाभर साखर आणि आमचूर पावडर घालून भाजी नीट हालवून घ्यावी. आंच जरा जास्त ठेवून मस्त खरपूस करावी. टोमॅटोचा रस आटून जातो शेवटी. जरा जाड पुर्‍यांसोबत मस्त लागते ही भाजी.

p4.JPG

वाढणी/प्रमाण: 
दोन मोठी माणसं
अधिक टिपा: 

ही एका मैत्रिणीने दिलेली रेसिपी आहे. मैत्रीण राजस्थानी आहे. पण ही काही पारंपरिक रेसिपी आहे की नाही हे माहिती नाही. तिच्याकडे गेलं की ही भाजी आणि पुडी असा बेत नाश्त्याला असतो.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझं व्हेरिएशन पिठलं ते पावभाजी या रेन्जमधे कुठेही असू शकतं. केलंस की (योग्य जागी) वृत्तांत लिही. Proud

धने-जीरे-मेथी भाजून वाटले तर स्वाद आणखी चांगला येईल काय >>> कच्चे वाटायचे कारण नंतर फोडणीच्या तेलात तळले जातात. अशा मसाल्याचा स्वाद जास्त चांगला येतो.

पहिली testimony इतक्या आली पण Happy

आमचे हापूस आंबे आले की ट्राय करेन हा प्रकार.

एक वेगळं वर्जनः टोमॅटो ऐवजी बारीक चिरलेला कांदा फोडणीत घालून त्यावर बाकी मसाले परतून मग उकडलेला, चौकोनी कापलेला बटाटा परतून मग कसुरी मेथी चुरुन सढळ हाताने घातल्यास जरा वेगळ्या चवीची भाजी मिळेल. (ट्राय केलेली आहे)

>>>माझ्या जित्याची खोड स्पेशल प्रमाणे तसं व्हेरीयेशन करून बघायची इच्छा होते आहे ..
सशल, तुला पाकृ चा कर्दनकाळ अशी पदवी द्यावी का? Wink

ओह वॉव.. यम्मी , शिवाय सोप्पीही.. ग्रेट!!!!!!!!
लौकरात लौकर होईल ही भाजी आणी पुर्‍या ही.. स्लर्पी!!!!

आज केली होती ही भाजी. खरपूस + खमंग अशी चव होती. धणे+जिरे+मेथीचा स्वाद मस्तच येतो भाजीला.

आमरस, बटाटा खरपूस भाजी, काकडीची दह्यातली कोशिंबीर आणि पिवळ्या मुगाची उसळ (+ फुलके, भात, ताक) असा मेनू केला होता. सर्वांना आवडली ही भाजी.

मी केली आज अशी भाजी. मस्त झाली होती. आवडलीच.
धने-जिर्‍याची पावडर आणि गरम मसाला तेलात घातला तेव्हा खूप छान दरवळ सुटला. मस्त वाटलं अगदी. खूप आंबट होईल असे वाटले म्हणून आमचूर पावडर घातली नाही, पण भाजी खाल्ल्यावर 'घालायला हवी होती' असे वाटले.
थोडा चिरलेला कांदा फ्रिजात होता तो संपवायचा होता, टोमॅटोबरोबर तोही घातला होता भाजीत. Wink

यमी वाट्तेय रेसिपी. घरात बटाट्याचा खप एकंदरितच जास्त आहे. त्यामुळे वेगळे प्रकार ट्राय करायला आवडतात.
नक्की करून पाहिन. पार्टीसाठीपण चांगली वाट्तेय. Happy

Pages